पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे

कपाशी व भुईमुगातील गंधकाची कमतरता
कपाशी व भुईमुगातील गंधकाची कमतरता

पाण्याचा लवकर निचरा होत असलेल्या जमिनी तसेच जैविक पदार्थ कमी असलेल्या जमिनीत गंधकाची कमतरता दिसते. सेंद्रिय खतांमधून गंधकाचा पुरवठा होतो. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ रासायनिक घटकांचे सेंद्रिय घटकात रुपांतर करतात. त्यामुळे विद्राव्य गंधक पिकांना सहज उपलब्ध होतो. पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे तपासून योग्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. जमिनीमध्ये गंधकाच्या कमतरतेची कारणे

  • पिकांद्वारे सातत्याने होणारी उचल.
  • जैविक पदार्थ कमी असलेली जमीन.
  • अतिउत्पादन घेण्यात येणाऱ्या जमिनी.
  • पाण्याचा लवकर निचरा होत असलेल्या जमिनी.
  • मातीच्या धुपीमुळेही गंधकाची कमतरता निर्माण होते.
  • पिकांचे अवशेष, सेंद्रिय खते आणि काडीकचऱ्याचा शेतात कमी वापर.
  • प्रमुख अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात असलेल्या खतांचा वापर.
  • विविध पिकांतील गंधकाच्या कमतरतेची लक्षणे भुईमूग

  • गंधकाची कमतरता असलेले झाड सर्वसाधारण झाडापेक्षा लहान झालेले आढळतात.
  • शेंगा व नत्र गाठी यांची वाढ खुंटते व परिपक्वता येण्यास उशीर लागतो.
  • सोयाबीन

  • नवीन पाने पिवळसर होतात. पानांची लांबी कमी होते.
  • गंधकाची अतिकमतरता असल्यास पूर्ण झाड पिवळे होऊन परिपक्व होण्यापूर्वी फुले गळून जातात. परिणामी, फळधारणाही कमी होते.
  • कापूस

  • नवीन पाने पिवळी पडून पात्याचा रंग लालसर
  • दिसतो.
  • जुन्या पानांवर गंधकाची कमतरता लवकर दिसून
  • येते.
  • तृणधान्ये भात:

  • पाने पिवळसर होतात.
  • झाडांची वाढ खुंटते व लोंब्यांच्या संख्येत घट येते.
  • ज्वारी

  • जुनी पाने पिवळसर हिरव्या रंगाची होतात.
  • नवीन पाने लहान होऊन खाली झुकली जातात.
  • मका

  • नवीन पानांच्या शिरा पिवळ्या पडतात. पानांच्या कडा लालसर दिसतात.
  • पानांची कडा लालसर होऊन खोड खालच्या बाजूने लालसर पिवळी पडतात.
  • भाजीपाला फ्लॉवर

  • लागवडीपासनू एक महिन्याच्या आत पानाच्या कडा पिवळसर पडून खाली निमुळत्या होतात.
  • उत्पादनात घट होते.
  • वांगी

  • गंधकाची कमतरता असल्यामुळे झाडांची अपरिपक्व
  • फुले गळतात व उत्पादनात घट येते.
  • नवीन पाने पिवळी पडतात.
  • कोबी

  • नवीन पानाचे काठ पिवळे पडतात.
  • नवीन पानांचा आकार चमचा किंवा कपासारखा
  • होऊन निमुळता होत जातो. त्यामुळे गड्डा तयार होत नाही.
  • कांदा

  • पानाचा आकार लहान होतो, पाने पिवळी पडतात.
  • पानांचे शेंडे पिवळसर पडून वाळतात.
  • कांद्याचा आकार लहान राहतो. साठवणुकीत कांदा सडण्याचे प्रमाण जास्त असते.
  • मिरची

  • फूल धारणा उशिरा होऊन फुलांची संख्या कमी होते व उत्पादनात घट येते.
  • कोवळ्या पानांचा शेंडा पिवळसर दिसून
  • येतो.
  • ऊस

  • नवीन पानांवर पिवळसर हिरवा रंग येतो.
  • पूर्ण पाने पांढरे होतात व वाळतात.
  • विविध पिकांसाठी शिफारशी

  • गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीत तुरीची अधिक उत्पादकता तसेच जमिनीची सुपीकता सुधारण्याकरिता शिफारशीत खत मात्रे सोबत (२५ किलो नत्र व ५० किलाे स्फुरद) प्रतिहेक्टरी २० किलो गंधकाची मात्रा द्यावी.
  • गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीत सोयाबीन-गहू पीक पद्धतीमध्ये उत्पादकता वाढविण्याकरिता शिफारशीत खत मात्रेसोबत प्रतिहेक्टरी २० किलो गंधक जिप्समद्वारे द्यावे.
  • खोल काळ्या जमिनीत सोयाबीन-गहू पीक पद्धतीत सोयाबीन पिकास शिफारशीच्या ५० टक्के नत्र रासायनिक खताद्वारे आणि ५० टक्के नत्र सेंद्रिय पदार्थांतून (सुबाभूळ पाला किंवा शेणखत) अधिक २० किलो गंधक व २.५ किलो झिंक सल्फेट प्रतिहेक्टरी द्यावे.  सूर्यफुलाच्या उत्पादनवाढीसाठी प्रतिहेक्टरी १५ टन शेणखत अधिक शिफारशीत खतमात्रेसोबत (४० किलो नत्र,६० किलो स्फुरद, ४० किलो पालाश) अधिक २५ किलो गंधक जिप्समद्वारे द्यावे.
  • गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीत खरीप धानाकरिता प्रतिहेक्टरी १०० किलो जिप्सम शिफारशीत खतमात्रे सोबत (१०० किलो नत्र,५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश प्रतिहेक्टरी) द्यावे.
  • मध्यम खोल काळ्या चुनखडी युक्त जमिनीमध्ये गंधक, जस्त आणि लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास मका पिकाला प्रतिहेक्टरी ३० किलो गंधक व २० किलो झिंक सल्फेट पेरणीवेळेस द्यावे. तसेच २.० टक्के फेरस सल्फेटची फवारणी करावी.
  • जवसाचे अधिक उत्पादन, तेल व प्रथिनाचे प्रमाण वाढविण्यासाठी शिफारशीत खत (६० किलो नत्र,३०किलो स्फुरद प्रतिहेक्टरी) मात्रे सोबत १५ किलो गंधक प्रतिहेक्टरी द्यावे. विदर्भातील कांदा पिकाच्या उशिरा खरिपाच्या (रांगडा) लागवडीसाठी भीमा राज या जातीची व अधिक उत्पादनासाठी प्रतिहेक्टरी १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश,३० किलो  गंधक याप्रमाणात रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
  • गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीमध्ये लसूण पिकाच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी तसेच साठवणुकीसाठी रासायनिक खताच्या शिफारशीत (प्रतिहेक्टरी १०० किलो नत्र,५०किलो स्फुरद ५० किलो पालाश) मात्रे सोबत ३० किलो गंधक प्रतिहेक्टरी द्यावे.
  • गंधकाचे व्यवस्थापन

  • माती परीक्षण करून गंधकाची दक्षता पातळी १० मिलीग्रॅम प्रतिकिलोपेक्षा कमी असल्यासच गंधकयुक्त खतांचा शिफारशीनुसार वापर करावा.
  • गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीत विविध पिकांसाठी आवश्‍यकतेनुसार २० ते ४० किलोग्रॅम गंधकाची मात्रा उपयुक्त ठरते. नत्र: स्फुरद: पालाश: गंधक यांचे गुणोत्तर  ४ः२ः२ः१ असे असावे. गंधकयुक्त खतांचा वापर पिकांच्या पेरणीपूर्वी जमिनीत पेरून केला जातो. जिप्सम आणि सिंगल सुपर फाॅस्फेट ही सर्व साधारणपणे गंधकयुक्त खते म्हणून वापरली जातात.
  • डायअमोनियम फाॅस्फेट (डीएपी) सारख्या गंधकविरहीत खतांचा वाढता वापरसुद्धा जमिनीतील गंधकाच्या कमतरतेचे एक महत्त्वाचे कारण आहे. स्फुरदाचा पुरवठा करण्यासाठी सिंगल सुपर फाॅस्फेट या सरळ खताचा वापर डाय अमोनिया फाॅस्फेटऐवजी केल्यास जवळपास १२ टक्के गंधकाचा पुरवठा केला जातो.   
  • गंधक पुरवठा करणारी सेंद्रिय खते सेंद्रिय खतांमधूनसुद्धा गंधकाचा पुरवठा होतो. उदा. शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, पिकाचे अवशेष. गांडूळखत, सोयाबीन कुटार, कापूस, बोरु, गिरिपुष्पाचा पाला यामध्ये अनुक्रमे ०.२३ , ०.३३, ०.१०, ०.३६ व ०.२७ टक्के सरासरी गंधक असते. त्यामुळे त्यांचा शेतीमध्ये नियमित वापर करावा.

                       गंधकाचे स्राेत व गंधकाचे प्रमाण

    अ.क्र.  गंधकाचे स्राेत    गंधकाचे प्रमाण (टक्के)
    १     जिप्सम    १९
    २    बेन्टोनाईट सल्फर    ८५

    संपर्क : डाॅ. संदीप हाडोळे, ९९२१४००३९९, (अखिल भारतीय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये संशोधन प्रकल्प, मृद विज्ञान व कृषीरसायनशास्त्र विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com