agricultural news in marathi Farmer planning: brinjal crop | Page 2 ||| Agrowon

शेतकरी नियोजन ः पीक वांगी

गणेश कोरे
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021

शेतकरी : योगेश तोडकरी
गाव : नारायणगांव, ता.जुन्नर, जि.पुणे
एकूण क्षेत्र : साडेतीन एकर
वांगी क्षेत्र : २५ गुंठे

शेतकरी : योगेश तोडकरी
गाव : नारायणगांव, ता.जुन्नर, जि.पुणे
एकूण क्षेत्र : साडेतीन एकर
वांगी क्षेत्र : २५ गुंठे

माझी एकूण साडेतीन एकर शेती असून त्यापैकी २५ गुंठे क्षेत्रावर भरताच्या वांग्याचे उत्पादन घेतो. उर्वरित क्षेत्रावर फ्लॉवर, कांदा, ऊस आणि विविध भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतो. मी एप्रिल व सप्टेंबर असे प्रत्येकी ६ महिन्यांचे दोन हंगामात उत्पादन घेतो. प्रत्येक हंगामात साधारण २५ ते ३० गुंठे क्षेत्रावर वांगी लागवड केली जाते.

दरवर्षीचे नियोजन 

 • साधारण मार्च महिन्यात लागवडीसाठी गादीवाफे तयार केले जातात. लागवड दोन गादीवाफ्यातील पाच फूट आणि दोन रोपांमध्ये अडीच फूट अंतर ठेवून लागवड केली जाते. गादीवाफ्यावर मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा वापर होतो.
 • लागवडीपूर्वी गादीवाफ्यावर सूक्ष्म अन्नद्रव्ये, निंबोळी पेंड यांचा वापर करण्यात येतो.
 • लागवडीसाठी नर्सरीतील ३५ दिवसांच्या रोपांची निवड केली जाते.
 • दरवर्षी माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करतो. शेणखताचा दरवर्षी पाच टन प्रति ३० गुंठे याप्रमाणात वापर होतो. खतांचे साधारण पाच टप्प्यांमध्ये नियोजन केले जाते. खतांची मात्रा प्रत्येकी पाच दिवसांनी चक्राकार पद्धतीने दिली जाते.
 • लागवडीनंतर ७ ते १० दिवसांनी १९-१९-१९ या खताचा डोस देण्यात आला. प्रति ३० गुंठ्यांना तीन किलो ड्रीपद्वारे व सोबत मॅग्नेशिअम सल्फेट २ किलो दिले जाते.
 • फुल्व्हिक ॲसिडचाही वापर होतो. साधारण दीड महिन्यानंतर फुलधारणेसाठी मॅग्नेशिअम ३ किलो, झिंक ५०० ग्रॅम आणि १३ः४५ हे खत ३ किलो याप्रमाणे दिले जाते. फळधारणेसाठी १३ः०ः४५ ३ किलो, कॅल्शिअम ३ किलो आणि बोरॉन १ किलोचे याप्रमाणे ठिबकद्वारे दिले जाते.
 • सध्या झाडांची छाटणी (रिकट) करून दुसऱ्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. लागवडीनंतर साधारण ३५ दिवसांनंतर फळ काढणीस तयार होतील.

कीड-रोग व्यवस्थापन

 • रसशोषक किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रंगीत चिकट सापळ्यांचा वापर होतो. फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचा वापर केला जातो. त्यासाठी सौर पॅनेल व बल्बची व्यवस्था केली आहे.
 • फळ काढणीदरम्यान आवश्‍यकतेनुसार कीडरोगांच्या नियंत्रणासाठी योग्य त्या फवारण्या घेतल्या जातात.

उत्पादन 

 • एप्रिल हंगामातील वांग्याचे उत्पादन १० ते१५ टनांपर्यंत तर सप्टेंबर हंगामात हेच उत्पादन पाच टनांपेक्षा अधिक मिळते.
 • एप्रिल हंगामातील वांग्यांना सरासरी ३० रुपयांपर्यंत तर तर पुढील हंगामात तो १५ ते २० रुपये इतका मिळतो. एप्रिल हंगामातील वांग्यांना अधिक दर मिळतो.
 • मजुरांच्या मदतीने वांग्याची काढणी केली जाते.
 • मालाची प्रतवारी करून बाजारपेठेमध्ये पाठविला जातो.

- योगेश तोडकरी, ८८८८९२८१८१


इतर कृषी सल्ला
नारळावरील रूगोज चक्राकार पांढरी माशीचे...​रूगोज चक्राकार पांढरी माशी ही बहुभक्षी कीड असून...
थंडीचा केळी बागेवर होणारा परिणाम अन्...राज्यातील केळी लागवड क्षेत्रामध्ये तापमान कमी...
शेतकरी नियोजन पीक : सीताफळशेतकरी ः निखिल तानाजी गायकवाड गाव ः वडकी, ता....
सुधारित बायोगॅसमुळे इंधन अन् खताची...सामान्य रचना असलेल्या संयंत्राच्या तुलनेत ताज्या...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या व फुलोरा...
द्राक्ष घडांना पेपर लावताना घ्यावयाची...साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास...
झारखंड : लढा गरिबीसोबतच अनियमित पावसाशी...भारतीय संघराज्यातील २८ पैकी सर्वांत गरीब अशी ओळख...
कृषी सल्ला (कापूस, रब्बी ज्वारी,...कापूस कापसाची फरदड (खोडवा) घेणे टाळावे....
उसातील तुरा टाळण्यासाठी उपाययोजनाउसाला तुरा आल्यानंतर वाढ पूर्णपणे थांबते. पांगशा...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्‍यतामहाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके...
जाणून घ्या उसाला तुरा येण्याची कारणे रात्रीचे आणि दिवसाचे तापमान, हवेतील आद्रता,...
बटाटा घाऊक संकलन अन्‌ विक्री शेतकरी उत्पादक कंपनीने बटाटा ...
हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक...हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी...
शेतकरी नियोजनः पीक हरभराआमचे दरवर्षी सुमारे ४० ते ४५ एकरांवर हरभरा...
बटाटा मूल्यसाखळीतील विविध टप्पे..बटाटा बेणे ते बाजारपेठ असा प्रवास गृहीत धरला तर...
मिरची पिकावर नव्या फुलकिडीचा प्रादुर्भावमिरची पिकामध्ये रस शोषक किडीमध्ये महत्त्वाची कीड...
अंजीर पिकातील तांबेरा नियंत्रणअंजीर फळ पिकावर अन्य फळझाडांच्या तुलनेत कमी...
उन्हाळी मूग लागवडीचे तंत्रमुगाच्या वैभव आणि बी.पी.एम.आर.१४५ या जाती...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
द्राक्ष बागेतील भुरी रोगाची लक्षणे अन्...या वर्षी सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बागेत एकाच...