शेतकरी नियोजन पीक ः कलिंगड

केळी पिकाखालील रिकाम्या क्षेत्रात कलिंगडाचे कमी खर्चात उत्पादन मिळते. यासाठी केळीच्या बेवडवर कलिंगड असते. टप्प्याटप्प्याने तीन-तीन एकरात लागवड केली आहे. ही लागवड जानेवारीच्या मध्यात सुरू करून फेबुवारीच्या मध्यात पूर्ण करण्यात आली. कलिंगडाची लागवड गादीवाफ्यावर मल्चिंग पेपर अंथरूण करण्यात आलीआहे. त्याला ठिबक सिंचनाची सोय केली आहे.
Mukesh Patil showing quality watermelon in his garden
Mukesh Patil showing quality watermelon in his garden

केळी पिकाखालील रिकाम्या क्षेत्रात कलिंगडाचे कमी खर्चात उत्पादन मिळते. यासाठी केळीच्या बेवडवर कलिंगड असते. टप्प्याटप्प्याने तीन-तीन एकरात लागवड केली आहे. ही लागवड जानेवारीच्या मध्यात सुरू करून फेबुवारीच्या मध्यात पूर्ण करण्यात आली. कलिंगडाची लागवड गादीवाफ्यावर मल्चिंग पेपर अंथरूण करण्यात आली आहे. त्याला ठिबक सिंचनाची सोय केली आहे.  शेतकरी :  मुकेश डोंगर पाटील. गाव:  गाढोदे, ता.जि.जळगाव. एकूण क्षेत्र : ३५ एकर. कलिंगडाखालील क्षेत्र :  १० एकर. माझी गाढोदे (ता.जळगाव) येथे गिरणा, तापी नदीच्या लाभक्षेत्रात ३५ एकर जमीन आहे. केळी प्रमुख पीक आहे. परंतु बेवडसाठी दरवर्षी केळीखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात कलिंगडाची लागवड करतो. केळी पिकाखालील रिकाम्या क्षेत्रात कलिंगडाचे कमी खर्चात उत्पादन मिळते. यासाठी केळीच्या बेवडवर कलिंगड असते. टप्प्याटप्प्याने तीन-तीन एकरात लागवड केली आहे. ही लागवड जानेवारीच्या मध्यात सुरू करून फेबुवारीच्या मध्यात पूर्ण करण्यात आली. कलिंगडाची लागवड गादीवाफ्यावर मल्चिंग पेपर अंथरूण करण्यात आली आहे. त्याला ठिबक सिंचनाची सोय केली आहे.  यंदाचे नियोजन 

  • पीक एक महिन्याचे झाल्यानंतर एकरी १२ कामगंध आणि १० चिकट सापळे लावण्यात आले. त्यामुळे विविध किडींचा प्रतिबंध झाला.
  • मागील १५ ते १८ दिवसांत आठवड्यातून एकदा आवश्‍यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि विद्राव्ये खते ठिबकद्वारे देण्यात आली. तसेच बुरशीनाशकाची एक फवारणी घेण्यात आली.
  • आठवड्यातून २ वेळा सव्वातास सिंचनाचा पुरवठा करण्यात आला. 
  •  कलिंगड मल्चिंगवर घेतल्यामुळे तणनियंत्रण करण्याची गरज भासली नाही. पीक वाढीच्या अवस्थेत असताना फक्त २ गादीवाफ्यातील मधल्या भागात तणनियंत्रण करण्यात आले.
  •  सध्या जानेवारीमध्ये लागवड केलेल्या बागेतील कलिंगड फळांची काढणी सुरू आहे. योग्य व्यवस्थापन केल्यामुळे फळांची प्रत दर्जेदार आहे.
  • कोरोनामुळे सध्या कलिंगड विक्रीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे एकापेक्षा अधिक व्यापाऱ्यांच्या सतत संपर्कात राहत आहे.
  • पुढील १५ दिवसातील नियोजन 

  •  आता पीक सुमारे ४० दिवसांचे झाले आहे. कलिंगडामध्ये फुले आणि फळे लगडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
  •  तापमानात वाढ होत असल्याने सिंचनाचा कालावधी वाढवला जाईल. आठवड्यातून ३ वेळा ३ तास सिंचन केले जाईल. 
  •  फुलांचे रूपांतर फळांत होत असताना पिकाची पाण्याची गरज वाढते. याकाळात सिंचनावर विशेष लक्ष दिले जाईल.
  •  पुढील आठवड्यात बुरशीनाशकाची एक फवारणी घेणार आहे.
  •  फळमाशी, नागअळी व इतर किडींना रोखण्यासाठी जैविक आणि निम अर्काची आठवड्यातून १ फवारणी घेतली जाईल. 
  •  फळे तयार होण्याचा काळ कलिंगड पिकांत अत्यंत महत्त्वाचा असतो. फळांची चांगली वाढ होण्यासाठी पुढील पंधरवड्यात एकदा विद्राव्य खते ड्रीपद्वारे देण्यात येतील. 
  • फेब्रुवारीमध्ये लागवड केलेल्या बागेतील काढणीयोग्य फळांची काढणी केली जाईल.
  • - मुकेश पाटील,  ७७०९२२०११९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com