शेतकरी नियोजन पीक : केसर आंबा

केसर आंब्याची २००८ आणि २०२० साली लागवड केलेल्या २ एकराच्या प्रत्येकी दोन बागा आहेत. त्यापैकी जुन्या लागवडीमध्ये १५ बाय १५ फूट अंतरावर ४०० झाडे तर नवीन लागवडीमध्ये ४.५ बाय १२ फूट अंतरावर १७०० झाडे आहेत.
बागेमध्ये सिंचन, तण नियंत्रण आणि स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो
बागेमध्ये सिंचन, तण नियंत्रण आणि स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो

शेतकरी :  तय्यब हुसेन दारूवाला गाव :  तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद एकूण शेती :  २० एकर केसर आंबा क्षेत्र :  चार एकर (२१०० झाडे) आमची एकूण २० एकर शेती आहे. त्यापैकी ४ एकरांवर केसर आंबा लागवड आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये चिकू, हरभरा, सोयाबीन आणि हंगामी पिकांची लागवड असते. केसर आंब्याची २००८ आणि २०२० साली लागवड केलेल्या २ एकराच्या प्रत्येकी दोन बागा आहेत. त्यापैकी जुन्या लागवडीमध्ये १५ बाय १५ फूट अंतरावर ४०० झाडे तर नवीन लागवडीमध्ये ४.५ बाय १२ फूट अंतरावर १७०० झाडे आहेत. व्यवस्थापनातील बाबी 

  • जुलै महिन्यामध्ये पॅक्लोब्युट्राझोल या वाढरोधकांचा वापर शिफारशीप्रमाणे केला.
  • साधारण सप्टेंबर महिन्यात बाग ताणावर सोडली. हा ताण नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रति झाड ८ ते १० लिटर पाणी देत तोडला.
  • नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी असा तीन टप्प्यांत झाडांना मोहोर आला आहे.
  • सध्या झाडावर ज्वारी ते सुपारी आकाराची फळे तयार झाली आहेत.
  • नवीन लागवड केलेल्या बागेत यंदा आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली आहे.
  • यंदा बागेमध्ये परागीभवनासाठी मधमाशांच्या पेट्या ठेवण्याचे नियोजन आहे.
  • सिंचन व्यवस्था 

  • सिंचनासाठी शेतामध्ये ७२ हजार लिटर क्षमतेचा हौद उभारला आहे. माझ्याकडे चार बोअरवेल असून त्यातील पाणी या हौदामध्ये सोडले जाते.
  • बागेत सिंचनासाठी ठिबकचा वापर केला जातो. फळांचा आकार लिंबाएवढा झाल्यापासून ते पुढे फळ २०० ते २५० ग्रॅमचे होईपर्यंत प्रत्येक महिन्याला २ वेळा मोकळे पाणी दिले जाते. मोकळे पाणी दिल्यानंतर पुढे आठवडाभर ठिबक बंद ठेवला जातो. त्यानंतर आवश्यकतेनुसार पुन्हा ठिबक सुरू केले जाते. त्यामुळे फळे उत्तमरीत्या पोसली जातात.
  • आंबा फळांची काढणी केल्यानंतर पावसाळा सुरु होईपर्यंत गरजेनुसार ठिबकद्वारे पाणी दिले जाते.
  • खत व्यवस्थापन  निंबोळी खत ५ किलो प्रमाणे जून महिन्यात आणि फुलधारणेच्या वेळी एक वेळा दिली जाते. जुन्या झाडांना प्रत्येकी १ किलो याप्रमाणे १०ः२६ः२६ या रासायनिक खताची मात्रा दिली जाते. तण व्यवस्थापन 

  • पावासाळ्यापूर्वी बागेत रोटाव्हेटरच्या साह्याने मशागत केली जाते. जुन्या बागेत जुलै ते सप्टेंबर दरम्यान आवश्यकतेनुसार तणनाशकांचा वापर केला जातो.
  • नवीन बागेमध्येही अशाच पद्धतीने तण नियंत्रण केले जाते.या बागेत १५ डिसेंबरला तणनाशकांची फवारणी केली आहे.
  • कीड-रोग व्यवस्थापन  सततच्या ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगांना पोषक वातावरण तयार होते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाते. आत्तापर्यंत बागेमध्ये पाने खाणारी अळी आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. नवतीवर त्याचा विशेष परिणाम दिसून आला. अधिक उत्पादनासाठी बायोगॅस स्लरीचा वापर  मी बागेत रासायनिक खतांचा प्रमाणशीर वापर करतो. यासोबतच तीन वर्षांतून एकदा बागेस बायोगॅस स्लरी दिली जाते. जुन्या बागेत प्रति झाड १५ लिटर स्लरी देण्याचे नियोजन असते. आता जवळपास दोन वर्षांच्या झालेल्या नवीन बागेसही अशाच पद्धतीने स्लरी दिली जाईल. पुढील महिनाभराचे नियोजन 

  • बागेस मोकळ्या पद्धतीने पाणी देऊन आवश्यकतेनुसार ठिबकचा कालावधी कमी जास्त केला जाईल.
  • हवामानाची प्रतिकुलतेमुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. झाडांचे कीड-रोगांचा प्रादुर्भावासाठी सतत निरिक्षण केले जाईल. तज्ज्ञांच्या शिफारशीप्रमाणे फवारणीचे नियोजन केले जाईल.
  • - तय्यब हुसैन दारूवाला, ९४२३०७३०२३  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com