शेतकरी नियोजन पीक : गुलाब

पवनानगर येथील ‘पवनानगर फूल उत्पादक संघा''च्या माध्यमातून ज्ञानेश्‍वर ठाकर हे पॉलिहाउसमध्ये गुलाबाचे उत्पादन घेतात. ज्ञानेश्‍वर ठाकर यांनी दीड एकर क्षेत्रावर पॉलिहाउसमध्ये गुलाब शेतीचे योग्य नियोजन केले आहे.
Dnyaneshwar Thacker has planned roses in his 1.5 acre polyhouse.
Dnyaneshwar Thacker has planned roses in his 1.5 acre polyhouse.

व्हॅलेंटाइन संपल्यानंतर पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर मावळमधील गुलाब उत्पादक शेतकरी हा‌ लग्नसराईमध्ये फुले विक्रीला‌ येण्यासाठी तयारी करत असतो. पवनानगर येथील ‘पवनानगर फूल उत्पादक संघा''च्या माध्यमातून ज्ञानेश्‍वर ठाकर हे पॉलिहाउसमध्ये गुलाबाचे उत्पादन घेतात. ज्ञानेश्‍वर ठाकर यांनी दीड एकर क्षेत्रावर पॉलिहाउसमध्ये गुलाब शेतीचे योग्य नियोजन केले आहे. शेतकरी :  ज्ञानेश्‍वर ठाकर गाव :  पवनानगर, मावळ, जि. पुणे एकूण क्षेत्र :  दीड एकर हरितगृहामधील गुलाब क्षेत्र :  दीड एकर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फूल उत्पादक‌ शेतकरी मावळ तालुक्यात आहे. व्हॅलेंटाइन संपल्यानंतर पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर मावळमधील गुलाब उत्पादक शेतकरी हा‌ लग्नसराईमध्ये फुले विक्रीला‌ येण्यासाठी तयारी करत असतो. पवनानगर येथील ‘पवनानगर फूल उत्पादक संघा''च्या माध्यमातून ज्ञानेश्‍वर ठाकर हे पॉलिहाउसमध्ये गुलाबाचे उत्पादन घेतात. ज्ञानेश्‍वर ठाकर यांनी दीड एकर क्षेत्रावर पॉलिहाउसमध्ये गुलाब शेतीचे योग्य नियोजन केले आहे. लग्नसराईमध्ये लाल रंगाच्या (टॉप सिक्रेट) या जातीच्या फुलांना अधिक मागणी असते. त्यामुळे या गुलाबाचे चांगले नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने विविध प्रकारच्या कामांवर भर दिला आहे. मागील पंधरा दिवसांतील कामकाज 

  • कोरोनामुळे या वर्षी व्हॅलेंटाइनमध्ये फक्त ३० टक्केच फुलांची निर्यात झाली. व्हेंलेटाइन डेच्या काळात फुलांना अपेक्षेप्रमाणे दर मिळाला नाही. पर्यायाने निर्यातही कमी प्रमाणात झाली. त्यामुळे या वर्षीची संपूर्ण मदार ही लग्नसराईवर अवलंबून आहे.
  • या हंगामात व्हॅलेंटाइनमध्ये ४० हजार फुलांची निर्यात झाली. त्यास प्रति गुलाब १२ रुपये इतका दर मिळाला.
  • १५ फेब्रुवारीनंतर दररोज वेळेप्रमाणे खत पाणी देणे, झाडांवर पाणी मारणे, क्लिप करणे, तण काढणे ही कामे करण्यात आली.
  • पॉलिहाउसमधील गुलाबाच्या वाळलेल्या फांद्या कापणे, तसेच पिवळा पाला बाहेर काढून बाग स्वच्छ करण्यात आली.
  • लग्नसराईमध्ये इतर फुलांसोबत लाल रंगाच्या (टॉप सिक्रेट) गुलाबांना मोठी मागणी असते. त्यानुसार नियोजन केले आहे.
  • पॉलिहाउसवरील कागदावर काव आणि पांढरा रंग शिंपडण्यात आला. यामुळे उन्हाळ्यात तीव्र उन्हापासून झाडांचे संरक्षण होण्यास मदत होईल.
  • मागील पाच दिवसांपासून लग्न हंगामाची तयारी सुरू केली आहे.
  • पुढील पंधरा दिवसांचे नियोजन

  • दर्जेदार फुलांचे उत्पादन घेण्यासाठी १० मार्च ते ३१ मार्च या २१ दिवसांच्या कालावधीत नियोजन केले जाते.
  • येत्या काळात कटिंग, वेडिंग, क्लिपिंग तसेच योग्यरीत्या मशागत करणे इत्यादी कामांवर भर दिला जाईल.
  • उष्णतेत वाढ होत असल्याने त्यानुसार पाण्याचे नियोजन केले जाईल.
  • फुलांचा आकार मोठा राहावा यासाठी सेंद्रिय खत आणि विविध फवारण्‍या घेण्यात येतील.
  • सध्या २० फुलांच्या गुलाब गड्डींची १२० ते १३० रुपये प्रमाणे विक्री होत आहे. स्थानिक बाजारपेठेत ६ ते ७ रुपये प्रति गुलाब इतका दर मिळतो आहे.
  • लग्न सराईच्या काळात फुलांना चांगला दर मिळेल अशी आशा आहे.
  • - ज्ञानेश्‍वर ठाकर,  ९८२३७८०९९६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com