agricultural news in marathi Developed electric tractor at Agricultural University, Haryana | Page 2 ||| Agrowon

हरियाना येथील कृषी विद्यापीठात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी  इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित केला आहे. हा भारतातील कोणत्याही कृषी विद्यापीठाने विकसित केलेला पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
 

हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी  इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित केला आहे. या १६.२ किलोवॉट बॅटरीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरमुळे डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये शेतातील कामे करणे शक्य होणार आहेत. हा भारतातील कोणत्याही कृषी विद्यापीठाने विकसित केलेला पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या ‘ई ट्रॅक्टर’चे विकसन एम. टेक.चे विद्यार्थी वेंकटेश शिंदे यांनी केले असून, त्यांना कृषियंत्रे आणि ऊर्जा अभियांत्रिकी विभागातील शास्त्रज्ञ मुकेश जैन यांचे मार्गदर्शन केले आहे. या ट्रॅक्टरविषयी अधिक माहिती देताना विद्यापीठाचे कुलगुरू बी. आर. कंबोज यांनी सांगितले, की १.५ टन वजनाच्या ट्रेलरसह हा ई ट्रॅक्टर एका चार्जिंगमध्ये प्रति तास २३.१७ किमी इतक्या वेगाने सुमारे ८० किमी अंतर जाऊ शकतो. या ट्रॅक्टरचा देखभाल व चालण्याचा खर्च अत्यंत कमी असेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यामध्ये वाढ होईल. 

‘ई ट्रॅक्टर’ दुहेरी फायदेशीर
भारतामध्ये सुमारे ८० लाख ट्रॅक्टर असून, हरियानामध्ये सुमारे ४ लाख ट्रॅक्टर आहे. ३० एचपी पेक्षा लहान ट्रॅक्टरद्वारे होणारे कर्बवायूचे उत्सर्जन अनुक्रमे भारतात ४६ लाख टन आणि हरियानामध्ये २.३ लाख टन इतके प्रचंड आहे. डिझेल चलित ट्रॅक्टरद्वारे होणारे हे प्रदूषण नव्याने विकसित केलेल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे कमी होऊ शकते. 

  • सध्या भारतामध्ये सरासरी कृषी ऊर्जा उपलब्धी ही २.० किलोवॉटवर प्रति तास इतकी असून, विकसित देशामध्ये ती १५ किलोवॉटआवर प्रति तास इतकी आहे. म्हणजेच कृषी यांत्रिकीकरणामध्ये मोठ्या संधी असून, ई ट्रॅक्टरमुळे यांत्रिकीकरणालाही मोठी चालना मिळू शकते. 
  • ई ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर चालवण्याचा प्रति तास खर्च ३३२ रु, मोल्ड बोर्ड नांगर चालवण्याचा प्रति तास खर्च ३०१ रु. इतका कमी होईल. तुलनेसाठी डिझेल ट्रॅक्टरचा अनुक्रमे प्रति तास खर्च ४४७ रु आणि ३५३ रुपये.). डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये ई ट्रॅक्टरचा खर्च १५ ते २५ टक्क्यांपर्यंत कमी येतो. 
  • सध्या एकच प्रोटोटाइप मॉडेल तयार केले असून, त्याचा बनवण्याचा खर्च ६.५ लाख रुपये इतका आला. मात्र मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यानंतर त्याची किंमत कमी होऊ शकते. सध्या याच क्षमतेचा डिझेल ट्रॅक्टर ४.५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.

 


इतर टेक्नोवन
दूध प्रक्रिया उद्योगातील उपकरणेदूध हा नाशीवंत पदार्थ असल्यामुळे उत्पादित आणि...
ट्रॅक्टरचलित बहुपीक टोकण यंत्रटोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या...
व्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्रव्हर्जीन कोकोनट तेल हे नैसर्गिक सर्वश्रेष्ठ...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित...काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात....
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
लेसर चिमट्याने पकडता येतील विषाणूसिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील...
वनस्पतींचे भौगोलिक मूळ ठरवणे होईल सोपेविविध पिके किंवा अन्नधान्य उत्पादनामध्ये भौगोलिक...
वाशीमच्या शेतकऱ्यांनी उभारली बांधावरची...वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी...
शेतातून पिकासोबतच घेता येईल सौरऊर्जा...शेती आणि सौरऊर्जा यांचे उत्पादन एकाच वेळी घेणे...
शेतीत यांत्रिकीकरण रूजवलेले चौधरीममुराबाद (ता.. जि. जळगाव) येथील मनोज सदाशिव चौधरी...
नाशीवंत भाज्या टिकविण्यासाठी आधुनिक...भाजीपाला हा नाशीवंत घटक असून, काढणीनंतर त्वरित...
परदेशी कंपन्या उतरल्या पारंपरिक...ओरडणाऱ्याची मातीही विकली जाते, अशा आशयाची म्हण...
घरगुती उत्पादनासाठी ‘स्मार्ट इनडोअर...हरितगृहाची उभारणी ही आधुनिक शेतीकडे नेणारे पाऊल...
अन्न प्रक्रियेचे आधुनिक तंत्र : ...गेल्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या...
हरियाना येथील कृषी विद्यापीठात...हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना...
एकाच झाडावर वांगी, टोमॅटोच्या...वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील भारतीय भाजीपाला...
मळणी यंत्र वापरताना घ्यावयाची खबरदारीखरिपातील बहुतांश पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...