agricultural news in marathi Cyclone in the Bay of Bengal | Agrowon

बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने या भागात कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) तयार झाले आहे. आज (ता. २५) सायंकाळपर्यंत या भागात चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत आहेत. 

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने या भागात कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) तयार झाले आहे. आज (ता. २५) सायंकाळपर्यंत या भागात चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत आहेत. उद्या (ता. २६) संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला असून, ही प्रणाली महाराष्ट्राकडे येण्याची चिन्हे आहेत.

बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात तयार झालेली कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढली असून, आज पहाटे त्याचे कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डिप्रेशन) रूपांतर झाले आहे. या वेळी ही प्रणाली ओडिशाच्या गोपाळपूरपासून अग्नेयेकडे ५१० किलोमीटर, तर आंध्र प्रदेशच्या कलिंगापट्टणमपासून ५९० किलोमीटर पूर्वेकडे समुद्रात होती.

या प्रणालीची तीव्रता वाढत असून आज (ता. २५) दुपारपर्यंत किनाऱ्यालगत चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता आहे. ही संभाव्य वादळी प्रणाली आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या विशाखापट्टणम, गोपाळपूर आणि कलिंगापट्टणमजवळ किनाऱ्याला धडकण्याची संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

पूर्व किनाऱ्यालगतच्या असलेल्या समुद्रात शनिवारी (ता. २५) उंच लाटा उसळण्याची शक्यता असून, ताशी ४५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी (ता. २६) सायंकाळपर्यंत ही वादळी प्रणाली किनाऱ्याकडे येणार असून, त्या वेळी ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह, पूर्व किनाऱ्यावरील राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पूर्व विदर्भाकडे येणार वादळी प्रणाली
उपसागरातील वादळी प्रणालीचा संभाव्य मार्ग पाहता रविवारी (ता. २६) किनाऱ्याला धडकून, उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणातून सोमवारपर्यंत (ता. २७) महाराष्ट्रातील पूर्व विदर्भाकडे येण्याचे संकेत आहेत. किनाऱ्याला धडकल्यानंतर या प्रणालीची तीव्रता कमी होत जाणार असली, तरी या काळात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.


इतर अॅग्रो विशेष
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
विदर्भ, मराठवाड्यात उद्यापासून पावसाची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण...
सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढपुणे ः केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन...
मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
भाजपच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने...मुंबई ः या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे...
‘कथनी आणि करणी’त फरक पुन्हा उघडपुणे : आधीच अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या...
बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीन विक्री करापुणे : सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
लातुरात सोयाबीनच्या भावात तीनशेची घसरणलातूर ः खाद्यतेल आयात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर...
आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक...मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
मॉन्सूनचा महाराष्ट्रातून निरोपपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...