नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
यशोगाथा
संकटांतही गुलाब निर्यातीला उभारी
येत्या रविवारी (ता. १४) येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या निमित्ताने मात्र बाजारपेठेला उभारी मिळत असून, निर्यातीला चालना मिळाली आहे. पुणे शहरानजीकच्या तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमधील गुलाबशेती व बाजारपेठेचा त्यानिमित्ताने घेतलेला आढावा.
मागील वर्षी कोरोना संकटामुळे व्यावसायिक गुलाबशेतीचा व्यापार, निर्यात यास मोठा फटका बसला. त्यातच निसर्ग चक्रीवादळामुळे पॉलिहाउसेसचे मोठे नुकसान झाले. येत्या रविवारी (ता. १४) येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या निमित्ताने मात्र बाजारपेठेला उभारी मिळत असून, निर्यातीला चालना मिळाली आहे. पुणे शहरानजीकच्या तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमधील गुलाबशेती व बाजारपेठेचा त्यानिमित्ताने घेतलेला आढावा.
यंदाचा ‘व्हॅलेंटाइन डे’ येत्या रविवारी (ता. १४) आहे. गुलाबशेती व संबंधित उद्योग त्यामुळे सध्या लगबगीत आहे. मागील वर्षी कोरोना संकटाचा मोठा फटका व्यावसायिक गुलाबशेतीला बसला. स्थानिक, देशांतर्गत व्यापार ठप्प झाला.
निर्यातीला फटका बसला. मध्यंतरीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे पॉलिहाउसेसचेही नुकसान झाले. फूल उत्पादक व्हॅलेंटाइन डेच्या तयारीत असताना तापमानवाढ झाली. अशा विविध कारणांनी फूल उत्पादक अडचणीत आले. तरीही व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने बाजारपेठेला उभारी मिळत असून निर्यात वाढत आहे.
फ्लोरिकल्चर पार्कवर दृष्टिक्षेप
पुणे- तळेगाव येथे फ्लोरिकल्चर पार्क कार्यरत आहे. येथील एकूण क्षेत्र सुमारे ७०० एकर असून, ३०० एकरांवर पॉलिहाउसेस आहेत. पार्कच्या फूल उत्पादक संस्थेचे सचिव मल्हारराव ढोले म्हणाले, की कोरोना संकट व निसर्ग चक्रीवादळ या दुहेरी संकटांमुळे फूल उत्पादक अडचणीत आले. त्यातून सावरत अनेकांनी व्हॅलेंटाइन डेच्या हंगामाचा शाश्वती नसताना धाडसाने नियोजन केले. यात पहिली अडचण आली ती मजूरटंचाईची. कोरोना संकटामुळे परप्रांतीय मजूर आपापल्या गावी गेले होते. ते परत येण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे आर्थिक गुंतवणुकीची जोखीम घेऊन काम करावे लागले.
दरांची स्थिती
कोरोना काळात भाजीपाल्यांना मागणी वाढली होती. अनेक मोठ्या कंपन्यांनी अशावेळी फुलांचे उत्पादन बंद करून भाजीपाला उत्पादनाकडे मोर्चा वळवला. त्यामुळे फुलांचे उत्पादन घटले. यामध्ये तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमधील तीन कंपन्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील काही कंपन्यांचा समावेश आहे. या वर्षी थंडीचाही अभाव राहिला. उष्ण हवामान राहिल्याने फुलांचे उत्पादन डिसेंबर मध्येच सुरू झाले. त्यामुळे व्हॅलेंटाइन डेसाठी फुलांचा ३० टक्क्यांनी तुटवडा निर्माण झाला. फुले लवकर उमलायला सुरुवात झाल्याने डिसेंबरमध्ये काढावी लागली. मात्र याचा फायदादेखील काही प्रमाणात झाल्याचे ढोले यांनी सांगितले. कोरोना संकटात ठप्प असलेले लग्नसोहळे काही प्रमाणात नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये सुरू झाले. या काळात प्रति फूल १० रुपयांपर्यंत दर मिळाला.
