agricultural news in marathi Efforts are required to increase the nutritional value of the diet | Agrowon

आहाराची पोषकता वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्यक

शुभांगी वाटाणे
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

सप्टेंबर महिना हा देशपातळीवर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत आहे. लोकांना पोषणाचे महत्त्व समजून देताना, पोषकता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
 

सप्टेंबर महिना हा देशपातळीवर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत आहे. लोकांना पोषणाचे महत्त्व समजून देताना, पोषकता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

वाढत्या धकाधकीच्या आणि प्रदूषणाच्या काळात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देणे अवघड होत चालले आहे. जाता जाता खाता येणाऱ्या बेकरी उत्पादनांना व बिस्किटासारख्या पदार्थांचा वापर वाढला आहे. यातील मैद्यामुळे हे पदार्थ पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. केवळ चविष्ट म्हणजे आरोग्यासाठी चांगले असे होत नाही. अशा स्थितीमध्ये पोषक आणि सुरक्षित आहाराची निर्मिती आणि वापर याकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. आपला आहार कसा असावा हे समजून घेऊन कृतीत आणण्याची वेळ आलेली आहे.

अन्न हे शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे, ऊर्जानिर्मिती, कार्यशक्ती अशा अनेक कारणांसाठी उपयोगी असते. आहार पोषणदृष्ट्या समतोल असणे गरजेचे आहे. त्यातून योग्य प्रमाणात कर्बोदके, प्रथिने, पाणी, जीवनसत्त्व व खनिज द्रव्ये यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व्हायला हवा. कोणत्याही एकाच प्रकारच्या खाद्यपदार्थांतून शरीरासाठी आवश्यक त्या सर्व घटकांची पूर्तता होत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे घटक, भाज्या, फळे, मांस, मासे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचे योग्य प्रमाण आहारात असेल याची खात्री करावी. शरीर, मेंदू आणि स्नायूंच्या योग्य वाढीसाठी संमिश्र व समतोल आहार घ्यावा. कुटुंब प्रमुखांसह स्वयंपाक करणाऱ्या महिलेने घरातील लहानांपासून वयस्करांपर्यंत सर्वांचा आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तशा प्रकारे नियोजन करावे.

समतोल आहारासाठी आवश्यक सर्व अन्नगट

 • तृणधान्य व त्यांचे पदार्थ
 • डाळी व कडधान्य
 • दूध व मांस
 • फळे व भाज्या
 • साखर

इकडे लक्ष द्या...

 • आजारी व पचनसंस्था खराब असलेल्या व्यक्तींनी हलका परंतु पुरेसा आहार घेतलाच पाहिजे.
 • गर्भवती आणि स्तनदा मातेने दोन ते तीन विभागून भरपूर, संतुलित आणि पोषक आहार घ्यावा.
 • हिरव्या पालेभाज्या, फळे आणि सर्व प्रकारच्या भाज्यांचा भरपूर वापर करावा.
 • तेल व मांसाहारी अन्नपदार्थांचा आहारात मध्यम प्रमाणात वापर करावा.
 • वनस्पती तुपाचा वापर कमी प्रमाणात करावा.
 • मिठाचा वापर अतिरिक्त करू नये. खारवलेले पदार्थ उदा. लोणचे वगैरे प्रमाणातच खावे.
 • अन्न नेहमी स्वच्छ व सुरक्षित असावे.
 • पुरेसे पाणी प्यायला हवे. कार्बोनेटेड शीतपेयांचा वापर शक्यतो टाळावा.

अन्न तयार करताना...

 • भाज्या कापण्यापूर्वी धुऊन घ्याव्यात. कापल्यानंतर धुतल्यास त्यातील पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आणि क्षार नष्ट होतात.
 • तांदूळ खूप चोळून धुऊ नयेत. खूप चोळून धुतल्यास ‘ब’ जीवनसत्त्व पाण्यात वाहून जाते. त्याऐवजी गढूळ झालेले पाणी काढून टाकावे.
 • पोळ्या किंवा भाकरी करण्यासाठी गहू किंवा ज्वारीचे पीठ शक्यतो न चाळताच वापरावे. यातील कोंड्यामुळे पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते.
 • अंकुरित धान्ये व आंबवलेले पदार्थ यांचा अन्न शिजवताना वापर करावा. यामुळे पोषणमूल्ये वाढतात. शिजविण्यासाठी वेळ कमी लागतो.
 • अन्न शिजवताना शक्यतो सोड्याचा वापर टाळावा. सोड्यामुळे ‘ब’ जीवनसत्त्वाचा नाश होतो. तेल जास्त शोषले जाऊन अन्न पचनास जड होते.
 • अन्न शिजविण्यासाठी लोखंडी तवा व कढईचा वापर केल्यास लोहाची उपलब्धता वाढते.
 • अन्न शिजवताना चिंच, कोकम यांचा वापर करावा. यामुळे जीवनसत्त्व ‘ब’ आणि ‘क’ मध्ये वाढ होते.

- शुभांगी वाटाणे, ९४०४० ७५३९७
(गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम)


इतर महिला
केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगतीशिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
भरड धान्ये : पोषक तत्त्वांचे आगरभारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे...
रक्तक्षय होण्याची कारणे अन् उपाययोजना...मुलांच्या वाढीच्या काळात, स्त्रियांच्या गरोदरपणात...
आहाराची पोषकता वाढविण्यासाठी प्रयत्न...सप्टेंबर महिना हा देशपातळीवर ‘राष्ट्रीय पोषण...
सुदृढ बालकांसाठी स्तनदा मातांना पोषक...ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडमोर्डे (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) हे डोंगराळ...
गृहोद्योगातून मिळाला उन्नतीचा मार्गज्या कुटुंबातील महिलांनी पुढाकार घेऊन शेतीपूरक...
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
दूषित अन्नापासून सावध राहा...म्यूकरमायकोसिस दुर्मीळ बुरशीजन्य संसर्ग आहे. याला...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
आरोग्यदायी द्राक्ष द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित...
काकडीवर्गातील आरोग्यदायी झुकिनीझुकिनी ही कुकुरबीटासी कुळातील असून, खरबूज,...