agricultural news in marathi, custard apple crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

सीताफळ पीक सल्ला
डॉ. सुनील लोहाटे
बुधवार, 25 एप्रिल 2018

सीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र, उन्हाळ्यात उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यास कीड-रोगमुक्त व दर्जेदार फळांचे उत्पादन मिळते. बाजारात अशा फळांना चांगला दर मिळतो. मात्र, उन्हाळी बहरात फळधारणा खूप कमी प्रमाणात होते. हे टाळण्यासाठी योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते.

उन्हाळ्यातील कमी फळधारणेची कारणे :  

सीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र, उन्हाळ्यात उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यास कीड-रोगमुक्त व दर्जेदार फळांचे उत्पादन मिळते. बाजारात अशा फळांना चांगला दर मिळतो. मात्र, उन्हाळी बहरात फळधारणा खूप कमी प्रमाणात होते. हे टाळण्यासाठी योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते.

उन्हाळ्यातील कमी फळधारणेची कारणे :  

 • सीताफळात परपरागसिंचन होत असते. उष्ण व कोरड्या हवामानात मादी फुलांची परागकण धारण करण्याची क्षमता फार कमी कालावधीसाठी असते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या होणारे परपरागसिंचन फार कमी प्रमाणात होते. परिणामी, कमी फळधारणा होते.
 • उष्ण व कोरड्या हवामानात आर्द्रतेचे प्रमाण खूपच कमी असते. परिणामी, मादी फुलांची फलनक्षमता कमी होते. तसेच, परागकणांचीही कार्यक्षमता कमी राहते. परिणामी कमी फळधारणा होते.
 • उष्ण व कोरड्या हवामानात उच्च तापमानात फुले करपून जातात. परिणामी कमी फळधारणा होते.

उपाययोजना :  

 • बागेत सौम्य तापमान व जास्त आर्द्रता राहावी यासाठी बागेस ४-५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • बागेच्या कडेने हवारोधक झाडांचे कुंपण करावे. परिणामी, बागेत उष्ण वाऱ्याच्या शिरकावाला अटकाव बसून आर्द्रतेत होणारी घट रोखता येते.   

उन्हाळ्यात बागेची घ्यावयाची काळजी :

 • उन्हाळ्यात बागेची स्वच्छता करावी. त्यासाठी बागेत पडलेली काळी पाने, रोगट फळे, झाडांवर लटकलेली काळी व रोगट फळे गोळा करून त्यांचा बागबाहेर जाळून नायनाट करावा.
 • बागेमध्ये भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश व खेळती हवा राहील, अशी व्यवस्था करावी. त्यासाठी अनुत्पादक, दाटी-वाटी निर्माण करणाऱ्या फांद्यांची छाटणी करावी.
 • झाडांची खोडे २ ते २.५ फुटापर्यंत मोकळी करून बोर्डो पेस्ट (१० टक्के) लावावी.
 • बहुतांश शेतकऱ्यांनी बागेस खतमात्रा दिल्या आहेत. ज्यांचे खतनियोजन अद्याप राहिले आहे त्यांनी प्रतिझाड शेणखत ५० किलो, नत्र २५० ग्रॅम, स्फुरद १२५ ग्रॅम व पालाश १२५ ग्रॅम अशी संतुलित खतमात्रा द्यावी. नत्राची मात्रा दोनवेळा विभागून आत्ता लगेच १२५ ग्रॅम व १ महिन्याने १२५ ग्रॅम अशी द्यावी.
 • अवकाळी पाऊस झाल्यास व हवामान ढगाळ असल्यास बागेवर कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
 • बागेमध्ये अाच्छादनाचा वापर करावा. त्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो. तसेच पाण्यासाठी पिकाची तणाबरोबर होणारी स्पर्धा टाळली जाऊन पाण्याची बचत होते.
 • उन्हाळी वातावरणात बागेवर पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.

पिठ्या ढेकूण नियंत्रण :

 • झाडाच्या आळ्यामध्ये शिफारशीत कीटकनाशकाची भुकटी झाडाच्या आकारमानानुसार जमिनीत मिसळावी.
 • झाडाच्या खोडावर १० ते १५ सें.मी. एवढी लांबी असलेली प्लॅस्टिक पट्टी बांधावी. पट्टीवर वरील बाजूस ग्रीस लावावे. किडीची पिले ग्रीसला चिकटून मरतात.
 • व्हर्टिसिलियम लेकॅनी (फुले बगीसाईड) या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. बागेत आर्द्रता असेल तरच या बुरशीनाशकाचा चांगला परिणाम दिसून येतो. त्यासाठी फवारणी सकाळी ९:०० वाजेच्या आत किंवा संध्याकाळी ५:०० च्या नंतर करावी.
 • आवश्‍यकता भासल्यास ब्युप्रोफेझिन या कीटकनाशकाची २ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.

नवीन लागवड केलेल्या बागेची काळजी

 • नवीन झाडांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • झाडांना काठीचा आधार द्यावा. म्हणजे झाडे वाऱ्याच्या दिशेने वाकणार नाहीत.
 • बागेत आर्द्रता टिकून राहण्यासाठी बागेच्या कडेने वारारोधक झाडे लावावीत. त्यामुळे बागे उष्ण वाऱ्याची झुळूक शिरणार नाही.
 • झाडांच्या खोडाजवळ सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.
 • उन्हाळी बहरात फळे वाढीच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी .म्हणजे फळे तडकणार नाहीत.
 • योग्य पक्व झाल्यानंतरच फळांची काढणी करावी.    

संपर्क : डाॅ. सुनील लोहाटे, ९४२२०७१०२८
(अंजीर व सीताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी, जि. पुणे.)

 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...