agricultural news in marathi, drum stick crop advisory, Agrowon, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेवगा पीक सल्ला
डॉ. विजय काळे
शनिवार, 23 डिसेंबर 2017

सद्यस्थितीत राज्यात थंडीची तीव्रता वाढण्यास सुरवात झाली आहे. दुपारी उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत अाहे. अशावेळी शेवगा पिकात आंतरमशागत, नवीन बहरासाठी छाटणी आदी कामे हाती घ्यावीत. छाटणीनंतर योग्य खत व पाणी व्यवस्थापन करावे. त्यामुळे नवीन बहरातही शेंगांचे भरपूर उत्पादन मिळते.

आंतरमशागत व छाटणी :

सद्यस्थितीत राज्यात थंडीची तीव्रता वाढण्यास सुरवात झाली आहे. दुपारी उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत अाहे. अशावेळी शेवगा पिकात आंतरमशागत, नवीन बहरासाठी छाटणी आदी कामे हाती घ्यावीत. छाटणीनंतर योग्य खत व पाणी व्यवस्थापन करावे. त्यामुळे नवीन बहरातही शेंगांचे भरपूर उत्पादन मिळते.

आंतरमशागत व छाटणी :

  • झाडाच्या भोवताली व दोन झाडांच्या ओळींमधील माती कोळपणी करून हलवून घ्यावी. त्यामुळे तणनियंत्रणही होते तसेच माती भुसभूशीत झाल्याने मुळांना हवा मिळते. परिणामी भरपूर फुलधारणा व शेंगा लागतात. कोळपणीमुळे जमिनीतील भेगा बुजविल्या जाऊन जमिनीतील उपलब्ध ओलावा कायम राखता येतो.
  • शेवग्याच्या काही जातींना वर्षातून एकवेळा तर काही जातींना दोन वेळा बहर येतो. त्यामुळे उत्पादन काढल्यानंतर शेवग्याच्या झाडाची छाटणी करावी. म्हणजे फूल धारणा चांगली होऊन नवीन बहरातही भरपूर शेंगा लागतात.   

खत व पाणी व्यवस्थापन :

  • छाटणीनंतर प्रतिझाड चांगले कुजलेले शेणखत २-५ किलो व निंबोळी खत १००-२०० ग्रॅम लहान मोठ्या झाडानुसार द्यावे. अधिक उत्पादनासाठी प्रतिझाड नत्र ७५ ग्रॅम व स्फुरद ५० ग्रॅम अशी खतमात्रा द्यावी.
  • शेवगा पिकाला पाणी दिल्यानंतर झाडाची वाढ चांगली होते. परिणामी उत्पादन जास्त आणि दर्जेदार मिळते. जमिनीच्या मगदुरानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. सिंचनासाठी ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. कोरडवाहू भागामध्ये झाडांच्या वाफ्यात वाळलेल्या गवताचे किंवा काडीकचऱ्याचे आच्छादन करावे. आच्छादनामुळे वाफ्यामध्ये ओलावा अधिक काळ राहतो.

संपर्क :  डॉ. विजय काळे, ९४२१८१७९५८
(उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...