agricultural news in marathi Farmer Planning Crop: sugarcane | Agrowon

शेतकरी नियोजन पीक : खोडवा ऊस

राजकुमार चौगुले
मंगळवार, 6 एप्रिल 2021

लागणीबरोबरच मी प्रत्येक वर्षी उसाचा खोडवा ठेवतो. खोडव्याचे व्यवस्थापन करताना पाने व अन्य बाबींवर सातत्याने लक्ष असते. दत्त साखर कारखान्यातील शेती अधिकारी, प्रयोगशाळेचे अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून वेळोवेळी त्यांचा सल्ला घेतो. याचा फायदा उसाचे व्यवस्थापन करताना झाला आहे.

लागणीबरोबरच मी प्रत्येक वर्षी उसाचा खोडवा ठेवतो. खोडव्याचे व्यवस्थापन करताना पाने व अन्य बाबींवर सातत्याने लक्ष असते. दत्त साखर कारखान्यातील शेती अधिकारी, प्रयोगशाळेचे अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून वेळोवेळी त्यांचा सल्ला घेतो. याचा फायदा उसाचे व्यवस्थापन करताना झाला आहे. ​

शेतकरी: शिवराज पाटील.
गाव : चंदूर ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर.
एकूण उसाचे क्षेत्र : २० एकर.
खोडवा ऊस : ८ एकर.

चंदूर (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे माझी ३० एकर शेती आहे. यामध्ये १४ एकर लावण व ८ एकर खोडवा आहे. यामध्ये ८६०३२, २६५ या जातींचा ऊस आहे. मी सातत्याने ऊस शेती करतो. लागणीबरोबरच मी प्रत्येक वर्षी उसाचा खोडवा ठेवतो. खोडव्याचे व्यवस्थापन करताना पाने व अन्य बाबींवर सातत्याने लक्ष असते. दत्त साखर कारखान्यातील शेती अधिकारी, प्रयोगशाळेचे अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून वेळोवेळी त्यांचा सल्ला घेतो. याचा फायदा उसाचे व्यवस्थापन करताना झाला आहे. माझी संपूर्ण जमीन काळी आहे. पावसाळ्यात जरी पाणी साचून रहात असले तरी उन्हाळ्यात मात्र ही जमीन उसासाठी फायदेशीर ठरत असल्याचा माझा अनुभव आहे.

मागील कालावधीतील व्यवस्थापन

 • नोव्हेंबर महिन्यामध्ये ऊस तुटल्यानंतर पाचट कुट्टी करून एक सरी आड भरून घेतले.
 • पाचट कुजण्यासाठी त्यावर कंपोस्टिंग जिवाणू संवर्धक, सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया पसरण्यात आले.
 • मागील दोन महिन्यापासून आतापर्यंत चार फवारण्या झाल्या आहेत.
 • हिवाळ्यामध्ये पंधरा दिवसातून एकदा पाटपाणी पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन केले होते.
 • पाण्याचे योग्य व्यवस्‍थापन केल्यामुळे जमिनीत ओलावा कायम राहण्यास मदत झाली.
 • पाचट कुट्टी करून भरल्यामुळे पाण्याचे संतुलनही चांगले राहते.
 • फेब्रुवारीपर्यंत पंधरा दिवसाला पाणी देत होतो. मार्च महिन्यापासून दहा दिवसातून एकदा पाणी देत आहे.
 • प्रत्येक महिन्याला तणनियंत्रणासाठी एक भांगलण करण्यात आली.
 • तणनियंत्रणासाठी तणनाशकाऐवजी मजुरांद्वारे तण काढण्याला मी प्राधान्य देतो.
 • दोन महिन्यापूर्वी भरणी केली आहे. विविध खते वापरून एकरी ९ ते १० हजार रुपयांचा खर्च करून भरणी केली आहे.
 • मार्च महिन्यामध्ये देखील भरणी करण्यात आली.

पुढील नियोजन 

 • गरजेनुसार प्रत्येक महिन्याला तणनियंत्रण केले जाईल.
 • सध्या उन्हाळ्याचा कालावधी वाढला आहे. याचा अंदाज घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पाण्याचे नियोजन करणार आहे.
 • हवामानातील बदल लक्षात घेता, उसाच्या वाढीच्या अवस्थेत बुरशीनाशक, कीटकनाशकांच्या फवारण्या १५ दिवसाला घेण्याचा विचार आहे.
 • खोडव्याचे उत्पादन ६० ते ७० टनापर्यंत असल्याने खोडव्याची निगा शास्त्रोक्त पद्धतीने घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.

- शिवराज पाटील, ९५८८६४२८२०


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...