सायकलचलित गिरणीमुळे घरगुती पीठ मिळवणे शक्य

नागपूर : उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील गंगाराम चौहान यांनी सायकलचलित पीठगिरणी विकसित केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आय.ए.आर.आय.) इवोव्हेटिव्ह फार्मर २०२० या पुरस्काराने गौरविले आहे.
Cycling mills make homemade flour
Cycling mills make homemade flour

नागपूर : उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील गंगाराम चौहान यांनी सायकलचलित पीठगिरणी विकसित केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आय.ए.आर.आय.) इवोव्हेटिव्ह फार्मर २०२० या पुरस्काराने गौरविले आहे. भूमिहीन असलेल्या गंगाराम चौहान यांचा ओढा पूर्वीपासूनच शेती अवजारे विकसित करण्याकडे आहे. परदेशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये ९५ टक्क्यांपर्यंत यांत्रिकीकरण झाले असून, केवळ पाच टक्‍के कामांसाठी मनुष्यबळाचा वापर होतो. भारतातही शेतीकामासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवत असून, विविध संकल्पनावर काम झाल्यास निश्‍चितच शेतीक्षेत्रात नवे परिवर्तन घडेल, असा आशावाद ते व्यक्‍त करतात. याच विचारातून ते शेतीमध्ये यांत्रिकीकरणाच्या पर्यायाचा शोध घेत असून, मानवचलित आणि स्वयंचलित अशी तेरा सयंत्रे विकसित केली आहेत. त्यामध्ये सायकलचलित पीठ गिरणीचाही समावेश आहे. पूर्वी घरामध्ये महिलावर्ग जात्यावर दळण दळत असे. पुढे विद्युतचलित पीठ गिरण्या आल्या. मात्र ग्रामीण भागामध्ये भारनियमनामुळे दळणाची समस्या तशीच राहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरगुती जात्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराची पीठ गिरणी विकसित केली आहे. त्यासाठी पीठ गिरणीत वापरल्या जाणाऱ्या दगडाचा वापर केला आहे. सायकलप्रमाणे सीटवर बसून पायडल फिरवल्यास जाते फिरले जाते. यात पाच ते सहा मिनिटांत एक किलो दळण दळता येते. आठ किलो दळणासाठी साधारणतः एक तास इतका वेळ लागतो. सायकलचलित पीठ गिरणीत गहू, तांदूळ व अन्य धान्येही दळता येतात. पिठाच्या कणांचा आकार नियंत्रित करण्यासाठी वरील बाजूस एक नटबोल्ट बसवला आहे. त्याचे सेटिंग केल्यास अपेक्षेप्रमाणे दळण बारीक आणि जाड मिळविता येते. त्याच प्रमाणे दलियासाठी भरडही काढता येते. एकत्रित धान्येही दळता येतात. विद्युत गिरणीच्या तुलनेने कमी वेगाने जाते फिरत असल्याने पीठ थंड राहते. उष्णतेमुळे होणारा धान्यातील कर्बोदके आणि तंतुमय पदार्थांचा ऱ्हास यात होत नसल्याचे गंगाराम चौहान सांगतात. अनुदानावर होणार पुरवठा आतापर्यंत त्यांनी सायकलचलित पीठ गिरणीच्या दोन संयंत्रांची विक्री केली आहे. या यंत्राचे मूल्य १५ हजार रुपये आहे. नुकतेच उत्तर प्रदेश सरकारने कृषी यांत्रिकीकरणामध्ये या पीठ गिरणीचा समावेश केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात अनुदानावर या संयंत्राची विक्री केली जाणार आहे. मजल्याच्या शेतीवर संशोधन सुरू मजल्याची शेती (मल्टी लेअर फार्मिंग) ही काळाची गरज आहे. भविष्यात शेतीसाठी जमीन मर्यादित होत जाणार असल्याने शेतीकरिता यापुढील काळात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वरच्या बाजूस मिरची, वांगी, धने, टोमॅटो, लसूण, कांदा यांसारखी भाजीपाला पिके घेण्याचे नियोजन असून, दुसऱ्या थरामध्ये उंचीनुसार अन्य पिके घेणार आहेत. पिकाला व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळेल, अशी संरचना करण्यात येणार आहे. सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो, दुपारी डोक्यावर येतो आणि मावळताना पश्‍चिमेकडे जातो. त्यामुळे सर्व दिशांनी बऱ्यापैकी सूर्यप्रकाश पिकांना मिळू शकतो. यामुळे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक तितके प्रकाश संश्‍लेषण नक्कीच होईल, असा दावा ते करतात. -  गंगाराम चौहान, ९४५४३५१६८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com