agricultural news in marathi Equipment useful for amla processing | Agrowon

आवळा प्रक्रियेसाठी उपयुक्त उपकरणे

चंद्रकला सोनवणे
गुरुवार, 7 ऑक्टोबर 2021

आवळ्यापासून तयार केलेल्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आवळ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध यंत्रांची आवश्‍यकता असते. त्याविषयी खालील लेखात माहिती घेऊ.

आवळा फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असून, यात अनेक औषधी गुणधर्म असतात. कच्च्या स्वरूपातील आवळ्यात आरोग्यदायी गुणधर्म अधिक असले तरी तुरट चवीमुळे अनेक जण खाणे टाळतात. त्यावर प्रक्रिया करणे उत्तम पर्याय ठरतो. आवळ्यापासून तयार केलेल्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आवळ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध यंत्रांची आवश्‍यकता असते. त्याविषयी खालील लेखात माहिती घेऊ.

आवळा स्वच्छ करण्याचे यंत्र (वॉशर)
आवळा फळांची स्वच्छता आणि धुण्यासाठी वॉशर हे उपकरण वापरतात. या यंत्रामध्ये आवळे टाकल्यानंतर त्यावर नोझलच्या साह्याने पाण्याची फवारणी केली जाते. या उपकरणाच्या मदतीने प्रति तास ६० ते ८० किलो आवळा फळे स्वच्छ केले जातात. उपकरण संपूर्णपणे स्टेनलेस स्टीलपासून बनविले असून, त्यास २४० व्होल्ट विजेची आवश्यकता असते. यंत्राला ०.५ एचपी विद्युत मोटार जोडलेली असते. यंत्राचा आकार ४ बाय २ फूट एवढा असून, वजन ९० किलो असते.

आवळा फळ टोचण्याचे यंत्र (पंचिंग मशिन)
मोरावळा, कॅण्डी बनवण्यासाठी आवळ्याला टोचे मारले जातात. हे काम हाताने करताना हाताला इजा होण्याची शक्यता असते. आवळा पंचिंग हे उपकरणं आवळा फळास पंचिंग करण्यासाठी वापरले जाते. या यंत्रामध्ये वरील बाजूने आवळा टाकला जातो. आत मध्ये लावलेल्या धारदार खिळ्याच्या साह्याने आवळ्याला छिद्रे पाडली जातात. हे उपकरण पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचे बनवलेले असून, यंत्राची क्षमता प्रति तास ८० किलो इतकी आहे. हे विजेवर चालणारे यंत्र असून, यात १ एचपी क्षमतेची विद्युत मोटार जोडलेली असते. यंत्राला २२० व्होल्ट ऊर्जा लागत असून, ते सिंगल फेजवर चालते. यंत्राचे वजन ४० किलो आहे. आवळा पंचिंगसाठी बाजारामध्ये मनुष्यचलीत यंत्रही उपलब्ध आहे. त्याची किंमत साधारणपणे १० हजार रुपये आहे.

आवळा फोडण्याचे यंत्र (ब्रेकिंग मशिन) 
आवळा प्रक्रियेमध्ये फोडलेल्या आवळ्याचा वापर कॅण्डीसह अनेक पदार्थांमध्ये केला जातो. आवळ्याचे तुकडे करताना आतील बियांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. कारण इजा झालेल्या किंवा खराब झालेल्या बियांचा वापर बियाण्यांसाठी करता येत नाही. या यंत्रामध्ये बियाण्यांची क्षमता आणि औषधी गुणधर्म घटणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे. यंत्रामधून प्रति तास २०० किलो आवळा फोडला जातो. या यंत्रामध्ये अर्धा एचपी क्षमतेची विद्युत मोटार वापरलेली आहे. यंत्राचे काही भाग फूड ग्रेड स्टीलपासून बनवलेले आहेत. हे यंत्र सिंगल फेजवर चालत असून, त्यासाठी २२० व्होल्ट ऊर्जा लागते.

आवळ्याचा लगदा तयार करण्याचे यंत्र (श्रेडिंग मशिन)
आवळा फोडून त्यातील बिया वेगळ्या करणे आणि त्याचा लगदा तयार करण्यासाठी या यंत्राचा वापर होतो. विविध पदार्थांच्या निर्मितीमध्ये आवळा लगद्याचा वापर केला जातो. हे यंत्र स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असल्यामुळे गंज प्रतिरोधक आहे. या यंत्राची क्षमता प्रति तास २१० किलो इतकी आहे. यंत्राचे वजन ४० किलो आहे. या यंत्रामध्ये अर्धा एचपी क्षमतेची विद्युत मोटर असते. हे यंत्र थ्री फेजवर चालत असून अर्ध स्वयंचलित आहे.

