शेतकरी नियोजन पीक : गुलाब

‘व्हॅलेटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर मावळ तालुक्यात गुलाब फूल उत्पादकांची लगबग सुरू आहे. व्हॅलेनटाइनच्या काळात गुलाबांना मोठी मागणी असते. तालुक्यातील पवनानगर येथील ‘पवनानगर फूल उत्पादक संघा’च्या माध्यमातून मुकुंद ठाकर हे पॉलिहाउसमध्ये गुलाबाचे उत्पादन घेतात.
rose flower crop planning
rose flower crop planning

‘व्हॅलेटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर मावळ तालुक्यात गुलाब फूल उत्पादकांची लगबग सुरू आहे. व्हॅलेनटाइनच्या काळात गुलाबांना मोठी मागणी असते. तालुक्यातील पवनानगर येथील ‘पवनानगर फूल उत्पादक संघा’च्या माध्यमातून मुकुंद ठाकर हे पॉलिहाउसमध्ये गुलाबाचे उत्पादन घेतात. ते पॉलिहाउसमध्ये विविध फुलांच्या रंगांच्या व जातींच्या गुलाबाचे उत्पादन घेतात. ​ शेतकरी :  मुकुंद ठाकर गाव: पवनानगर गुलाब क्षेत्र :  १५ एकर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फुल उत्पादन मावळ तालुक्यात आहेत. ‘व्हॅलेटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर मावळ तालुक्यात गुलाब फूल उत्पादकांची लगबग सुरू आहे. व्हॅलेनटाइनच्या काळात गुलाबांना मोठी मागणी असते. तालुक्यातील पवनानगर येथील ‘पवनानगर फूल उत्पादक संघा’च्या माध्यमातून मुकुंद ठाकर हे पॉलिहाउसमध्ये गुलाबाचे उत्पादन घेतात. ते पॉलिहाउसमध्ये विविध फुलांच्या रंगांच्या व जातींच्या गुलाबाचे उत्पादन घेतात. यात मुख्यत्वेकरून व्हॅलेटाइनसाठी लाल रंगाच्या (टॉप सिक्रेट जातीच्या) फुलांना जास्त मागणी असते.‘व्हॅलेटाइन डे’साठी दर्जेदार फुलांचे उत्पादन घेण्यासाठी मागील १५ ते २० दिवसांपासून नियोजन केले आहे. तसेच पुढील काही दिवस विविध कामांवर भर दिला जाणार आहे. मागील पंधरा दिवसांतील कामकाज 

  • ‘व्हॅलेटाइन डे’ची तयारी साधारणपणे १ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत करण्यात आली.
  • डिसेंबर महिन्यात कटिंग, बेडिंग, क्लिपिंग, योग्यरीत्या मशागत अशी विविध कामे करण्यात आली.
  • चालू वर्षी उशिराच्या पावसामुळे व सततच्या हवामान बदलामुळे गुलाब शेतीलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे निर्यातक्षम माल तयार करण्यासाठी खर्चात दुप्पट वाढ झाली.
  • थंडीचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पादनात घट आली आहे. तसेच फुले वेळेआधीच उमलत आहेत.
  • ‘व्हॅलेटाइन डे’च्या तयारीसाठी पॉलिहाउसमध्ये जाऊन दररोज फुलांची पाहणी केली जाते.
  • फुलांवर कोणत्याही प्रकारच्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.
  • फुले साठवणीच्या शीतगृहाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
  • निर्यातक्षम गुलाब उत्पादनासाठी कीडनाशक फवारणी, सेंद्रिय तसेच रासायनिक खतांच्या वापरावर भर दिला जातो. 
  • दरवर्षी साधारणपणे २० ते २६ जानेवारी या काळात परदेशातील व्यापारी पॉलिहाउसवर येऊन निर्यातक्षम फुलांची पाहणी करतात. फुलांची पाहणी केल्यानंतर त्यांची किंमत ठरवून बुकिंग केले जाते.
  • या वर्षी कोरोनामुळे व्यापारी फुले पाहणीसाठी आले नाहीत. मात्र व्यापाऱ्यांद्वारे ऑनलाइन माध्यमातून फुले पाहून मागणी करण्यात आली.
  • गुवाहाटी, नागालॅंड, कोलकाता, जम्मू, दिल्ली, अमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट, पणजी, बंगलोर, हैदराबाद, पटना, इंदोर, छत्तीसगड, नागपूर, अमरावती, भंडारा, मुंबई, पुणे या ठिकाणी फुलांची विक्री केली आहे. 
  • सध्या २० फुलांची गुलाब गड्डींची १२० ते १३० रुपये प्रमाणे विक्री होत आहे. 
  • स्थानिक बाजारपेठेत ६ ते ७ रुपये प्रति गुलाब इतका दर मिळतो आहे. 
  • निर्यातक्षम गुलाबास प्रति गुलाब १२ ते १३ रुपये दर मिळतो. 
  • पुढील १५ दिवसांचे नियोजन 

  • फुलांची निर्यात २८ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात विविध देशांत केली जाते.
  • सध्या गुलाब फुलांच्या पॅकिंगची तयारी, पॉलिहाउसची स्वच्छता ही कामे चालू आहेत.
  • गुलाब फुलांची निर्यात ३० जानेवारीपासून सुरू होईल.
  • हॉलंड, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांत गुलाबाची निर्यात होत असते. मात्र चालू वर्षी मागणी कमी असल्याने फुलांची निर्यात कमी होणार आहे.
  • संघाने यंदा ५ लाख गुलाब फुलांच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
  • एकरी ४० हजार निर्यातक्षम गुलाब मिळतात. त्यापासून एकरी ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. 
  • - मुकुंद ठाकर,  ९८२३४४०८०३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com