agricultural news in marathi Farmer Planning - Poultry | Agrowon

शेतकरी नियोजन - कुक्कुटपालन

अभिजित डाके
गुरुवार, 18 नोव्हेंबर 2021

मी मागील २० वर्षांपासून लेअर पक्ष्यांचा पोल्ट्री व्यवसाय करत आहे. या पक्ष्यांचे संगोपन प्रामुख्याने अंड्यांसाठी करतो. एका पक्ष्यापासून साधारण दीड वर्षापर्यंत अंडी उत्पादन घेऊन नंतर मांसासाठी पक्ष्यांची विक्री केली जाते. प्रति पक्षी साधारण ३२५ ते ३३० अंडी इतके उत्पादन मिळेल, अशा पद्धतीने व्यवस्थापन केले जाते.

नाव : शत्रुघ्न नामदेव जाधव
गाव : विटा, ता. विटा, जि. सांगली
लेअर (अंड्यांवरील पक्षी) : ४० हजार
शेडची लांबी : ३२० बाय ३५ फूट

मी मागील २० वर्षांपासून लेअर पक्ष्यांचा पोल्ट्री व्यवसाय करत आहे. या पक्ष्यांचे संगोपन प्रामुख्याने अंड्यांसाठी करतो. एका पक्ष्यापासून साधारण दीड वर्षापर्यंत अंडी उत्पादन घेऊन नंतर मांसासाठी पक्ष्यांची विक्री केली जाते. प्रति पक्षी साधारण ३२५ ते ३३० अंडी इतके उत्पादन मिळेल, अशा पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. शेडमध्ये पक्षी आणल्यापासून ते पक्षी विक्री करेपर्यंत काटेकोर नियोजन केले जाते. सध्या लेअर (अंड्यांवरील पक्षी) ४० हजार आणि ब्रूडिंग शेडमध्ये १८ हजार पक्षी आहेत. शेडमध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो.

लेअर पक्ष्यांचे संगोपन 

 • साधारण १ दिवस वयाचे पिल्ले आणून ब्रूडिंगसाठी शेडमध्ये ठेवली जातात. या शेडमध्ये खाली तुसाचा वापर केला जातो.
 • पिल्ले साडेतीन महिन्यांची झाल्यानंतर लेअर शेडमध्ये स्थलांतरित केली जातात.
 • पक्षी कोणत्याही आजारास बळी पडू नयेत, यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लसीकरण पूर्ण केले जाते.
 • सुरुवातीला प्रति पक्षी अंडी उत्पादन कमी मिळते. पक्षी साधारण २२ ते २४ आठवड्यांचे झाल्यानंतर अंडी उत्पादनात वाढ होते. प्रति पक्षी ३२५ ते ३३० अंडी इतके उत्पादन मिळते. साधारण दीड वर्षापर्यंत या पक्ष्यांपासून अंडी उत्पादन घेतले जाते.
 • उत्पादित सर्व अंड्यांची जागेवरच विक्री केली जाते.
 • दीड वर्षानंतर पक्ष्यांची मांसासाठी विक्री केली जाते. विक्रीवेळी एक पक्षी साधारण दीड किलो वजनाचा भरतो. त्यास साधारण १२० ते १५० रुपये प्रति किलो इतका दर मिळतो.

व्यवस्थापनातील इतर बाबी 

 • दररोज सकाळी नियमित शेडची स्वच्छता केली जाते.
 • माझी स्वतःची फीडमिल असून तेथे खाद्य तयार केले जाते. गरजेनुसार दररोज साधारण ४ ते ५ टनांपर्यंत खाद्य तयार केले जाते.
 • पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत दर्जा व गुणवत्तेचे निकष पाळले जातात. पाण्याच्या टाक्या १५ दिवस ते महिन्याच्या अंतराने स्वच्छ केल्या जातात.
 • रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना चुन्याच्या साह्याने शेडचे निर्जंतुकीकरण केले जाते. शेडमध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. त्यामुळे पक्षी आजारास बळी पडण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते.
 • लेअर शेडमध्ये खाद्य देण्यासाठी संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे खाद्य व्यवस्थापन सोपे होते.
 • उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांमध्ये मरतूक जास्त असते. शेडमधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी फॉगर लावले आहेत.
 • शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी चारी बाजूंनी जाळी लावण्यात आली आहे.
 • शेडमध्ये जमा होणारे कोंबडीखताची परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केली जाते.

- शत्रुघ्न जाधव,९८९०३०७८४५


इतर कृषी सल्ला
द्राक्ष बागेतील भुरी रोगाचे करा प्रभावी...वातावरणात होणारे हे बदल द्राक्ष बागेत भुरी रोगाचा...
उन्हाळी मूग लागवड तंत्रउन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी...
नंदनवनातील शेती केवळ मॉन्सून, उन्हाळीबादशाह जहांगीरने काश्मीरबाबत बोलताना म्हटले होते...
रेडूविड ढेकूण मित्र कीटकाची करा घरगुती...भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आणि...
किमान तापमानात घट; थंडीत वाढ शक्‍यमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून ते...
उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे नियोजनउन्हाळी सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी...
गव्हातील अन्नद्रव्यांची कमतरताजमिनीचा प्रकार, खत आणि पाणी व्यवस्थापन, जाती अशा...
एनपीए : कृषी कर्जाची थकबाकीएखाद्या कर्जखात्याचे हप्ते वेळच्या वेळी न गेल्यास...
शेतकरी नियोजन पीक : काजूशेतकरी ः उत्तम दाजी वालावलकर गाव ः वेतोरे, ता....
वनशेतीमध्ये शिसव लागवडीला संधीशिसवाच्या लाकडाला उच्च श्रेणीचे फर्निचर, प्लायवूड...
शेतकरी उत्पादक कंपन्यांना करारशेतीतील...करार शेती ही आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये ‍...
शेतकरी नियोजन : पीक हापूस आंबाशेतकरी : देवेंद्र ज्ञानेश्‍वर झापडेकर गाव...
मूल्यवर्धित स्पेंट मशरूम कंपोस्टमूल्यवर्धित स्पेंट मशरूम कंपोस्टचा वापर...
कमाल, किमान तापमानातील तफावतीमुळे...सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत तापमानामध्ये...
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः...
शेतकरी नियोजन पीक : केसर आंबाशेतकरी : तय्यब हुसेन दारूवाला गाव : ...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
शेतकरी नियोजन पीक : गहू दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने १० एकर तर...
शेवगा पिकावरील कीड-रोगाचे व्यवस्थापनशेवगा हे पीक तुलनेने काटक असल्याने कीड व रोगांचा...
कमाल अन् किमान तापमानात वाढ शक्‍यमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १०१४...