यंदा निर्यात कमीच
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने गुलाब निर्यातीसाठी मुख्य भिस्त असते ती युरोपीय देशांवर. मात्र अजूनही तेथे अनेक ठिकाणी कोरोना टाळेबंदी व निर्बंध आहेत. त्यामुळे अत्यल्प निर्यात होत आहे. विमानसेवाही अद्याप सुरळीत झालेली नाही. उड्डाणे कमी झाल्याने निर्यातीच्या दरात तिप्पट वाढ झाल्याने निर्यातदारांनी निर्यातीची जोखीम घेतलेली नाही. कार्गो सेवादेखील उपलब्ध नसल्याचा परिणाम निर्यातीवर झाला आहे. गेल्या वर्षी पार्कमधून २० लाख फुलांची निर्यात झाली. ती यंदा १० लाखांपर्यंत होईल असा अंदाज आहे.
देशांतर्गत बाजारपेठेवर भिस्त
यंदा देशांतर्गत बाजारपेठ चांगली राहील, असा अंदाज ढोले यांनी व्यक्त केला आहे. निर्यातीची शाश्वती नसल्याने त्यांनीही आपल्या पॉलिहाउसमधील सुमारे ६० हजार लाल गुलाब देशांतर्गत बाजारात पाठविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी अनुक्रमे ३५, ४० आणि ५० सेंटिमीटर लांब दांड्याच्या प्रति फुलांना ७, ८ आणि १० रुपये दर मिळाला होता. या वर्षी प्रत्येकी २ ते ३ रुपयांनी तो जास्त मिळेल अशी आशा आहे. दिल्ली, जम्मू- काश्मीर, झारखंड, कोलकाता, जयपूर, गोवा, हैदराबाद, अहमदाबाद, लुधियाना, बंगळूर, मुंबई, वाराणसी, सुरत, पटणा आदी शहरांबरोबरच नेपाळपर्यंत मागणी असते. देशांतर्गत बाजारपेठेत ५० लाख फुलांचा पुरवठा गेल्या वर्षी झाला. यंदा तो ३० लाखांपर्यंत असेल, असे ढोले यांनी सांगितले.
रविवार हीच संधी?
यंदाचा व्हॅलेंटाइन डे रविवारी आल्याने तरुणाईकडून तो मोठ्या प्रमाणावर साजरा होण्याची शक्यता आहे. यामुळे हॉटेल, रिसॉर्ट येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याची शक्यता आहे. यामुळे फुलांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात प्रति फुलाची कमाल किंमत ३० रुपयांपर्यंत जाण्याची सूत्रांची शक्यता आहे.
या वर्षी माझ्याकडील चार एकरांपैकी ५० गुंठ्यांतील पॉलिहाउसमध्ये नव्याने लागवड केली आहे. मात्र त्यातून उत्पादन मिळणार नाही. उर्वरित क्षेत्रावरील पॉलिहाउसमधून गेल्या वर्षी अडीच लाख फुलांची निर्यात केली. यंदा एक लाखापर्यंत उद्दिष्ट आहे. फुलाला १२ रुपये दर मिळण्याची शक्यता आहे.
- व्ही.एम. जम्मा ७०३८७३४१४५
कोरोना टाळेबंदीत फूल उत्पादन पूर्णतः बंद असल्याने मजूरटंचाई निर्माण झाली. यामध्ये झाडांचे पोषण व्यवस्थित करता आले नाही. परिणामी, २५ टक्के उत्पादन कमी झाले. अनेक मोठ्या कंपन्यांनीही उत्पादन बंद केल्याने त्याचा तुटवडा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये जाणवला. कोरोना काळात ठप्प झालेला लग्न हंगाम या काळात सुरू झाल्याने मागणी वाढली. प्रति फूल २० रुपये दर डिसेंबरमध्ये मिळाला. गेल्या २५ वर्षांत मला मिळालेला हा सर्वाधिक दर होता. यंदा निर्यातीसाठी १२ रुपये दर मिळेल अशी शक्यता आहे.
- पंडित शिकारे ९२२६७५७९९९
(संचालक, ‘इंडिया फ्रेश’ )
संपर्क मल्हारराव ढोले ८६००३००७९५
फोटो गॅलरी
- 1 of 94
- ››