Crab, Mussel conservation
Crab, Mussel conservation

कांदळवन संवर्धनातून रोजगारनिर्मिती

कांदळवन हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील वन परिसंस्थेचे प्रतिनिधित्व आहे. मुख्यत: सदाहरित जंगले व उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय किनाऱ्यावरील पाण्याच्या जमिनीवर वसलेल्या झाडीस कांदळवन म्हणतात.

कांदळवन हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील वन परिसंस्थेचे प्रतिनिधित्व आहे. मुख्यत: सदाहरित जंगले व उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय किनाऱ्यावरील पाण्याच्या जमिनीवर वसलेल्या झाडीस कांदळवन म्हणतात. कांदळवन ही अत्यंत उत्पादक परिसंस्था आहे. भारतामधील सुमारे १४ प्रमुख, ४४ मध्यम आणि १६२ लघू नद्या या वेगवेगळ्या मार्गांद्वारे समुद्राला जाऊन मिळतात. भारताला ८१२९ किलो मीटर अंतराचा समुद्र किनारा लाभलेला आहे. सर्वांत जास्त नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. जेव्हा नद्या समुद्रास जाऊन मिळतात, तेव्हा त्याजवळच्या भागास खारफुटी असे म्हणतात किंवा खाडी जमीन म्हणतात.  कांदळवन (खारफुटी) हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील वन परिसंस्थेचे प्रतिनिधित्व आहे. मुख्यत: सदाहरित जंगले व उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय किनाऱ्यावरील पाण्याच्या जमिनीवर वसलेल्या झाडीस कांदळवन म्हणतात. कांदळवन ही अत्यंत उत्पादक परिसंस्था आहे. कांदळवनाचे (खारफुटी) महत्त्व

  • खारफुटीच्या मुळांमुळे समुद्र किनाऱ्यावरील पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी मदत होते.
  • किनारपट्टीवरील मातीची धूप रोखली जाते. सुनामी, चक्रीवादळ आणि पुरापासून संरक्षण मिळते.
  • नैसर्गिक पोषक तत्त्वांचा पुनर्वापर वाढण्यास मदत होते. 
  • खारफुटी हे असंख्य वन्यजीवनास आधार देणास महत्त्वाची भूमिका बजावतात. 
  • माशांची पैदास आणि संगोपनासाठी एक सुरक्षित व अनुकूल वातावरण मिळते.
  • औषधनिर्मितीसाठी उपयुक्त आहे.  
  • खारफुटीच्या वृक्ष हे स्थानिक समूहाच्या लोकांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करून देतात. 
  • मासे व कोळंबी प्रजननासाठी एक केंद्र आहे. 
  • जमीन व पर्यावरणाचा ऱ्हास कमी होतो. समुद्राचे प्रदूषण कमी होते.
  • वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड मोठ्या प्रमाणामध्ये शोषून घेण्यास मदत होते.  
  • जागतिक तापमान वाढीच्या नियंत्रित करण्यास मदत होते. 
  • कांदळवन हे एक सुंदर निसर्ग पर्यटन आहे. 
  • रासायनिक व घातक विषारीद्रव्य पदार्थांपासून संरक्षण मिळते.
  • देशातील कांदळवनाची स्थिती

