राज्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आठ-पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत म
ताज्या घडामोडी
शेतकरी नियोजन (पीक : हरभरा)
सध्या पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन ठेवले आहे. तसेच एकात्मिक पद्धतीने पिकामधील कीडनियंत्रणावरही भर दिला आहे. पिकाला आतापर्यंत तुषार सिंचनाने दोन पाणी पाणी दिले आहे. शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी केली आहे.
सध्या पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन ठेवले आहे. तसेच एकात्मिक पद्धतीने पिकामधील कीडनियंत्रणावरही भर दिला आहे. पिकाला आतापर्यंत तुषार सिंचनाने दोन पाणी पाणी दिले आहे. शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी केली आहे.
शेतकरी : निंबाजी लखाडे
गाव : खुदनापुर, ता. मेहकर, जि. बुलडाणा
एकूण क्षेत्र : सोळा एकर
हरभरा क्षेत्र : साडेसहा एकर
मी गेल्या बारा वर्षांपासून हरभऱ्याच्या नवीन जातींचे बीजोत्पादन घेतो. यंदा ‘महाबीज’चा ब्रीडर प्लॉट घेतला आहे. हरभऱ्याच्या फुले विक्रांत जातीची लागवड केली आहे. १४ नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टरचलित यंत्राने पेरणी केली. एकरी २५ किलो बियाणे वापरले. बियाणे पेरताना जमिनीत एकरी १०० किंलो सिंगल सुपर फॉस्फेट खत दिले. बीजप्रक्रिया करूनच बियाणे पेरणी केल्यामुळे उगवण
चांगली झाली.
सध्या पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन ठेवले आहे. तसेच एकात्मिक पद्धतीने पिकामधील कीडनियंत्रणावरही भर दिला आहे. पिकाला आतापर्यंत तुषार सिंचनाने दोन पाणी पाणी दिले आहे. शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी केली आहे. योग्य व्यवस्थापनामुळे पिकाची भरपूर वाढ झाली, तसेच फुलधारणाही झाली आहे. यंदा साडेसहा एकरावर हरभरा बियाण्यात गावरान धने, मेथी, मका प्रत्येकी एक किलो या प्रमाणात मिसळून पेरले आहे. या पिकांच्या फुलोऱ्यामुळे मधमाश्या आकर्षित होण्यास मदत होऊन उत्पादनवाढीला मदत होणार आहे. दरवर्षी मला एकरी ८ ते १२ क्विंटल उत्पादन मिळते.
यंदाचे नियोजन
- खरीप पिकाच्या काढणीनंतर शेताची व्यवस्थित मशागत करून घेतली.
- त्यानंतर १४ नोव्हेंबरला साडेसहा एकरांत फुले विक्रांत जातीची लागवड केली आहे.
- एकरी २५ किलो बियाणे वापरले. ट्रायकोडर्मा आणि जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रियाकरूनच पेरणी केली.
- दोन तासांतील अंतर सोळा इंच आहे. सात तासांनंतर पावणेदोन फुटाचा पट्टा सोडला आहे.
- पट्ट्यामुळे फवारणी करणे सोपे जाते. तसेच तुषार सिंचनाच्या पाइपची हाताळणी सोपी होते.
- आतापर्यंत पिकाच्या गरजेनुसार दोन वेळा पाणी दिले आहे. एकदा निंदणी केली आहे.
- कीडनियंत्रणासाठी आतापर्यंत कीडनाशकाच्या दोन फवारण्या घेतल्या आहेत.
पुढील पंधरवड्यातील नियोजन
- सध्या पीक घाटे अवस्थेत आहे. एकरी दोन कामगंध सापळे लावले आहेत.
- पुढील टप्यात पिकावर घाटे अळीच्या नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीडनाशकाच्या फवारणीचे नियोजन आहे. पिकाच्या गरजेनुसार तुषार सिंचनाने एक पाणी देण्याचे नियोजन आहे.
संपर्क - निंबाजी लखाडे, ८२७५३४३२६४