agricultural news in marathi Electric trucks can totally compete with diesel trucks — they just need fast chargers | Agrowon

इलेक्ट्रिक वाहने डिझेल वाहनांशी नक्कीच स्पर्धा करतील

वृत्तसेवा
सोमवार, 19 एप्रिल 2021

डिझेल इंजिनवर चालणारी वाहने आणि शेतीपयोगी यंत्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय अधिक कार्यक्षम, आर्थिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. वाढत चाललेल्या तंत्रज्ञानाच्या सुधारणांमुळे लवकरच डिझेल इंजिनला पूर्णपणे पर्याय देणे शक्य असले, तरी बॅटरी आणि वेगवान चार्जिंगसाठी योग्य त्या पायाभूत सुविधांची उभारणी करणे गरजेचे असल्याचे मत शास्त्रज्ञ व्यक्त करतात.
 

डिझेल इंजिनवर चालणारी वाहने आणि शेतीपयोगी यंत्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय अधिक कार्यक्षम, आर्थिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. वाढत चाललेल्या तंत्रज्ञानाच्या सुधारणांमुळे लवकरच डिझेल इंजिनला पूर्णपणे पर्याय देणे शक्य असले, तरी बॅटरी आणि वेगवान चार्जिंगसाठी योग्य त्या पायाभूत सुविधांची उभारणी करणे गरजेचे असल्याचे मत शास्त्रज्ञ व्यक्त करतात.

अवजड वाहन उद्योगामध्ये डिझेल इंजिनला आर्थिकदृष्ट्या मागे टाकण्याची क्षमता विद्यूत वाहनांमध्ये नक्कीच असल्याची बाब शास्त्रज्ञांकडून सातत्याने सांगितली जात आहे. विद्युत वाहनातील बॅटरीच्या क्षमतेमध्ये सातत्याने वाढ होत असून, त्या तुलनेमध्ये चार्जिंग प्रणाली सुधारण्याची गरज आहे. अवजड वाहतूक उद्योगातून जागतिक पातळीवर होत असलेल्या कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण सध्या १४ टक्के इतके आहे. नव्या इलेक्ट्रिक वाहनांमुळे नक्कीच कमी होईल, आणि पर्यावरणावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.

स्वीडन येथील स्टॉकहोम पर्यावरण संस्थेमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे.

इलेक्ट्रिक वाहनाच्या बाबतीत घेतले जाणारे आक्षेप 
ट्रक, ट्रॅक्टर अशा अवजड कामे करणाऱ्या यंत्रामध्ये सध्या डिझेल इंजिन प्रामुख्याने वापरली जातात. त्यामागे डिझेल इंजिनची किंमत, त्याची वजन वाहण्याची अधिक क्षमता आहे. तितक्याच क्षमतेने काम करण्यासाठी अधिक बॅटरीज वापराव्या लागतील. या अधिक बॅटरींमुळे वजन आणि प्रारंभिक किमतीमध्ये होणारी वाढ सर्वसामान्यांना परवडणारी असणार नाही, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. स्वीडन येथील स्टॉकहोम पर्यावरण संस्थेमध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यासामध्ये इलेक्ट्रिक वाहने ही डिझेल इंजिनच्या क्षमतेच्या जवळ आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याविषयी माहिती देताना संस्थेतील संशोधक बीजोर्न न्यक्विस्त यांनी सांगितले, की बॅटरी तंत्रज्ञानामध्ये वेगाने सुधारणा होत आल्यामुळे इलेक्ट्रिक ट्रक किंवा ट्रॅक्टर हे शास्त्रीयदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या स्पर्धा करू शकतील. मात्र एका घटकांमध्ये अद्यापही प्रचंड सुधारणा होणे गरजेचे आहे, ते म्हणजे वेगाने चार्जिंग. आम्ही केलेल्या विश्‍लेषणामध्ये चार्जिंगची उपलब्धता, ते वेगाने होणे या दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार असल्याचे दिसून आले.

संशोधकांनी प्रारूपामध्ये इलेक्ट्रिक ट्रक ४.५ तासांपर्यंत चालवला. त्यानंतर ४० मिनिटे उच्च क्षमतेच्या चार्जरद्वारे चार्ज केला. त्याचे आर्थिक विश्‍लेषण केले असता प्रति टन- कि.मी. क्षमता सुधारल्याचे दिसून आले. अधिक वजन क्षमतेमध्ये त्यांचा वापर शक्य असून, ऊर्जेमध्ये बचतही शक्य होते. वाहतूक क्षेत्रामध्ये दुर्गम प्रदेशामध्येही चार्जिंगच्या पायाभूत सुविधांची उभारणी करणे हे धोरणात्मक आव्हान आहे. सध्या व्यावसायिक वेगवान चार्जर उपलब्ध नाहीत.

