केळीवरील कुकुंबर मोझॅक रोगाचे नियंत्रण

सध्या केळी लागवड क्षेत्रामध्ये कुकुंबर मोझॅक विषाणूचा (सी.एम.व्ही) प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. स्थानिक भाषेत यांस ‘हरण्या रोग’ नावाने ओळखले जाते.
symptoms of Cucumber Mosaic virus on Bananas
symptoms of Cucumber Mosaic virus on Bananas

सध्या केळी लागवड क्षेत्रामध्ये कुकुंबर मोझॅक विषाणूचा (सी.एम.व्ही) प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. स्थानिक भाषेत यांस ‘हरण्या रोग’ नावाने ओळखले जाते. सततचे ढगाळ वातावरण, अखंडित पडणारा पाऊस, कमी तापमान आणि जास्त आर्द्रता हे घटक रोगाच्या वाढीसाठी पोषक असतात. रोगाचा प्राथमिक प्रसार कंदापासून आणि दुय्‍यम प्रसार मावा किडीमार्फत होतो. या विषाणूचा प्रादुर्भाव विविध भाजीपाला पिकांवर देखील दिसून येतो. लागवडीनंतर २ ते ३ महिन्यात रोगाची लक्षणे दिसू लागतात. रोगाची लक्षणे ओळखून योग्य वेळी नियंत्रणाचे उपाय करावेत. लक्षणे

  • सुरुवातीस कोवळ्या पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसतात.
  • पानांवर १-२ अर्धवट आकाराचे किंवा पूर्ण पानभर पसरलेले पट्टे दिसतात. कालांतराने पानांचा पृष्ठभाग आकसला जाऊन कडा वाकड्या होतात. पाने आकाराने लहान होतात.
  • शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. हाताने दाबल्यास कडकड आवाज येतो.
  • पानांच्या शिरा काळपट पडून तेथील ऊती मरतात. पाने फाटतात.
  • नवीन येणारी पाने आकाराने लहान होतात.
  • जास्त प्रादुर्भाव झाल्यास, पोंग्याजवळील पान पिवळे पडून पोंगा सडतो. प्रादुर्भावग्रस्त झाडे पक्व अवस्थेपर्यंत टिकाव धरत नाहीत.
  • झाडांची वाढ खुंटते. झाडांची निसवण उशिरा अनियमित होऊन फण्या लहान होतात. फळे विकृत आकाराची होऊन त्यावर पिवळ्या किंवा काळ्या रेषा पडतात.
  • तापमान व पाऊस यातील बदलामुळे काहीवेळा वरील लक्षणे नाहीशी होऊ शकतात.
  • नियंत्रणाचे उपाय 

  • विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करता येत नाहीत. मात्र, नियंत्रणासाठी गावपातळीवर एकत्रितरीत्या मोहीम राबवल्यास रोगप्रसार रोखला जाऊ शकतो.
  • प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळांसहित उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावीत. बागेचे सातत्याने निरीक्षण करावे.
  • बाग तसेच बांधावरील सर्व प्रकारची तणे काढून स्वच्छता ठेवावी.
  • बागेत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, मका लागवड करू नये.
  • बागेभोवतीचे रान कारली, शेंदणी, करटुले, गुळवेल यासारख्या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत.
  • मावा नियंत्रण (फवारणी- प्रति लिटर पाणी)

  • डायमिथोएट (३० ईसी) २ मिलि किंवा
  • थायामेथोक्झाम (२५ डब्लुजी) ०.२ ग्रॅम किंवा
  • इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मिलि
  • (लेबल क्लेम शिफारस)
  • संपर्क- डॉ. कृष्णा पवार,९८२२४४३६९२, ०२५७/२२५०९८६ (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), केळी संशोधन केंद्र, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com