agricultural news in marathi Farmer Planning Crop: mango | Agrowon

शेतकरी नियोजन पीक : हापूस आंबा

राजेश कळंबटे
शुक्रवार, 19 मार्च 2021

सध्या काही झाडांवरील आंबे तयार झाले आहेत. त्यांची काढणी करून बाजारपेठेमध्ये पाठविण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पाऊस, वाढलेला उष्मा यापासून मोहोर आणि कैरीची जपणूक करण्यासाठी मागील वीस दिवसांपासून नियोजन व कामांना सुरुवात केली आहे.

सध्या काही झाडांवर फळधारणा होण्यास, तर काही झाडांवर आंबा तयार होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या काही झाडांवरील आंबे तयार झाले आहेत. त्यांची काढणी करून बाजारपेठेमध्ये पाठविण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पाऊस, वाढलेला उष्मा यापासून मोहोर आणि कैरीची जपणूक करण्यासाठी मागील वीस दिवसांपासून नियोजन व कामांना सुरुवात केली आहे.

शेतकरी: राजेंद्र मोतीराम कदम
गाव : मजगाव, ता. रत्नागिरी
आंबा क्षेत्र : ५० एकर 
झाडे : ३ हजार झाडे

माझी ५० एकरांची आंबा बाग आहे. त्यामध्ये साधारणपणे ३ हजारांहून अधिक झाडे आहेत. जानेवारी, फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत झाडांना मोहोर आला आहे. सध्या काही झाडांवर फळधारणा होण्यास, तर काही झाडांवर आंबा तयार होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या काही झाडांवरील आंबे तयार झाले आहेत. त्यांची काढणी करून बाजारपेठेमध्ये पाठविण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पाऊस, वाढलेला उष्मा यापासून मोहोर आणि कैरीची जपणूक करण्यासाठी मागील वीस दिवसांपासून नियोजन व कामांना सुरुवात केली आहे.

यंदाचे नियोजन 

  • यंदा पावसाळा लांबल्यामुळे पालवी उशिराने आली. परिणामी, ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवला नाही. याच कालावधीत ढगाळ वातावरण असल्याने पालवीवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. त्यासाठी  तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार फवारणी केली. 
  • अनियमित वातावरणामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यामुळे दर १० ते १५ दिवसांनी रोग नियंत्रणाच्या दृष्टीने फवारणी करावी लागत होती. 
  • जानेवारी महिन्यात आलेल्या फुलोऱ्याला फळधारणा होण्यासाठी झाडांची हलवणी करण्यात आली. यामुळे सुकलेला मोहोर पडून गेला.
  • मोसमी पाऊस, थंडी, उष्णता आणि अवकाळी पावसामुळे झाडांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला. 
  • आंबा मोहोरावर आणि पानांवर तुडतुडे ही कीड आणि बुरशीजन्य रोग, करपा यांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागांमध्ये १५ दिवसांच्या अंतराने शिफारशीप्रमाणे फवारणीचे नियोजन केले होते. 
  • पहिल्या टप्प्यातील मोहोराला फळधारणा झाली असून त्यामधून वीस टक्के उत्पादन मिळेल. 

पुढील २० दिवसांचे नियोजन

  •  काही मोहोराला अजूनही फळधारणा झालेली नाही. त्यांच्यासाठी येत्या ८ दिवसांत बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येईल. त्यानंतर मोहोर जुना झाल्यावर पुन्हा झाडांची हलवणी करण्यात येईल.
  •  सध्या फळे अंड्याच्या आकाराची आहेत. त्यावर डाग पडणे, तुडतुडे आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव होऊन फळे खराब होण्याची शक्यता आहे.  या किडीपासून संरक्षण करण्यासाठी फवारणी करण्याचे नियोजन आहे.
  •  सध्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे झाडांना पुरेसे पाणी देणार आहे. विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रति झाड २०० लिटर पाणी दिले जाते.
  •  सध्या काही झाडांवरील फळे तयार झाले असून, पेटी भरण्याची कामेही सुरू आहे. दर्जेदार आंबा बाजारात जावा यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी झाडावर तयार झालेलाच आंब्याची काढणी करत आहे. काढणीनंतर आंबा व्यवस्थित पाण्याने पुसून घेतला जातो. जेणेकरून त्यावर कोणतेही डाग राहणार नाहीत. वजन करून पेटीत भरला जातो. 

- राजेंद्र कदम, ९४२२४ ३३१३३


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...