agricultural news in marathi Farmer Planning pomegranate crop | Page 2 ||| Agrowon

शेतकरी नियोजन पीक : डाळिंब

सुदर्शन सुतार
गुरुवार, 4 मार्च 2021

नातेपुते (ता. माळशिरस) येथे माझी ६० एकर शेती आहे. त्यात २५ एकर डाळिंब आहे. उर्वरित क्षेत्रावर ऊस, पपई अशी पिके आहेत. डाळिंबापासून वर्षातील हस्त आणि आंबिया या दोन बहरांत उत्पादन घेतो. हस्त बहर ऑगस्ट आणि आंबिया बहर फेब्रुवारीमध्ये धरला आहे. प्रत्येक बहराचे नियोजन ठरवून घेतले आहे.

नातेपुते (ता. माळशिरस) येथे माझी ६० एकर शेती आहे. त्यात २५ एकर डाळिंब आहे. उर्वरित क्षेत्रावर ऊस, पपई अशी पिके आहेत. गेल्या १२ वर्षांपासून मी डाळिंब शेती करतो. डाळिंबापासून वर्षातील हस्त आणि आंबिया या दोन बहरांत उत्पादन घेतो. या वर्षीही डाळिंब दोन टप्पे केले असून, हस्त बहर ऑगस्ट आणि आंबिया बहर फेब्रुवारीमध्ये धरला आहे. प्रत्येक बहराचे नियोजन ठरवून घेतले आहे.

शेतकरी: राजकुमार शंकरराव हिवरकर-पाटील
गाव : नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर
एकूण क्षेत्र : ६० एकर
डाळिंब क्षेत्र : २५ एकर

नातेपुते (ता. माळशिरस) येथे माझी ६० एकर शेती आहे. त्यात २५ एकर डाळिंब आहे. उर्वरित क्षेत्रावर ऊस, पपई अशी पिके आहेत. गेल्या १२ वर्षांपासून मी डाळिंब शेती करतो. डाळिंबापासून वर्षातील हस्त आणि आंबिया या दोन बहरांत उत्पादन घेतो. या वर्षीही डाळिंब दोन टप्पे केले असून, हस्त बहर ऑगस्ट आणि आंबिया बहर फेब्रुवारीमध्ये धरला आहे. प्रत्येक बहराचे नियोजन ठरवून घेतले आहे. त्यानुसार त्या त्या हंगामात बागेचे नियोजन करतो. हस्त आणि आंबिया बहराच्या बागेचे क्षेत्र प्रत्येकी साडेबारा एकर आहे. ऑगस्टमधील हस्त बहराचे ऑक्टोबरच्या पावसाने नुकसान झाले, त्यामुळे सेटिंग कमी झाली. सध्या आंबिया बहरावर लक्ष केंद्रित केले आहे. मी सध्या डाळिंब उत्पादक संघाचा विभागीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहे.

आंबिया बहराचे नियोजन 

 • एक जानेवारीला बाग ताणावर सोडली आहे. त्यानंतर विश्रांतीच्या काळात बागेची स्वच्छता केली.
 • त्यानंतर ०ः५२ः३४ व ०ः०ः५० या विद्राव्य खताची प्रति लिटर ४ ग्रॅम या प्रमाणे आलटून-पालटून फवारणी केली. फवारणीमुळे काडी पक्व होण्यास मदत झाली.
 • जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण बागेत खतासाठी चाऱ्या मारून घेतल्या.
 • आंबिया बहरातील झाडे ४ वर्षांची आहेत. त्यांना दुसऱ्या आठवड्यात शेणखत आणि कंपोस्ट खत प्रतिझाड ५० किलो या प्रमाणात दिले.
 • चौथ्या आठवड्यात रासायनिक खते एनपीके आणि सूक्ष्मअन्नद्रव्ये प्रति झाड ३ किलो प्रमाणात दिली आहेत.
 • फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झाडांची पानगळ केली. आणि त्यापुढील ४ ते ५ दिवसांत बागेची हलकी छाटणी करून घेतली.
 • त्यानंतर पुन्हा बागेची स्वच्छता केली.
 • फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बागेमध्ये पहिले पाणी सोडून बेड पूर्णपणे ओले करून घेतले.
 • त्यानंतर ८ दिवसांनी बागेतील झाडांना पाने, फुले फुटू लागली.
 • चौथ्या आठवड्यात आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कीडनाशकांची फवारणी घेतली.

पुढील वीस दिवसांचे नियोजन 

 • सध्या बाग सेटिंग अवस्थेत आहे.
 • एनपीके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा प्रतिझाड १ किलो या प्रमाणात डोस देणार आहे. त्यासोबत प्रतिझाड ५०० ग्रॅम निंबोळी पेंड देणार आहे.
 • उष्णता वाढत असल्याने बागेला गरजेनुसार एक दिवसाआड २ तास पाणी देणार आहे.
 • सध्या वाढत्या तापमानाची तीव्रता पाहता, बागेवर संरक्षण आच्छादन (प्रोटेक्शन कव्हर) आणि झाडाच्या बुंध्यात पाचटाचे आच्छादन करणार आहे.

संपर्क : राजकुमार हिवरकर पाटील, ९४२३३२८५०१


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...