  • देशाच्या ८ ते १० राज्यांमध्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांच्या किनारपट्टीलगत कांदळवन आढळते. सुंदरबन (पश्‍चिम बंगाल) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कादळवनाच्या प्रजाती आढळून येतात. जागतिक कांदळवनांच्या एकूण क्षेत्रापैकी  ३.३ टक्के कांदळवन प्रतिष्ठान हे भारतामध्ये आहे. 
  • भारतामध्ये गेल्या दशकापासून कांदळवन क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे (कांदळवन प्रतिष्ठान, महाराष्ट्र शासन). अशा जमिनीवर कांदळवन वृक्ष हे मोठ्या प्रमाणात वसलेला आहे.
  • महाराष्ट्रामध्ये ७२० किलोमीटर अंतराचा समुद्र किनारा लाभला आहे. २००५ ते २०१९  या कालावधीत महाराष्ट्रातील किनारपट्टी जिल्ह्यातील कांदळवन क्षेत्रामध्ये १६ टक्के वाढ झाली असल्याचे भारतीय वनविभागाच्या अहवालानुसार आणि  भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने (आयआयएसटी) केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. सध्याची परिस्थिती कांदळवन क्षेत्र ४८. ७९ चौरस किलोमीटर दर्शविण्यात आहे आहे. महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सर्वाधिक कांदळवन क्षेत्र आहे. सुमारे २२.२० चौरस किलोमीटर क्षेत्रावर खारफुटी वृक्षाची लक्षणीय वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ  मुंबई शहर व उपनगरामध्ये कांदळवन क्षेत्रफळ १२.९० चौरस किमीने वाढले आहे. ठाणे जिल्ह्यात ६.४० चौरस कि.मी.च्या कांदळवन क्षेत्राची भर पडली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अनुक्रमे १.०१ आणि ०.३०० चौरस किमी वाढ झाली आहे.
  • महाराष्ट्रातील कांदळवनाच्या प्रजाती  महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कांदळवांच्या एकूण २० प्रजाती आढळून येतात. २०२० मध्ये  महाराष्ट्र राज्याचा कांदळवन वृक्ष म्हणून “पांढरी चिप्पी” या प्रजातीला महाराष्ट्र शासनाने घोषित केले आहे. (संदर्भ : कांदळवन कक्ष, महाराष्ट्र शासन)

    शास्त्रीय नाव सामान्य नाव
    एव्हिसेंनिया मरीना    तिवर
    सोन्नेरेशिया अल्बा ग्रिफ पांढरी चिप्पी
    ब्रूगेरा सिलेंड्रिका लहान कांदळ
    राइझोफोरा अपिकुलाटा  मोठे कांदळ
    राइझोफोरा म्यूक्रोनाटा    लाल कांदळ
    एव्हिसेंनिया ऑफिसिनेलिस  भारतीय तिवर

    कांदळवन उपजीविकाविषयक योजना कांदळवन परिसंस्थेचे संरक्षण हे भारतीय वन कायदा अंतर्गत केले जाते. महाराष्ट्रात कांदळवन क्षेत्र आणि कांदळवन प्रतिष्ठान  हे महाराष्ट्र शासनाने सन २०१७ या साली निर्माण केले आहे. हे प्रतिष्ठान राज्यातील  कांदळवन क्षेत्रात वाढ व देखभाल करण्यासाठी काम करते. तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांमध्ये कांदळवन लागवड व जोपासना करते. 

  • शोभिवंत माशांचे संवर्धन
  • जिताडा माशांचे पिंजऱ्यातील संवर्धन
  • शिंपले संवर्धन
  • खेकडा संवर्धन, इत्यादी 
  • सर्व योजनेचा लाभ खाडीलगतच्या कांदळवन क्षेत्र असलेल्या गावांकरिता आहे. या योजनांचा लाभ हा गटामध्ये विभागून दिला जातो. यामध्ये ९० टक्के अनुदान शासनातर्फे दिले जाते तर १० टक्के रक्कम सर्व लाभार्थ्यांकडून जमा करून घेतली जाते. जर कोणाला वैयत्तिक लाभ घ्यायचा असेल, तर त्याच्याकडे १ एकर जमीन हे कांदळवन क्षेत्र असणे आवश्यक आहे, अशा लाभार्थ्यांना शासनाकडून ७५ टक्के अनुदान प्राप्त होते आणि २५ टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावी लागते.  सर्व योजनांच्या अधिक माहितीसाठी संकेतस्थळ http://www.mangroves.maharashtra.gov.in - रामेश्‍वर भोसले,  ९८६०७२७०९० (संशोधन विद्यार्थी, मत्स्य महाविद्यालय व संशोधन संस्था, थुतुकुडी, तमिळनाडू) - मसूद मुख्तार मणियार,  ९९६०९८६८६७ (प्रकल्प सहयोगी, कांदळवन प्रतिष्ठान, म्हसळा,जि.रायगड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com