पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये साठवला जातो अधिक कार्बन

इंग्लंड येथील केंब्रिज विद्यापीठ आणि सिंगापूर येथीलएनटीयू येथील संशोधकांनी पृथ्वीच्या अंतर्भागातीलहालचालींमुळे विशेषतः टेक्टॉनिक प्लेटच्या होणाऱ्या टकरीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन शोषला जात असल्याचे निष्कर्ष काढले आहे.
Earth's interior is swallowing up more carbon
Earth's interior is swallowing up more carbon

इंग्लंड येथील केंब्रिज विद्यापीठ आणि सिंगापूर येथील एनटीयू येथील संशोधकांनी पृथ्वीच्या अंतर्भागातील हालचालींमुळे विशेषतः टेक्टॉनिक प्लेटच्या सावकाश गतीने होणाऱ्या टकरीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन शोषला जात असल्याचे निष्कर्ष काढले आहे.  पृथ्वीच्या अंतरंगातील अशा घटनांमुळे पूर्वी ज्ञात किंवा अपेक्षेपेक्षाही अधिक कार्बन शोषण शक्य होत असल्याचा दावा केला आहे. सामान्यतः पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध कार्बन साठवणीबाबत आणि त्यांच्या अंतर्गत एकमेकांवरील अवलंबित्वाबद्दल शास्त्रज्ञांना बऱ्यापैकी माहिती आहे. त्या तुलनेमध्ये पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये होत असलेल्या कार्बनच्या साठवणीबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. ही कार्बन साखळी लक्षावधी वर्षांच्या प्रचंड कालावधीची आहे. नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित केलेल्या निष्कर्षानुसार, ज्या ठिकाणी पृथ्वीचे दोन थर (टेक्टानिक प्लेट्स) आदळतात, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन जमिनीमध्ये गाडला जातो. ही प्रक्रिया ज्वालामुखीच्या विरुद्ध आहे. अशा प्रकारे साठवल्या जाणाऱ्या एकूण कार्बनच्या तुलनेमध्ये ज्वालामुखीतून केवळ एक तृतीयांश भाग बाहेर पृष्ठभागावर येतो.  संशोधकांचे मत... जागतिक वातावरण बदलासाठी कारणीभूत वायूमध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न होत आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कार्बनचे वर्तन किंवा साखळी कशी आहे? विशेषतः वातावरण, समुद्र, पृष्ठभाग, जीवन अशा अनेक प्रकारे कार्बन प्रवाहित होत राहतो. पृथ्वीचा पृष्ठभाग आणि सभोवतालच्या आकाशातील कार्बन साखळीचे घटक आजवर बारकाईने तपासले जात आहेत. त्याच प्रमाणे खोल पृथ्वीमध्ये लक्षावधी वर्षापासून कार्बन कसा साठवला जातो, त्याची साखळी नेमक्या कशा प्रकारे कार्यरत आहेत, याचाही अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे मत केंब्रिज विद्यापीठातील भूशास्त्र विभागातील संशोधक स्टिफन फरसांग यांनी सांगितले.   कार्बन डायऑक्साइड वातावरण परत जाण्याचे अनेक मार्ग आहे. मात्र पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये जाण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे पृथ्वीच्या थरांच्या हालचालीतून. थर एकमेकांवर चढण्यामुळे विविध अवस्थेतील कार्बन हा जमिनीत गाडला जातो. आजवर हाच कार्बन ज्वालामुखीच्या माध्यमातून पुन्हा वातावरणात फेकला जात असल्याचे मानले जात होते. मात्र नव्या संशोधनामुळे भूपृष्ठाखाली गाडला गेलेल्या कार्बनवर रासायनिक अभिक्रिया होत तो खोलवर जात असल्याचे पुढे आले. त्यातील काही भागच पुन्हा वर येऊ शकतो.   या संदर्भात युरोपियन सिंक्रोट्रॉन रॅडिएशन फॅसिलिटी येथील जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेत आणि तज्ज्ञांच्या साह्याने अभ्यास केला गेला. त्याविषयी बोलताना सिंगापूर येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान विद्यापीठ (एनटीयू) येथील अधिष्ठाता सिमॉन रेडफर्न यांनी सांगितले, की उच्च दबाव, तापमानामध्ये आणि अतिसूक्ष्म तीव्रतेमध्ये असतानाही विविध धातूचे मापन करण्याची क्षमता आहे. तितका दाब आणि तापमान प्रयोगशाळेमध्ये तयार करणे शक्य आहे. त्यासाठी सूक्ष्म दोन हिऱ्यांच्या ऐरणीमध्ये ती मूलद्रव्ये दाबली जातात. या संशोधनाला वाढत्या कार्बोनेट खडकाच्या पुराव्याने बळ मिळत आहे. जेंव्हा पदार्थ भस्मीभूत होत असताना काही रासायनिक क्रियांमुळे त्यातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते आणि मॅग्नेशिअमचे वाढते. या रासायनिक बदलामुळे कार्बोनेट कमी विद्राव्य होते. म्हणजेच ते ज्वालामुखीद्वारे बाहेर पडण्याचे कमी होते. कार्बोनेट सिंकमधील बहुतांश भाग हा तसाच राहून भविष्यात हिऱ्यांची निर्मिती होण्यास वाव राहतो. अशी काही मूलद्रव्ये हे तुलनेने अधिक स्थिर असून, त्यात घन स्वरूपामध्ये दीर्घकाळपर्यंत कार्बन डायऑक्साइड बांधला जाऊ शकतो. त्यातून उत्सर्जनाचा धोकाही कमी राहतो. अशाच काही कार्बन बांधून ठेवणाऱ्या बाबींचा शोध घेण्याचा प्रयत्न संशोधकांचा गट करत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com