agricultural news in marathi The direction of self-employment obtained from beekeeping | Page 2 ||| Agrowon

मधमाशीपालनातून मिळाली स्वयंरोजगाराची दिशा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021

उत्तर प्रदेशातील मदारपूर केवली (ता. गोसाईगंज, जि. लखनौ) येथील ब्रजेश कुमार वर्मा यांनी मधमाशीपालनातील कौशल्ये शिकत त्यात उत्तम यश मिळवले आहे. आज त्यांचे नाव उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या मधमाशीपालकांमध्ये घेतले जाते. या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवतानाच अन्य ११२० शेतकरी व तरुणांसाठी स्वयंरोजगारही उपलब्ध केला आहे.
 

उत्तर प्रदेशातील मदारपूर केवली (ता. गोसाईगंज, जि. लखनौ) येथील ब्रजेश कुमार वर्मा यांनी मधमाशीपालनातील कौशल्ये शिकत त्यात उत्तम यश मिळवले आहे. आज त्यांचे नाव उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या मधमाशीपालकांमध्ये घेतले जाते. या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवतानाच अन्य ११२० शेतकरी व तरुणांसाठी स्वयंरोजगारही उपलब्ध केला आहे.

ब्रजेश कुमार यांच्याकडे वडिलोपार्जित केवळ ०.४ हेक्टर जमीन होती. अन्य शेतकऱ्यांकडून काही जमीन करारावर घेत काही काळ चांगले उत्पन्न मिळवण्याचा सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी प्रयत्न केला. मात्र तरीही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यामध्ये आर्थिक अडचणींनी पिच्छा काही सोडला नाही. १९९० दरम्यान फळबाग विभागामार्फेत फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी मधमाशीपालनाच्या व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात होते. या विभागामध्ये प्राथमिक प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यात त्यांना अधिक रुची वाटू लागली. या प्रशिक्षणादरम्यान एक मधमाशी पेटी मोफत मिळाली. त्यातून आपण मधमाशी पाळू शकतो, याचा आत्मविश्‍वास आल्यानंतर याच मधाच्या उत्पन्नातून त्यांनी पुढील दोन वर्षांत आणखी दहा मधमाशी पेट्या विकत घेतल्या. त्यातून व्यवसाय वाढवत नेला.

यशामागे धावते यश
आत्मविश्‍वास वाढलेल्या ब्रजेश कुमार यांच्याकडे अनेक शेतकरी मार्गदर्शनासाठी येऊ लागले. त्यातून अनेकांचे व्यवसायही सुरू झाले. या मधमाशी पालकांची अभिषेक ग्रामोद्योग संस्थान ही सहकारी संस्था स्थापन केली. तिची उत्तर प्रदेश सहकार विभागाकडे नोंदणी केली. या संस्थेमार्फत गोसाईगंज विभागामध्ये मध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात आले. सोबतच मध प्रक्रिया केंद्रही स्थापन केले. या केंद्रासाठी वेगवेगळ्या खेड्यातून कच्चे मध गोळा केले जाते. त्यावर प्रक्रिया करून उच्च दर्जाचे मध तयार केले जाते. राज्यभरामध्ये अनेक मुख्य शहरामध्ये वेगवेगळ्या दुकानातून त्यांची विक्री केली जाते.

प्रशिक्षण
लखनौ येथील भारतीय ऊस संशोधन केंद्राच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये मधमाश्यांच्या वसाहतीतून मध गोळा करण्याच्या आधुनिक व मधमाश्यांना इजा न पोचवणाऱ्या पद्धतीचेही प्रशिक्षण ब्रजेश यांनी घेतले. त्यात प्रक्रियेसोबतच पॅकिंग, ब्रॅण्डिंग व अन्य उप उत्पादने यांचीही माहितीही मिळाली. त्यांच्याकडे पूर्वीपासूनच मधमाशीपालन असल्यामुळे कृषी विज्ञान केंद्राने वेगवेगळ्या चाचण्यांसाठी त्यांची निवड केली. २०११ नंतर त्यांनी अन्य मधमाशीपालकांकडून मध व अन्य उत्पादने गोळा करण्यास सुरुवात केली. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्यांचा व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांच्या फायद्यामध्ये चांगली वाढ झाली.

स्थलांतराचे नियोजन
ब्रजेश कुमार वर्मा हे आपल्या ६०० मधपेट्यांसह सतत वेगवेगळ्या राज्यात स्थलांतर करत असतात. हे स्थलांतर मधमाश्यांसाठी आवश्यक आहारानुसार, फुलोरा असलेल्या पिकांच्या ठिकाणी केले जाते.

नोव्हेंबर ते मार्च या काळात लखनौ परिसरामध्ये मोहरी पिकामधून चांगला मध मिळतो. पुढे ते बिहार राज्यातील मुजफ्फरपूर, समस्तीपूर, दरभंगा या जिल्ह्यामध्ये जातात, येथे मार्च ते सप्टेंबर या काळात लिची, मका, बाजरी अशी पिके असतात. जवळच्या ठिकाणी स्थलांतरासाठी ब्रजेश यांनी नव्या जागाही शोधल्या आहेत. त्यात उत्तर प्रदेशातील कासगंज, मैनपूरी, फिरोझाबाद, उन्नाव आणि सीतापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या मधपेट्यांची देखरेख करणे, स्थलांतर करणे यासाठी त्यांच्याकडे काही कायमस्वरूपी कामगार आहेत.

