उसावरील ठिपके, तांबेरा, पोक्का बोइंग

सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे उसामध्ये पानावरील तपकिरी ठिपके, तांबेरा, पोक्का बोइंग या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. बदलते हवामान तसेच रोगग्रस्त बेण्याच्या वापरामुळे रोगांचा प्रार्दुभाव वाढत आहे. यासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
disease management in sugarcane crop
disease management in sugarcane crop

सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे उसामध्ये पानावरील तपकिरी ठिपके, तांबेरा, पोक्का बोइंग या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. बदलते हवामान तसेच रोगग्रस्त बेण्याच्या वापरामुळे रोगांचा प्रार्दुभाव वाढत आहे. यासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. तपकिरी ठिपके 

  •   जास्त पावसाचे प्रमाण असलेल्या भागामध्ये बुरशीमुळे हा रोग होतो. 
  •   जुन्या पानांच्या दोन्ही बाजूंवर अंडाकृती आकाराचे लालसर ते तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात. अशा ठिपक्या भोवती पिवळ्या रंगाचे वलय दिसते. 
  •   ठिपक्याचा मध्यभाग वाळून, सुकून करड्या रंगाचा ठिपका, सभोवती लाल कडा त्याला लागूनच पिवळे वलय असे एकमेकांत मिसळलेले असंख्य ठिपके निदर्शनास येतात.
  •   रोगाची तीव्रता वाढून पानांवरील ठिपक्यांची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकात मिसळून मोठे ठिपके तयार होतात. अशा ठिपक्यांमधील पेशी मरतात आणि प्रकाश संश्‍लेषण होत नाही. त्यामुळे उत्पादनावर आणि साखर उताऱ्यावर अनिष्ट परिणाम होतो. 
  •   प्रादुर्भाव वाढल्यास कांड्यांची लांबी व जाडी कमी होतो. 
  • नियंत्रण ( फवारणी : प्रति लिटर पाणी )

  •   मॅन्कोझेब ३ ग्रॅम
  • कार्बेन्डाझिम  १ ग्रॅम (ॲग्रेस्को शिफारस)
  • तांबेरा 

  • पावसाळ्यातील बुरशीजन्य रोग आहे. सुरुवातीस बुरशीचा प्रादुर्भाव पानाच्या दोन्ही बाजूंस होऊन पानावर लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपके वाढून त्यांचा रंग लालसर तपकिरी होऊन भोवती फिक्कट पिवळसर हिरवी कडा तयार होऊन, पानाच्या खालच्या बाजूस ठिपक्यांच्या जाग्यावर उंचवटे तयार होतात.
  • ठिपके फुटून नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. पानांवरील ठिपक्यांची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे ठिपके तयार होतात. या रोगग्रस्त ठिपक्यातील पेशी मरून जाऊन पाने करपलेली दिसून येतात. प्रकाश संश्‍लेषण क्रियेत व्यत्यय आल्याने उत्पादन घटते. 
  • नियंत्रण ( फवारणी : प्रति लिटर पाणी )

  • मॅन्कोझेब ३ ग्रॅम
  • टेब्युकोनॅझोल  १ मिलि
  • (ॲग्रेस्को शिफारस) पोक्का बोईंग 

  • ३-७ महिन्यांच्या उसामध्ये मॉन्सूनपूर्व पडलेला वळीव पाऊस आणि मॉन्सूनमुळे वाढलेल्या हवेतील आर्द्रतेमुळे हा रोग पानावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 
  • सुरवातीस बुरशीची लागण शेंड्यातून येणाऱ्या ३ अथवा ४ कोवळ्या पानावर दिसून येते.  पानाच्या खालच्या भागात सुरुवातीस फिक्कट हिरवट, पिवळसर, पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात. अशा पानांचा आकार बदलतो, लांबी कमी होते. खोडाकडील भाग अरुंद होऊन पाने एकमेकांत गुंफली जातात त्यामुळे ती पूर्णपणे उघडली जात नाही. 
  • प्रादुर्भावग्रस्त जुन्या पानांवर पिवळसर पट्ट्याच्या जागेवर वर्तुळाकार, लांब अरुंद वेगवेगळ्या आकाराचे लालसर ते तपकिरी ठिपके अथवा रेषा दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास शेंडे कूज व कांडी कापाची लक्षणे दिसतात. 
  • नियंत्रण ( फवारणी : प्रति लिटर पाणी )

  •   मॅन्कोझेब ३ ग्रॅम
  •   कार्बेन्डाझिम  १ ग्रॅम
  • एकात्मिक रोगनियंत्रण  

  • योग्य निचरा होणाऱ्या जमिनीत ऊस लागवड करावी.
  • नत्र खताचा जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. 
  • बेणे मळ्यातील निरोगी आणि कीडविरहित बेणे निवडावे. 
  • दर तीन वर्षांतून बेणे बदलावे. 
  • लागवडीखालील उसामध्ये काणी व गवताळ वाढ जास्त प्रमाणात असल्यास अशा उसाचा खोडवा घेऊ नये किंवा त्यामधील ऊस बियाणे म्हणून वापरु नये. अशी बेटे उपटून त्या ठिकाणी निरोगी ऊस बेण्याची लागण करावी. 
  • जमिनीद्वारे उद्‌भावणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून वाढणाऱ्या कोवळ्या अकुराचे व लहान रोपांचे संरक्षण करण्यासाठी बेणे कार्बेन्डाझिम द्रावणात (१०० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १०० लिटर पाणी) १० मिनिटे बुडवावे.
  • ऊस बेणेमळा तयार करताना बेणे प्रक्रिया करून रोगमुक्त बियाणे तयार करावे, असे बेणे लागवडीसाठी वापरावे.
  • बेण्याची उष्ण जल प्रक्रिया (५० अंश सेल्सिअस १-२ तास) अथवा बाष्पयुक्त उष्ण हवेची (५४ अंश सेल्सिअस ३-४ तास) प्रक्रिया करून लागवड करावी. 
  • ( टीप :  फवारणीच्या द्रावणात १ मिलि स्टिकर मिसळावा.)(ॲग्रेस्को शिफारस) - डॉ. सूरज नलावडे,  ९४०४६४७१२६ (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,  पाडेगाव, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com