हरियाना येथील कृषी विद्यापीठात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित

हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित केला आहे. हा भारतातील कोणत्याही कृषी विद्यापीठाने विकसित केलेला पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Prof. Chaudhary Charan Singh, Vice Chancellor, Haryana Agricultural University, Hisar (Haryana). B. R, Kamboj and scientists from the College of Agricultural Engineering and Technology while presenting the electric tractor.
Prof. Chaudhary Charan Singh, Vice Chancellor, Haryana Agricultural University, Hisar (Haryana). B. R, Kamboj and scientists from the College of Agricultural Engineering and Technology while presenting the electric tractor.

हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी  इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित केला आहे. या १६.२ किलोवॉट बॅटरीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरमुळे डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये शेतातील कामे करणे शक्य होणार आहेत. हा भारतातील कोणत्याही कृषी विद्यापीठाने विकसित केलेला पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असल्याचा दावा करण्यात आला आहे. या ‘ई ट्रॅक्टर’चे विकसन एम. टेक.चे विद्यार्थी वेंकटेश शिंदे यांनी केले असून, त्यांना कृषियंत्रे आणि ऊर्जा अभियांत्रिकी विभागातील शास्त्रज्ञ मुकेश जैन यांचे मार्गदर्शन केले आहे. या ट्रॅक्टरविषयी अधिक माहिती देताना विद्यापीठाचे कुलगुरू बी. आर. कंबोज यांनी सांगितले, की १.५ टन वजनाच्या ट्रेलरसह हा ई ट्रॅक्टर एका चार्जिंगमध्ये प्रति तास २३.१७ किमी इतक्या वेगाने सुमारे ८० किमी अंतर जाऊ शकतो. या ट्रॅक्टरचा देखभाल व चालण्याचा खर्च अत्यंत कमी असेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यामध्ये वाढ होईल.  ‘ई ट्रॅक्टर’ दुहेरी फायदेशीर भारतामध्ये सुमारे ८० लाख ट्रॅक्टर असून, हरियानामध्ये सुमारे ४ लाख ट्रॅक्टर आहे. ३० एचपी पेक्षा लहान ट्रॅक्टरद्वारे होणारे कर्बवायूचे उत्सर्जन अनुक्रमे भारतात ४६ लाख टन आणि हरियानामध्ये २.३ लाख टन इतके प्रचंड आहे. डिझेल चलित ट्रॅक्टरद्वारे होणारे हे प्रदूषण नव्याने विकसित केलेल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे कमी होऊ शकते. 

  • सध्या भारतामध्ये सरासरी कृषी ऊर्जा उपलब्धी ही २.० किलोवॉटवर प्रति तास इतकी असून, विकसित देशामध्ये ती १५ किलोवॉटआवर प्रति तास इतकी आहे. म्हणजेच कृषी यांत्रिकीकरणामध्ये मोठ्या संधी असून, ई ट्रॅक्टरमुळे यांत्रिकीकरणालाही मोठी चालना मिळू शकते. 
  • ई ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर चालवण्याचा प्रति तास खर्च ३३२ रु, मोल्ड बोर्ड नांगर चालवण्याचा प्रति तास खर्च ३०१ रु. इतका कमी होईल. तुलनेसाठी डिझेल ट्रॅक्टरचा अनुक्रमे प्रति तास खर्च ४४७ रु आणि ३५३ रुपये.). डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये ई ट्रॅक्टरचा खर्च १५ ते २५ टक्क्यांपर्यंत कमी येतो. 
  • सध्या एकच प्रोटोटाइप मॉडेल तयार केले असून, त्याचा बनवण्याचा खर्च ६.५ लाख रुपये इतका आला. मात्र मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यानंतर त्याची किंमत कमी होऊ शकते. सध्या याच क्षमतेचा डिझेल ट्रॅक्टर ४.५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com