शेतकरी नियोजन पीक : डाळिंब

नातेपुते (ता. माळशिरस) येथे माझी ६० एकर शेती आहे. त्यात २५ एकर डाळिंब आहे. उर्वरित क्षेत्रावर ऊस, पपई अशी पिके आहेत. डाळिंबापासून वर्षातील हस्त आणि आंबिया या दोन बहरांत उत्पादन घेतो.हस्त बहर ऑगस्ट आणि आंबिया बहर फेब्रुवारीमध्ये धरला आहे. प्रत्येक बहराचे नियोजन ठरवून घेतले आहे.
Farmer Planning pomegranate crop
Farmer Planning pomegranate crop

नातेपुते (ता. माळशिरस) येथे माझी ६० एकर शेती आहे. त्यात २५ एकर डाळिंब आहे. उर्वरित क्षेत्रावर ऊस, पपई अशी पिके आहेत. गेल्या १२ वर्षांपासून मी डाळिंब शेती करतो. डाळिंबापासून वर्षातील हस्त आणि आंबिया या दोन बहरांत उत्पादन घेतो. या वर्षीही डाळिंब दोन टप्पे केले असून, हस्त बहर ऑगस्ट आणि आंबिया बहर फेब्रुवारीमध्ये धरला आहे. प्रत्येक बहराचे नियोजन ठरवून घेतले आहे. शेतकरी:  राजकुमार शंकरराव हिवरकर-पाटील गाव :  नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर एकूण क्षेत्र :  ६० एकर डाळिंब क्षेत्र :  २५ एकर नातेपुते (ता. माळशिरस) येथे माझी ६० एकर शेती आहे. त्यात २५ एकर डाळिंब आहे. उर्वरित क्षेत्रावर ऊस, पपई अशी पिके आहेत. गेल्या १२ वर्षांपासून मी डाळिंब शेती करतो. डाळिंबापासून वर्षातील हस्त आणि आंबिया या दोन बहरांत उत्पादन घेतो. या वर्षीही डाळिंब दोन टप्पे केले असून, हस्त बहर ऑगस्ट आणि आंबिया बहर फेब्रुवारीमध्ये धरला आहे. प्रत्येक बहराचे नियोजन ठरवून घेतले आहे. त्यानुसार त्या त्या हंगामात बागेचे नियोजन करतो. हस्त आणि आंबिया बहराच्या बागेचे क्षेत्र प्रत्येकी साडेबारा एकर आहे. ऑगस्टमधील हस्त बहराचे ऑक्टोबरच्या पावसाने नुकसान झाले, त्यामुळे सेटिंग कमी झाली. सध्या आंबिया बहरावर लक्ष केंद्रित केले आहे. मी सध्या डाळिंब उत्पादक संघाचा विभागीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहे. आंबिया बहराचे नियोजन 

  • एक जानेवारीला बाग ताणावर सोडली आहे. त्यानंतर विश्रांतीच्या काळात बागेची स्वच्छता केली.
  • त्यानंतर ०ः५२ः३४ व ०ः०ः५० या विद्राव्य खताची प्रति लिटर ४ ग्रॅम या प्रमाणे आलटून-पालटून फवारणी केली. फवारणीमुळे काडी पक्व होण्यास मदत झाली.
  • जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण बागेत खतासाठी चाऱ्या मारून घेतल्या.
  • आंबिया बहरातील झाडे ४ वर्षांची आहेत. त्यांना दुसऱ्या आठवड्यात शेणखत आणि कंपोस्ट खत प्रतिझाड ५० किलो या प्रमाणात दिले.
  • चौथ्या आठवड्यात रासायनिक खते एनपीके आणि सूक्ष्मअन्नद्रव्ये प्रति झाड ३ किलो प्रमाणात दिली आहेत.
  • फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झाडांची पानगळ केली. आणि त्यापुढील ४ ते ५ दिवसांत बागेची हलकी छाटणी करून घेतली.
  • त्यानंतर पुन्हा बागेची स्वच्छता केली.
  • फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बागेमध्ये पहिले पाणी सोडून बेड पूर्णपणे ओले करून घेतले.
  • त्यानंतर ८ दिवसांनी बागेतील झाडांना पाने, फुले फुटू लागली.
  • चौथ्या आठवड्यात आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कीडनाशकांची फवारणी घेतली.
  • पुढील वीस दिवसांचे नियोजन 

  • सध्या बाग सेटिंग अवस्थेत आहे.
  • एनपीके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा प्रतिझाड १ किलो या प्रमाणात डोस देणार आहे. त्यासोबत प्रतिझाड ५०० ग्रॅम निंबोळी पेंड देणार आहे.
  • उष्णता वाढत असल्याने बागेला गरजेनुसार एक दिवसाआड २ तास पाणी देणार आहे.
  • सध्या वाढत्या तापमानाची तीव्रता पाहता, बागेवर संरक्षण आच्छादन (प्रोटेक्शन कव्हर) आणि झाडाच्या बुंध्यात पाचटाचे आच्छादन करणार आहे.
  • संपर्क : राजकुमार हिवरकर पाटील, ९४२३३२८५०१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com