agricultural news in marathi Economics of Native, Jersey, HF Cows | Page 3 ||| Agrowon

देशी, जर्सी, एचएफ गाईंचे अर्थशास्त्र

डॉ. प्रसाद पाटील, आर. बी. बाजड
मंगळवार, 4 मे 2021

 दुग्धोत्पादनासाठी गाईला अनेक ठिकाणी प्रथम स्थान दिले जाते. मात्र दुग्ध व्यवसाय सुरू करण्याअगोदर कोणत्या जातीच्या गाईचे पालन केल्यास अधिक नफा मिळेल, याविषयी अधिक माहिती घेतली पाहिजे.  
 

शेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय प्राधान्याने केला जातो. दुग्धोत्पादनासाठी गाईला अनेक ठिकाणी प्रथम स्थान दिले जाते. मात्र दुग्ध व्यवसाय सुरू करण्याअगोदर कोणत्या जातीच्या गाईचे पालन केल्यास अधिक नफा मिळेल, याविषयी अधिक माहिती घेतली पाहिजे. देशी गाई, जर्सी आणि एचएफ या गायींच्या जातींचे आर्थिक विश्‍लेषण पाहू. 

पशुपालनामध्ये पारंपरिक देशी जातीच्या तुलनेमध्ये  जर्शी आणि एचएफ गाईपासून प्रति वेत अधिक दूध उत्पादन मिळते. मात्र या गाई आपल्या स्थानिक वातावरणामध्ये कितपत तग धरतात, त्यासाठी चारा व खाद्यांवर होणारा खर्च यामुळे अलीकडे अनेक जण देशी गोपालन अधिक फायदेशीर असल्याचे सांगतात. अशा वेळी त्यांचे प्रति वेत दूध उत्पादन, होणारा खर्च आणि एकूण आर्थिक विश्‍लेषण करून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. 

देशी गाय 
जिच्या पाठीवर वशिंड आणि गळ्याला पोळ आणि मूलतः भारतीय असलेली गाय होय. 

परदेशी गाय 
जर्सी व एचएफ या गायजातीमध्ये पाठीवर वशिंड नाही, गळ्याला पोळ नसलेल्या आणि मूलतः पाश्‍चात्त्य देशातील (फ्रान्स, आइसलॅंड, नेदरलॅंड) येथील गाई होय. 

सध्या ग्रामीण भागामध्ये देशी गायीपाठोपाठ जर्शी गाई सर्वत्र आढळून येतात. काही ठिकाणी तर देशी गाईपेक्षाही परदेशी गाईंचे प्रमाण वाढलेले दिसून येते. त्यामागील कारणांचा विचार केला असता परदेशी (जर्सी आणि एचएफ) गाईंचे वार्षिक दूध उत्पादनक्षमता अधिक आहे. तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे देशी गाय आणि जर्शी, एच एफ गायी यांच्या वार्षिक दूध उत्पादन क्षमतेत खूप फरक आहे. पुणे, मुंबई व कोल्हापूर वगळता देशी गाय म्हणून दुधाचे मार्केटिंग न केलेल्या ठिकाणी स्थानिक बाजारपेठेतील देशी गाय व जर्सी, एचएफ गाईच्या दुधाला जवळपास सारखीच किंमत मिळते. 

  • देशी गाईच्या तुलनेत जर्शी व एचएफ जातीच्या गाईंमध्ये वार्षिक दूध उत्पादनक्षमता जास्त आहे. स्निग्धांशाचे (फॅट) प्रमाणही सारखेच आहे. 
  • पुणे, मुंबई व कोल्हापूर या ठिकाणी देशी गाईंच्या (गीर, साहीवाल, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ) दुधाचे दर जरी प्रति लिटर जास्त (६० ते ७० रु.) आहेत. मात्र या गायींची प्रतिदिन दूध देण्याची क्षमता ५ ते १० लिटर एवढीच आहे. जर्सी, एचएफ गाईंची प्रति दिन दूध देण्याची क्षमता सरासरी २० लिटर आहे. या गाईंच्या दुधाचे दर स्थानिक बाजार पेठ व फॅटनुसार बदलतात. शिवाय खाद्य, संगोपन व अन्य देखभाल खर्च हा देशी गाई आणि जर्सी, एच एफ गाई यांना जेमतेम सारखाच येतो. देशी गाईंचे दूध म्हणून वेगळी मार्केटिंगची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांसाठी जर्शी व एचएफ या परदेशी गाई दुग्धोत्पादनासाठी योग्य ठरतील असे वाटते. 
  • देशी गायीच्या तुलनेत जर्शी व एचएफ गाईपासून मिळणारे उत्पन्न जास्त आहे. शिवाय या गाईंच्या दुधापासून आपण तूप, खवा, पनीर, दही यांसारखे प्रक्रियायुक्त पदार्थ घरगुती पातळीवर बनवून स्थानिक बाजारपेठेत त्यांची विक्री करू शकतो. स्थानिक बाजार पेठेत गायीचे तूप साधारणतः ४३२ ते ८५० रु. प्रति किलो प्रमाणे विकले जाते. पनीर २५० ते ३०० रू. प्रति किलो दराने विकले जाऊ शकते. 

