agricultural news in marathi Farmer Planning Crop: Shevanti | Page 3 ||| Agrowon

शेतकरी नियोजन पीक : शेवंती

भाऊसाहेब दोरगे
सोमवार, 19 एप्रिल 2021

माझ्याकडे एकूण १० एकर शेती असून, पारंपरिक पद्धतीने फुलशेती करतो. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे काही प्रमाणात अडचणी येत आहेत. पण सण समारंभाच्या काळात पांढऱ्या, पिवळ्या शेवंतीला चांगली असते. त्यामुळे गणेशत्सोव, दसरा व दिवाळी या काळात शेवंती फुले बाजारात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
 

माझ्याकडे एकूण १० एकर शेती असून, पारंपरिक पद्धतीने फुलशेती करतो. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे काही प्रमाणात अडचणी येत आहेत. पण सण समारंभाच्या काळात पांढऱ्या, पिवळ्या शेवंतीला चांगली असते. त्यामुळे गणेशत्सोव, दसरा व दिवाळी या काळात शेवंती फुले बाजारात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

शेतकरी :  भाऊसाहेब दोरगे
गाव : यवत (दोरगेवाडी) ता. दौंड, जि. पुणे
शेवंती क्षेत्र : १ एकर

माझ्याकडे एकूण १० एकर शेती असून, पारंपरिक पद्धतीने फुलशेती करतो. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे काही प्रमाणात अडचणी येत आहेत. पण सण समारंभाच्या काळात पांढऱ्या, पिवळ्या शेवंतीला चांगली असते. त्यामुळे गणेशत्सोव, दसरा व दिवाळी या काळात शेवंती फुले बाजारात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार शेवंती लागवड केली जाते. विविध वाणांची निवड करून लागवडीवर भर देत आहे. चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यास अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. शेवंतीमध्ये भाग्यश्री (पांढरी), पौर्णिमा, गुलछडी या फुलाचे उत्पादन घेतले जाते. मी शेवंती लागवडीसाठी भाग्यश्री वाणाची निवड केली आहे. लागवड साधारणपणे १२ मार्चच्या दरम्यान केली आहे.

मागील पंधरा दिवसांतील कामकाज 

 • लागवडीपूर्वी एकरी ४ ट्रॉली शेणखत टाकण्यात आले आहे. त्यावर रोटर मारून बेड तयार केले आहेत.
 • शेवंती लागवडीसाठी ४ फुटांचे बेड तयार करून सव्वा फुटावर लागवडीचे नियोजन केले आहे.
 • शेवंती लागवडीसाठी भाग्यश्री या वाणाची थेऊर येथील नर्सरीमधून खरेदी करण्यात आली. लागवड मजुरांमार्फत करण्यात आली.
 • लागवडीनंतर ५ दिवसांनी ड्रीपद्वारे आणि पंपाद्वारे बुरशीनाशके देण्यात आली.
 • लागवडीच्या १० दिवसांनी रासायनिक खतांची मात्रा दिली आहे.
 • वाढीच्या काळात रोग, किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. गरजेनुसार बुरशीनाशकाची फवारणी केली आहे.
 • सध्या रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत.
 • सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीची निवड करण्यात आली आहे. रोपांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे पाणी दिले जाते.

पुढील पंधरा दिवसांचे नियोजन 

 • आगामी काळात गरजेनुसार खुरपणी करून तणनियंत्रण केले जाईल.
 • एप्रिलच्या अखेरीस शेवंतीच्या राजा या वाणाची २ एकरांवर लागवड करण्याचे नियोजन आहे.
 • वाढते तापमान आणि पाण्याची अंदाज घेऊन लागवडीचे नियोजन केले जाईल.
 • फुलांचा आकार मोठा राहण्यासाठी सेंद्रिय व रासायनिक खतांच्या वापरावर भर दिला जाईल.
 • दसरा व दिवाळीमध्ये फुलांचे उत्पादन होण्याच्यादृष्टीने नियोजन सुरू असून, शेवंतीचे ५ ते ६ टनांपर्यंत उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
 • झाडांची उंची वाढण्यासाठी खतांची फवारणी करणार आहे.
 • फुलांचे चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी नियोजनानुसार विविध कामे करण्यावर विशेष भर दिला जातो.

- भाऊसाहेब दोरगे, ९४२३१००७२२


इतर ताज्या घडामोडी
सोलापूरच्या कृषी विभागात कोरोनाचा शिरकावसोलापूर ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा वरचेवर...
पंढरपूरला आणखी २०० बेड वाढवणार ः भरणेसोलापूर : ‘‘पंढरपुरातील वाढत्या कोरोना...
केहाळ येथे भुईमुगाची उन्हाळी हंगामात...परभणी ः जिल्ह्यातील केहाळ (ता. जिंतूर) येथील...
नाशिकच्या उत्तरपूर्व भागात टँकर सुरूनाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस...
लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...लातूर : लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...
परभणीत कपाशी क्षेत्र घटण्याची शक्यतापरभणी ः ‘‘जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
सोलापुरात माल उतरण्यासाठी भुसार बाजारात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सातारा : कांदा बी सदोष निघाल्याने...विसापूर, जि. सातारा : खासगी कृषी फार्म, व्यापारी...
विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोषगोंदिया : खरीप हंगामात अतिवृष्टी, संततधार पाऊस व...
सोयाबीन बियाण्यांची खरिपासाठी जुळवाजुळवअकोला : येत्या हंगामासाठी शेतकरी घरगुती सोयाबीन...
‘कुरनूर’मधून पाण्याचे दुसरे आवर्तन सोडलेसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून...
पंढरपुरातील दोन्ही भक्त निवासे कोरोना...सोलापूर ः पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना...
कोरोना सुपरस्प्रेडर रोखण्यासाठी पुणे...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात...
सांगलीत साखरेचे उत्पादन १३ लाख...सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत...
‘पंदेकृवि’चा दीक्षान्त समारंभ अखेर पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...
ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा पुरवठा करा ः...मुंबई ः महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून,...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना विम्यासाठी ‘...पुणे ः कोरोना संकटात बाजार समिती कर्मचाऱ्यांचा ५०...
डाळिंब प्रक्रिया, मुल्यवर्धन तंत्रज्ञान...औरंगाबाद : डाळिंब पिकापासून जास्त आर्थिक नफा...
वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी...मंडणगड, जि. रत्नागिरी ः वन्य प्राण्यांच्या...
यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी ६४ मुहूर्त नागपूर : कोरोनामुळे वेळेवर तारखांत बदल करावा लागत...