शेतकरी नियोजन पीक टोमॅटो

माझी दीड एकर टोमॅटो लागवड आहे. पावसाळी हंगामासाठी खासगी कंपनीच्या संकरित वाणाची लागवड केली आहे. पावसाळ्यात तग धरणारे हे वाण असून, गेल्या दोन वर्षांपासून मी या वाणाचे उत्पादन घेत आहे. या वाणाचे लागवडीनंतर साधारण ६५ दिवसांनी उत्पादन सुरू होते. ऐन पावसाळ्यात काढणी सुरू होते.
Balkrishna Pate uses improved techniques including mulching in rainfed tomato cultivation.
Balkrishna Pate uses improved techniques including mulching in rainfed tomato cultivation.

माझी दीड एकर टोमॅटो लागवड आहे. पावसाळी हंगामासाठी खासगी कंपनीच्या संकरित वाणाची लागवड केली आहे. पावसाळ्यात तग धरणारे हे वाण असून, गेल्या दोन वर्षांपासून मी या वाणाचे उत्पादन घेत आहे. या वाणाचे लागवडीनंतर साधारण ६५ दिवसांनी उत्पादन सुरू होते. ऐन पावसाळ्यात काढणी सुरू होते. शेतकरी :  बाळकृष्ण पाटे गाव :  नारायणगांव, ता.जुन्नर, जि. पुणे. एकूण क्षेत्र :  १५ एकर. टोमॅटो क्षेत्र :  दीड एकर. माझी दीड एकर टोमॅटो लागवड आहे. पावसाळी हंगामासाठी खासगी कंपनीच्या संकरित वाणाची लागवड केली आहे. पावसाळ्यात तग धरणारे हे वाण असून, गेल्या दोन वर्षांपासून मी या वाणाचे उत्पादन घेत आहे. या वाणाचे लागवडीनंतर साधारण ६५ दिवसांनी उत्पादन सुरू होते. ऐन पावसाळ्यात काढणी सुरू होते. आर्द्रतेचा विपरीत परिणाम पिकावर होऊ नये आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमीत कमी राहावा, या उद्देशाने टोमॅटोच्या दोन ओळींमधील अंतर ५ फूट ठेवले आहे. सध्या पावसाळी वातावरण असल्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक बुरशीनाशकांची फवारणीचे नियोजन बसवले आहे. अन्य जिवाणूजन्य रोगाचाही प्रादुर्भाव होतो. त्यासाठीही प्रतिबंधात्मक फवारणीचा अंतर्भाव या नियोजनादरम्यान करतो.

  •  पावसाळी वातावरण असल्याने सिंचनासाठी फारशी आवश्यकता भासत नाही. मात्र पावसाचा खंड पडल्यास सिंचनाचे नियोजन करतो. प्रवाही पद्धतीने विद्राव्य खते देता येत नाहीत. यामुळे फळांची फुगवण आणि चांगली चमक येण्यासाठी स्फुरद, पालाश आणि मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांची फवारणीद्वारे पूर्तता केली जाते.
  • वातावरणात सध्या सूर्यप्रकाश नसल्याने झाड मुळांद्वारे पाणी ओढून फळाद्वारे बाहेर काढते. यामुळे फळांना क्रॅकिंग होते. हे क्रॅकिंग रोखण्यासाठी कॅल्शिअम आणि बोरॉनची फवारणी उपयुक्त ठरत असल्याचा माझा अनुभव आहे.
  • दोन ओळींमधील अंतर पाच फुटांपर्यंत ठेवल्यामुळे हवा खेळती राहून पावसाळी वातावरणात बुरशींचा प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होते. मात्र या जागेत तण नियंत्रणासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. तणांचे प्रमाण वाढल्यास तणांवरून रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढत राहतो. तो आटोक्यात आणणे शक्य होत नाही. तणनियंत्रणासाठी मजुरांची उपलब्धता आमच्या भागात कमी आहे. यामुळे तणनाशकांचा वापर करतो.
  • हलक्या जमिनींची निवड आणि थोडी आधी लागवड 

  • पावसाळ्यात पीक घेताना शेतातील पाण्याचा निचरा होणाऱ्या विशेषतः हलक्या जमिनीची निवड करतो. यामुळे पाऊस जास्त झाला तरी शेतात पाणी जास्त काळ साठत नाही. पाणी साठल्यास मूळकूज होण्याचा धोका असतो. यामुळे फळांचा दर्जादेखील खालावतो.
  • आमच्या जुन्नर तालुक्यात बहुतेक शेतकरी उन्हाळी टोमॅटोचे पीक घेतात. यासाठी गुढीपाडव्याला लागवड करतात. मात्र उन्हाळी हंगाम संपत आल्यावर बाजारातील टोमॅटोची आवक कमी होऊ लागते. यामुळे दरही चांगला मिळू शकतो. याचा फायदा मिळवण्यासाठी मी मे महिन्यात लागवड १० तारखेच्या दरम्यान करतो. लागवडीनंतर साधारण ६५ दिवसांनी म्हणजेच साधारण जुलै ते सप्टेंबर या काळात तोडणी हंगाम चालू राहतो. शिवाय पावसाळ्यात पीक घेत असल्याने अधिक निचरा होणारी आणि हलकी जमीन शेतीखाली आणता येते. एकूण फायद्यात वाढ होते.
  •  टोमॅटो पिकामध्ये प्लॅस्टिक मल्चिंग करतो. त्याचा तणनियंत्रणासोबतच पावसाचे पाणी कमी प्रमाणात मुळांच्या कक्षेमध्ये राहण्यासाठी फायदा होतो. यामुळे क्रॅकिंग टाळण्यास मदत होते.
  • -  बाळकृष्ण पाटे, ९२८४३२१६७०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com