अवजड वाहने ही हलक्या वाहनाच्या तुलनेमध्ये अधिक डिझेल प्रति कि.मी. वापरतात. तितक्याच क्षमतेने इलेक्ट्रिक वाहने चालतील का, हा प्रश्‍नही आता सुधारित तंत्रज्ञानामुळे मागे पडणार आहे. उलट इलेक्ट्रिक वाहनांमुळे इंधन किंवा ऊर्जेमध्ये प्रचंड बचत साधणे शक्य होईल.

असा वाढतोय इलेक्ट्रिक वाहन उद्योग
अमेरिका आणि कॅनडामध्ये दोन डझन वाहन उद्योग इलेक्ट्रिक वाहने, ट्रॅक्टर किंवा शेतीपयोगी अशा ७० यंत्रांच्या उत्पादनामध्ये व्यस्त आहेत. त्याचे प्रमाण वाढून आता ३० कंपन्या आणि ८५ इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत पोहोचले आहे. या उद्योगांमध्ये नामांकित टेसला सेमी, वॉलमार्ट, डीएचपी, युपी आणि पेप्सिको यांच्यासह अरायव्हल, रिव्हियन आणि निकोला यांचा समावेश आहे.

  • सध्या या इलेक्ट्रिक वाहने, यंत्रांच्या किंमती अधिक असून, वाढत चाललेल्या उत्पादनासोबत त्या कमी होण्याची शक्यता आहे.
  • तीच बाब बॅटरीच्या किंमतीची आहे. गेल्या दशकामध्ये बॅटरीच्या किमतीमध्ये ८९ टक्क्यांनी घसरण झाली. पुढे ती आणखी घसरण्याचीच शक्यता आहे. ब्लुमबर्ग एनईएफ यांच्या वार्षिक बॅटरी किमतीच्या सर्वेक्षणानुसार लिथियम आयन बॅटरीच्या किमतीमध्ये २०२० मध्ये १३ टक्क्यांनी घट झाली.
  • डिझेल इंजिनचा वापर केला जात असलेल्या वाहने, यंत्रामुळे पर्यावरणातील प्रदूषण हे वेगाने वाढत आहे. एकट्या अमेरिकेत २००५ मध्ये ते सर्वोच्च पातळीवर होते. त्यानंतर थोडे स्थिर झाल्यानंतर पुन्हा २०१२ नंतर त्यात वाढ होत चालली आहे. २०१६ मध्ये वाहतूक उद्योगामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश झाला. अर्थात, त्याचे प्रमाण अद्यापही बॅटरी आणि चार्जिंग या दोन्ही मर्यांदामुळे कमी आहे.
  • हा अभ्यास जर्नल ज्यूल मध्ये प्रकाशित करण्यात आला.

 


इतर टेक्नोवन
ऊर्जा बचतीचे महत्त्वाचे उपाय...ऊर्जा वापरणाऱ्या तंत्रज्ञानात दिवसेंदिवस सुधारणा...
हवेतील त्रिमितीय प्रतिमेशी बोलणेही शक्यहवेसोबत हलू शकणाऱ्या प्रत्यक्षदर्शी प्रतिमा तयार...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अन्न प्रक्रियेसाठी ‘थ्री डी प्रिंटिंग’...सर्वसामान्यपणे आपल्याला विविध आकारातील कुकीज,...
अधिक शाश्वत उत्पादकतेसाठी वनस्पतीतील...प्रत्येक सजीवामध्ये, अगदी वनस्पतीमध्येही दडलेले...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
टोमॅटो प्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणेटोमॅटोचा ही नाशवंत फळभाजी असल्यामुळे काढणीनंतर...
गूळ पावडर सुकवण्याचे तंत्रज्ञानगूळनिर्मिती उद्योगामध्ये पावडरनिर्मिती हा आणखी एक...
नव्या रंगामुळे एअर कंडिशनिंगची गरज होईल...जागतिक तापमान वाढीसाठी एअर कंडिशनिंग यंत्रणा आणि...
सौरऊर्जा पार्क निर्मितीमध्ये व्हावा...भविष्यामध्ये सौरऊर्जेचा वापर वाढत जाणार आहे....
इलेक्ट्रिक वाहने डिझेल वाहनांशी नक्कीच...डिझेल इंजिनवर चालणारी वाहने आणि शेतीपयोगी...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये...
सायकलचलित गिरणीमुळे घरगुती पीठ मिळवणे...नागपूर : उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील...
कोकरांच्या वेगवान वाढीसाठी मिल्क...मेंढ्यांच्या मांसाला वाढणारी मागणी पुरवण्यासह...
निचऱ्यासाठी मोल नांगर, सबसॉयलरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
पीकविषयक माहितीसाठी मोबाईल ॲपकोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली...
मालमत्ता मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा...पंचायतराज मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार तयार...
शेती व्यवस्थापनात सेन्सर तंत्रज्ञानड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा...
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापरउसासाठी योग्य ठिबक सिंचन शक्यतो १६ मी.मी....