गोपालनाची दोन उदाहरणे

  •   पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बीबी येथील मंडली किशन मंडाळ यांनी लॉकडाउनच्या काळात एका एचएफ गाईपासून दूध व्यवसायास सुरुवात केली. दोन महिन्यांमध्ये दूध विक्रीच्या नफ्यात शिलकीतील काही रक्कम मिसळून चार गाई विकत घेत आपला दूध व्यवसाय वाढवला. गाईंच्या खाद्य व्यवस्थापन आणि दिवसाला सात किलो रतीब यामुळे एक गाय दिवसाला चाळीस ते पंचेचाळीस लिटर दूध देते. महिन्याला बहुतांश खर्च वजा जाता त्यांना तीस हजार रुपयांपर्यंत नफा होतो.
  •   गीर, साहीवाल, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व अन्य देशी गाईंच्या दुधापासून शुद्ध तूप, खवा यांच्या निर्मिती केल्यास फायदा राहू शकतो. या तूप, खवा यांच्यासाठी पुणे, मुंबई व कोल्हापूर, नागपूर, वर्धा तसेच स्थानिक बाजारपेठेत उत्तम दराने विक्री होऊ शकते. वर्धा जिल्ह्यातील आमगाव मदनी येथील राधाकृष्ण गोसेवा प्रकल्पाचे संचालक नंदकिशोर गावंडे हे गवळाऊ गाईपासून मिळणारे दूध, दुधापासून खवा व अन्य उत्पादन उदा. पेढा, पनीर, दही, ताक, तूप तयार करून विकतात. सोबत गोमूत्र अर्क, फिनाईल, शेणाची उत्पादने यांचे उत्पादन घेतात. म्हणजेच देशी गाईंचे पालन करताना अन्य प्रक्रिया उत्पादनाच्या निर्मितीला प्राधान्य दिल्यास अधिक फायदेशीर ठरत असल्याचे त्यांचे मत आहे. 

- डॉ. प्रसाद पाटील,  ९५८८६१२५६१,
आर. बी. बाजड,  ८८३०९००४०५
(दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, वरूड, पुसद)


इतर कृषिपूरक
पशुपालन सल्लापावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
जंतनाशकाप्रती प्रतिकार तयार होण्याची...जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
ओळखा जनावरांतील जंताचा प्रादुर्भाव...जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची...
गोचीडनाशकांबाबत प्रतिकारक्षमता...गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता...
फायदेशीर गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानगर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी...
जनावरांमध्ये योग्य पद्धतीने जंतनिर्मूलनजंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया...
वासरांच्या वाढीसाठी मिल्क रिप्लेसरमिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश...
गाई, म्हशींतील कासदाहवर उपाययोजनाकासदाहाची लक्षणीय कासदाह व सुप्त कासदाह असे दोन...
मत्स्य संवर्धनासाठी तळ्याचा आराखडामत्स्य संवर्धनासाठी लागणारे तळे हे शेततळ्यापेक्षा...
वराह फार्मचे व्यवस्थापन...वराहपालन सुरू करताना फार्मचा आकार आणि वराह...
उष्णतेच्या ताणापासून दुधाळ जनावरांची...वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
गाई, म्हशींमधील छातीचे आजारजनावरांमधील छातीच्या आजारामुळे दुग्धोत्पादनावर...
वराहपालन सुरू करताना...वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून...
गीर संवर्धन करणारा भरवाड समुदायभरवाड समुदायासाठी गीर गोवंश संपत्ती आहे....
बहुगुणी मधाची शुद्धता अन् उपयोग मधमाश्यांपासून मधासोबतच अन्य मौल्यवान...
कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाश्या...जागतिक मधमाशी दिवस विशेष वाढते शेतीक्षेत्र,...
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआआंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची...
दुधाळ जनावरांमधील माज ओळखण्याच्या...दुधाळ जनावरांतील व्यवस्थापनामध्ये मुख्य कार्य...