आवळा रस काढण्याचे यंत्र (ज्यूस एक्स्ट्रॅक्टर)
आवळा फळाचा रस काढण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरू शकते. या मशिनमध्ये कच्चा माल (आवळा फळ) हॉपरमध्ये टाकले जाते. त्यावर स्क्रू’च्या साह्याने दबाव दिला जातो. त्यातून निघणारा रस गाळण यंत्रणेतून तळाशी असलेल्या भांड्यामध्ये वेगळा होतो. या यंत्राच्या साह्याने प्रति तास २०० ते २५० किलो इतका रस तयार होतो. यात ३ एचपी क्षमतेची मोटर वापरलेली असते.

हायड्रॉलिक प्रेस मशिन
या यंत्राचा उपयोग आवळा फळाचा रस काढण्यासाठी केला जातो.हायड्रॉलिक प्रेस मशिन पंपाच्या साह्याने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत फळावर दाब दिला जातो. त्यातून बाहेर पडणारा रस गाळण यंत्रामधून तळाशी असलेल्या भांड्यात साठवला जातो. या यंत्राने ८ मिनिटाला सुमारे १० किलो रस काढला जातो. तसेच स्वयंचलित प्रकारामध्येही हायड्रॉलिक प्रेस उपलब्ध आहेत.

आवळा फळाचा गर वेगळे करण्याचे यंत्र (पल्पर)
फळातील रस किंवा गर वेगळा करण्यासाठी पल्परचा वापर केला जातो. सध्या भारतामध्ये अर्धा एचपी व सिंगल फेजवर चालणारे फ्रूट पल्पर यंत्र बाजारात उपलब्ध आहेत. त्याची क्षमता ५० किलो प्रति तास इतकी आहे. गराची विविध प्रकारची घनता मिळवण्यासाठी ०.२५ ते ८ मिलिमीटरच्या आकाराच्या जाळ्या उपलब्ध आहेत. यंत्राचे सर्व भाग स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असतात. हे उपकरण स्वयंचलित आहे. याचा वापर प्रामुख्याने टोमॅटो, आंबा, सफरचंद अशा वेगवेगळ्या फळांसाठी केला होतो.

रिफ्रॅक्टोमीटर 
पदार्थातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी रिफ्रॅक्टोमीटरचा वापर केला जातो. गोडी मोजण्याचे एकक हे ब्रिक्स आहे. यासाठी सहज हाताळण्यायोग्य रिफ्रॅक्टोमीटर बाजारात उपलब्ध आहे. त्याचे वजन २९० ग्रॅम आहे.

पद्धत 
प्रथम रिफ्रॅक्टोमीटरची स्क्रीन क्षारविरहित पाण्याने धुऊन घ्यावी. स्वच्छ पुसल्यानंतर त्यात नमुना घ्यावा. तो स्क्रीनला हळूच दाबल्यानंतर प्रकाशाच्या दिशेने धरावे.

- चंद्रकला सोनावणे, ७९७२९९९४६४
(के.एस.के. काकू अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)


इतर टेक्नोवन
पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या...दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे...
‘कल्चर्ड’ मांसामध्येच मिळेल मेदाचा स्वादप्रयोगशाळेत पेशींपासून वाढवलेल्या मांसाला...
वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे;...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘...
दूध प्रक्रिया उद्योगातील उपकरणेदूध हा नाशीवंत पदार्थ असल्यामुळे उत्पादित आणि...
ट्रॅक्टरचलित बहुपीक टोकण यंत्रटोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या...
व्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्रव्हर्जीन कोकोनट तेल हे नैसर्गिक सर्वश्रेष्ठ...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित...काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात....
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
लेसर चिमट्याने पकडता येतील विषाणूसिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील...
वनस्पतींचे भौगोलिक मूळ ठरवणे होईल सोपेविविध पिके किंवा अन्नधान्य उत्पादनामध्ये भौगोलिक...
वाशीमच्या शेतकऱ्यांनी उभारली बांधावरची...वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी...
शेतातून पिकासोबतच घेता येईल सौरऊर्जा...शेती आणि सौरऊर्जा यांचे उत्पादन एकाच वेळी घेणे...
शेतीत यांत्रिकीकरण रूजवलेले चौधरीममुराबाद (ता.. जि. जळगाव) येथील मनोज सदाशिव चौधरी...
नाशीवंत भाज्या टिकविण्यासाठी आधुनिक...भाजीपाला हा नाशीवंत घटक असून, काढणीनंतर त्वरित...
परदेशी कंपन्या उतरल्या पारंपरिक...ओरडणाऱ्याची मातीही विकली जाते, अशा आशयाची म्हण...
घरगुती उत्पादनासाठी ‘स्मार्ट इनडोअर...हरितगृहाची उभारणी ही आधुनिक शेतीकडे नेणारे पाऊल...
अन्न प्रक्रियेचे आधुनिक तंत्र : ...गेल्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या...
हरियाना येथील कृषी विद्यापीठात...हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना...