शेतकरी नियोजन पीक ः डाळिंब

सध्या बाग ताणावर सोडली आहे. मळद येथील ६० एकर डाळिंब बागेतील फळांची काढणी येत्या ४ ते ५ दिवसांत सुरू होईल. वाढत्या उन्हामुळे डाळिंब फळांवर डाग पडण्याची शक्यता असते. यासाठी ४० एकरांवर प्रोटेक्शन नेटचा आणि २० एकरांवर कागदी पेपरचा वापर केला आहे. येथील १० एकर क्षेत्रावर आंबिया बहर धरला आहे.
Amarjit Jagtap in his pomegranate orchard.
Amarjit Jagtap in his pomegranate orchard.

सध्या बाग ताणावर सोडली आहे. मळद येथील ६० एकर डाळिंब बागेतील फळांची काढणी येत्या ४ ते ५ दिवसांत सुरू होईल. वाढत्या उन्हामुळे डाळिंब फळांवर डाग पडण्याची शक्यता असते. यासाठी ४० एकरांवर प्रोटेक्शन नेटचा आणि २० एकरांवर कागदी पेपरचा वापर केला आहे. येथील १० एकर क्षेत्रावर आंबिया बहर धरला आहे. शेतकरी ः अमरजित जगताप गाव :  वाखरी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर एकूण क्षेत्र :   १५ एकर भाडेतत्त्वावरील क्षेत्र :  १३० एकर डाळिंब क्षेत्र :  १४५ एकर वाखरी (ता. पंढरपूर) येथे माझी १५ एकर शेती आहे. त्याशिवाय मळद (ता. दौंड) येथे भाडेकरारावर १३० एकर शेती घेतली आहे. तेथील संपूर्ण क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली आहे. माझ्या वाखरी येथील शेतीतही पूर्ण डाळिंब क्षेत्र आहे. त्यातील १० एकरांवर भगवा आणि ५ एकरांवर गणेश या डाळिंब जातींची लागवड केली आहे. मी दरवर्षी डाळिंबाचा लेट मृग बहर धरतो. लेट मृग बहरातील डाळिंब फळांची काढणी करण्यात आली. दरवर्षीच्या तुलनेने यंदा कमी उत्पादन मिळाले. सध्या बाग ताणावर सोडली आहे. मळद येथील ६० एकर डाळिंब बागेतील फळांची काढणी येत्या ४ ते ५ दिवसांत सुरू होईल. वाढत्या उन्हामुळे डाळिंब फळांवर डाग पडण्याची शक्यता असते. यासाठी ४० एकरांवर प्रोटेक्शन नेटचा आणि २० एकरांवर कागदी पेपरचा वापर केला आहे. येथील १० एकर क्षेत्रावर आंबिया बहर धरला आहे. बहराचे व्यवस्थापन 

  • आंबिया बहर धरण्यासाठी १ फेब्रुवारीला पानगळ केली होती. सध्या ७० टक्के बागेमध्ये फळे धरण्यास सुरू झाले आहे.
  • मागील १० दिवसांमध्ये आकाश ढगाळ होते. या काळात डाळिंब बागेला कमी पाणी देत होतो.
  • या वातावरणामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्या नियंत्रणासाठी सिंचनावर विशेष लक्ष देण्यात आले.
  • कीड- रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जैविक कीडनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर करण्यात आला.
  •  मागील १० दिवसांमध्ये जिवाणू स्लरीचा ड्रीपच्या पाण्यातून वापर करण्यात आला.
  • सध्या बाग फळे धरण्याच्या अवस्थेत आहे. बागेतील वेगवेगळ्या टप्प्यातील फळांना पेपर कव्हर घालण्यात आले आहेत.
  • तसेच जमिनीत पाण्याचा ओलावा कायम राहण्यासाठी बागेत मल्चिंग करण्याचे काम सुरू आहे.
  • पुढील वीस दिवसांतील नियोजन 

  • आता लेट मृग बहरातील बागेत येत्या ४ ते ५ दिवसांत डाळिंब फळांची काढणी सुरू होईल.
  • नवीन बहर धरलेल्या दहा एकर क्षेत्रावरील बाग फळ धरण्याच्या अवस्थेत आहे. त्या बागेला नियोजनानुसार पाणी दिले जाईल. बागेला ड्रीपद्वारे युरिया, पोटॅशिअम दिले जाईल.
  • प्रत्येक फवारणीमधून सिलिकॉन वापर करणार आहे. त्याचा बाष्पीभवन कमी करण्यास फायदा होतो, असा माझा अनुभव आहे.
  • आंबिया बहरातील बागेमध्ये पाचट टाकण्याचे काम सुरू करणार आहे.
  • - अमरजित जगताप, ९६३७१३००५३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com