शेतकरी नियोजन- पीक डाळिंब

मी डाळिंबामध्ये प्रामुख्याने हस्त बहर धरतो. डाळिंबाची एकूण ३ हजार झाडे असून, त्यापैकी दीड हजार झाडे २००७ ला, ५०० झाडे २०१५ ला आणि १ हजार झाडे २०१८ मध्ये लागवड केली आहेत. सर्व झाडे भगवा जातीची आहेत. बागेतून दरवर्षी एकरी सरासरी ८ ते १० टन निर्यातक्षम डाळिंब उत्पादन मिळते.
Rahul Jathar in his pomegranate orchard.
Rahul Jathar in his pomegranate orchard.

मी डाळिंबामध्ये प्रामुख्याने हस्त बहर धरतो. डाळिंबाची एकूण ३ हजार झाडे असून, त्यापैकी दीड हजार झाडे २००७ ला, ५०० झाडे २०१५ ला आणि १ हजार झाडे २०१८ मध्ये लागवड केली आहेत. सर्व झाडे भगवा जातीची आहेत. बागेतून दरवर्षी एकरी सरासरी ८ ते १० टन निर्यातक्षम डाळिंब उत्पादन मिळते. शेतकरी - राहुल जठार गाव - नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर एकूण क्षेत्र - ३० एकर डाळिंब क्षेत्र - १० एकर (३००० झाडे) नातेपुते (ता. माळशिरस) येथे माझी ३० एकर शेती आहे. त्यापैकी दहा एकर क्षेत्रावर डाळिंब आणि पाच एकरावर द्राक्ष बाग आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये शेवगा, ऊस ही पिके आहेत. डाळिंबाची एकूण ३ हजार झाडे असून, त्यापैकी दीड हजार झाडे २००७ ला, ५०० झाडे २०१५ ला आणि १ हजार झाडे २०१८ मध्ये लागवड केली आहेत. सर्व झाडे भगवा जातीची आहेत. मी डाळिंबामध्ये प्रामुख्याने हस्त बहर धरतो. बहर धरताना यंदा ११ सप्टेंबरला पानगळ करून १४ सप्टेंबरला पाणी दिले. बहर धरण्याच्या एक महिनाआधी प्रतिझाड ५० ते ६० किलो शेणखत आणि कंपोस्ट खत देण्यात आले. तसेच काडी तयार करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली आहेत. बागेतून दरवर्षी एकरी सरासरी ८ ते १० टन निर्यातक्षम डाळिंब उत्पादन मिळते. उत्पादित मालाची व्यापाऱ्यांद्वारे परदेशामध्ये निर्यात केली जाते. मागील १० दिवसांतील कामकाज 

  • सध्या बाग सेटिंग अवस्थेत असून कळ्या आणि फळांची संख्या चांगली आहे.
  • गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वातावरणात बदल होत आहेत. ‘तेल्या’चा प्रादुर्भाव लक्षात घेता बागेत तणनाशकांचा वापर टाळला आहे. बागेतील गवत मजुरांच्या मदतीने ग्रास कटरद्वारे काढून टाकले. आणि त्या गवताचे बागेत आच्छादन केले आहे. आच्छादनामुळे आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते.
  •  मागील आठवड्यात कळीसाठी ०ः५२ः३४ आणि ०ः०ः ५० तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारण्या केल्या आहेत.
  •  ड्रीपमधून ०ः५२ः३४ हे ५ किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये २ किलो प्रति एकर याप्रमाणात दिले.
  • वातावरणातील बदलामुळे कुजव्याचा प्रादुर्भाव वाढतो आहे. नियंत्रणासाठी शिफरशीनुसार आलटून-पालटून फवारण्या घेतल्या आहेत.
  • पुढील २० दिवसांचे नियोजन 

  • बाग सध्या ८० ते ९० टक्क्यांपर्यंत सेटिंग अवस्थेत आहे. झाडांवर फळांची संख्या चांगली आहे. मात्र झाडाच्या आकारमानाचा विचार करून झाडावर मोजकीच फळे ठेवणार आहे.
  • कीड-रोगांचा प्रादुर्भाव पाहून आवश्‍यकेनुसार बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची आलटून-पालटून फवारणी घेतली जाईल.
  • आवश्‍यकतेनुसार बागेतील तणनियंत्रण करून त्याचे आच्छादन केले जाईल.
  • झाडांवरील पानांचे प्रयोगशाळेतून परिक्षण करून घेणार आहे. त्यामुळे झाडांना आवश्‍यक असणारी खतांची मात्रा समजेल. आणि त्यानुसार खतांचे नियोजन करणे सोयीचे होईल.
  • मागील काही दिवसांत पाऊस झाला होता. सध्याही अधून-मधून ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे. त्यामुळे वातावरणाचा अंदाज आणि बागेची पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी दिले जाईल. सिंचनासाठी २ विहिरी आणि १ बोअर आहे.
  • - राहुल जठार, ९८६०२०७४००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com