agricultural news in marathi Farmer Planning animal Husbandry | Page 2 ||| Agrowon

शेतकरी नियोजन : पशूपालन

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 2 मार्च 2021

 सध्या माझ्याकडे १५ गाई व ५ वासरे आहेत. त्यातील १२ गाई दुभत्या असून त्यासाठी मुक्त संचार गोठा केलेला आहे. दर दिवसाला साधारण दोन वेळचे मिळून १५० लिटर दूध संकलन होते.

आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूध व्यवसाय सुरु केला. जमीन क्षेत्र कमी असल्याने दूध व्यवसायाला अधिक प्राधान्य दिले. सध्या माझ्याकडे १५ गाई व ५ वासरे आहेत. त्यातील १२ गाई दुभत्या असून त्यासाठी मुक्त संचार गोठा केलेला आहे. दर दिवसाला साधारण दोन वेळचे मिळून १५० लिटर दूध संकलन होते.

शेतकरी : नामदेव बाबा ससे
गाव : खुपटी ता. नेवासा, जि. नगर
एकूण गाई : १५ (५ वासरे) 
एकूण दूध संकलन : १५० लिटर 

आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूध व्यवसाय सुरु केला. जमीन क्षेत्र कमी असल्याने दूध व्यवसायाला अधिक प्राधान्य दिले. सध्या माझ्याकडे १५ गाई व ५ वासरे आहेत. त्यातील १२ गाई दुभत्या असून त्यासाठी मुक्त संचार गोठा केलेला आहे. दर दिवसाला साधारण दोन वेळचे मिळून १५० लिटर दूध संकलन होते. त्यातील ७५ लिटर दुधाची थेट ग्राहकाला विक्री केले जाते. तर ७५ लिटर दूध हे दूध संकलन केंद्रावर पाठविले जाते. जनावरांच्या चारा, पाणी आणि आरोग्य व्यवस्थापनाला मी प्राधान्य देतो. त्यामुळे नुकसान होत नाही. 

दूध व्यवसाय चिकाटीने केला आणि ग्राहकाला दर्जेदार निर्भेसळ दूध दिले तर व्यवसायात यशस्वी होता येते. असा माझा अनुभव आहे. 

दैनंदिन नियोजन 

 • गाईसाठी ७० बाय १०० आकाराचा मुक्तसंचार गोठा व ३० बाय २६ आकाराचे शेड आहे.
 • सकाळी चार वाजता व्यवस्थापनाला सुरवात होते. चाऱ्यासाठी ३० बाय २६ आकाराच्या दोन दावणी आहेत. सकाळी दिला जाणारा चारा आदल्या दिवशीच्या सायंकाळी सहा वाजता दावणीत भरून ठेवला जातो.
 • एकावेळी मुरघास ५० किलो, १०० किलो घास, १०० किलो गवत व १०० किलो उसाची कुट्टी करून ती एकत्रित दिली जाते. त्यात प्रती जनावरांसाठी अडीच किलो खुराक मिसळून टाकतो. सायंकाळी चार वाजताही अशाच पद्धतीने चारा एकत्रित करून टाकतो. 
 • शेडमध्ये पाण्यासाठी १३ फुटाच्या दोन दावणी आहेत. त्यात सकाळी सहा वाजता व सायंकाळी सहा वाजता पाणी भरले जाते. 
 • दररोज सकाळी आठ वाजता गोठ्यातील शेड धुवून काढले जाते.
 • दररोज शेणाची साठवण केली जाते. दर महिन्याला साधारण तीन ट्रॅक्टर शेण साठले जाते. शेणखताची साडेतीन हजार रुपये प्रती ट्रॅक्टरप्रमाणे जागेवर विकी केली जाते.   दूध काढण्यासाठी मशिनचा वापर केला जातो.
 • वर्षभरासाठी साधारण ५० ते ६० टन मुरघास लागतो. त्यानुसारच नियोजन करून मका विकत घेऊन मुरघास केला जातो. 
 • चाऱ्यासाठी माझ्या एक एकर शेतामध्ये गिन्नी गवत, एका एकरावर लसूण घास व अर्ध्या एकरावर ऊस लागवड केलेली आहे. 

पुढील पंधरवड्यातील नियोजन 

 • या महिन्यात गरजेनुसार चाऱ्यासाठी शेतातील गिन्नी गवत, लसूण घासाची कापणी करणार आहे. मुरघासासाठी मका खरेदी करण्याचे नियोजन आहे. 
 • जनावरांना प्रतिदिन ४० किलो खुराक लागतो. त्यानुसार आगामी पंधरा दिवसांचा खुराक या आठवड्यात खरेदी करणार आहे.
 • दर पंधरा दिवसाला २ टन मुरघास देण्याचे नियोजन असते. गरजेनुसार मुरघासाच्या तयार केलेल्या बॅंका फोडल्या जातात. 
 • या महिन्याच्या मध्यात जनावरांची आरोग्य तपासणी करणार आहे.
 • पशुसंवर्धन विभागाच्या सल्ल्यानुसार ३ ते ४ वेळा गाईंना वेगवेगळे लसीकरण केले जाते. एक जानेवारी रोजी प्रत्येक गाईला आणि वासराला जंतनिर्मुलनाची १ गोळी देण्यात आली आहे. एक एप्रिल रोजी पुन्हा जंतनिर्मुलनाची गोळी दिली जाईल. 
 • गायी दर तीन दिवसाला धुतल्या जातात.

- नामदेव ससे,  ९०९६०७२६२०


इतर कृषिपूरक
निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धननिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या...
अळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची...चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी...
देशी गाईंमधील प्रजनन व्यवस्थापनावर द्या...देशी गाईंची निवडलेली जात, वंशावळ आणि...
स्पेंट मशरूम कंपोस्टचे मूल्यवर्धनपारंपरिक कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे...
उन्हाळ्यातील कोंबड्यांचे आहार व्यवस्थापनउन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे...
संधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्तपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी...
शेळ्यांची निवड पद्धतीशेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड...
प्राणिजन्य क्षयरोगाकडे नको दुर्लक्षजनावरांना क्षयरोग झाल्यास उत्पादनक्षमता १० ते २५...
योग्य खाद्य व्यवस्थापनातून उष्माघाताचे...उन्हाळ्याच्या काळात आहारामध्ये साधारणतः ५ ते ७...
शेतकरी नियोजन पीक : रेशीम शेतीउन्हाळ्यातील तापमानात देखील कोष उत्पादन घेता यावे...
जनावरांतील उष्माघात टाळण्यासाठी...जनावरे आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध...
कुक्कुटपालन नियोजन पिलांची (चिक्स) नवीन बॅच ५ मार्च रोजी...
उन्हाळ्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपनवाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी...
लकवा आजारावर ब्राह्मी, वेखंड उपयुक्त लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे...
उष्ण वातावरणात टिकणारी बेरारी शेळी बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून,...
जनावरांमधील पायाचा वातया आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच...
कुक्कुटपालनामधील जैवसुरक्षा महत्त्वाची...कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचे विषाणू, जिवाणू तसेच...
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...
निरोगी पशुधनासाठी शुद्ध, निर्जंतुक पाणीदुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...