सर्व शेतकऱ्यांना ३ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न
केवळ उत्तर प्रदेशातील नव्हे, तर बिहारमधील अनेक शेतकऱ्यांनीही ब्रजेश यांच्या यशातून प्रेरणा घेत स्वतःचा मधमाशीपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्याकडे मोफत शिकून मधमाशीपालन सुरू केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ६ हजारांपर्यंत पोहोचली आहे. केवळ प्रशिक्षण देऊनच न थांबता या शेतकऱ्यांना ब्रजेश सतत प्रोत्साहन देतात. समस्या आणि अडचणीमध्ये मदत करतात. यामुळे तरुणांमध्ये हा व्यवसाय वाढत चालला आहे. आज लखनौ जिल्ह्यातील सुमारे ११२० मधमाशीपालक हे ब्रजेश यांच्या अभिषेक ग्रामोद्योग संस्थानशी सरळ जोडलेले आहेत. या शेतकऱ्यांचे एकूण मध उत्पादन ३५० टन इतके असून, १५० किलो परागकण, १०० किलो प्रोपॅलीस यांचे उत्पादन घेतले जाते. या सर्व शेतकऱ्यांपर्यंत दरवर्षी सुमारे ३ कोटी रुपयांचे उत्पन्न पोचत आहे.

अन्य पूरक व्यवसाय 

  • या उत्पादनाच्या विक्री व व्यापारासाठी किरण इंटरप्रायझेस ही कंपनी स्थापन केली आहे. त्यासाठी एफएसएसएआयचे प्रमाणपत्र घेतले आहे.
  • अलीकडेच वर्मा यांनी मधपेट्या, त्यातील फ्रेम, मेणपट्ट्या, विविध प्रकारची झाकणे इ. निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आहे. ही उत्पादने अन्य सदस्य शेतकऱ्यांना तुलनेने स्वस्तामध्ये व त्वरित उपलब्ध केले जातात.
  • स्वतः वर्मा हे भारतीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय मध बोर्डाचे कायमस्वरूपी सदस्य आहेत. त्यांच्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. एकेकाळी केवळ उदरनिर्वाहासाठी झगडणाऱ्या वर्मा यांनी उत्तम आर्थिक प्राप्तीसोबतच अनेक राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियताही मिळाली आहे.

(स्रोत ः कृषी विज्ञान केंद्र, भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनौ, उत्तर प्रदेश)


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...
रेशीम शेतीतील समाधानकिनगाव (ता.यावल, जि.जळगाव) येथील समाधान भिकन...
शेतकऱ्यांच्या खात्रीची, सोयीची...राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ २०१८...
पापड, बेकरी उद्योगात तयार केली ओळखभादोले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील नसीमा...
गृहद्योगातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल...औरंगाबाद शहरातील संपदा अनिल बाळापुरे यांनी...
नागली उत्पादनांचा ‘स्टार बाइट’ ब्रॅण्डनाशिक ः  कोरोना संकटकाळात अनेकांनी संधी...
जागतिक दर्जाच्या शेतीतून वाटा केल्या...निघोज (जि. नगर) येथील आपल्या साठ एकरांत विज्ञान-...
निराधार विधवांना ‘शेक हॅंड’ फाउंडेशनचा...परभणी जिल्ह्यातील मांडळाखळी येथील शरद लोहट...
सालईबनला मिळाली नवी ओळखबुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनने...
मल्चिंग पेपर, ठिबकवर दोनशे एकरांत कांदा...शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी...
टेरेसवर द्राक्ष बागेचा फिलकांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या...
‘ड्रायझोन’मध्ये आली गंगाअमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे दोन्ही तालुके...
मल्चिंग पेपर, ठिबकवर दोनशे एकरांत...शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी...
मोबाईल अन्‌ प्रक्षेत्रभेटीतून मिळतोय...हवामान बदलाच्या काळात तातडीने हवामान, पीक नियोजन...
साहिवाल पालनात तरुणाने दाखवली जिद्दकुठल्याही व्यवसायात टक्के-टोणपे, यश -अपयश येतच...
कुक्कुटपालन, फलोत्पादनातून मिळवले...विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर दीपक खैरनार यांना...
पूरक उद्योगातून शेती झाली किफायतशीरभातशेतीसह पशुपालन व्यवसायामध्ये उतरत एकात्मिक...
प्रयोग, वैविध्यपूर्ण फळबागेतून अर्थकारण...मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी...
रोपवाटिका व्यवसायातून साधली प्रगतीकामशेत (ता. मावळ, जि. पुणे) येथील शुभांगी दळवी...
प्रयोगशीलतेतून वाढवले तुरीचे उत्पादनलोणी मसदपूर (ता. कर्जत, जि. नगर) येथील एकनाथ...