शेतकरी नियोजन (पीक : कलिंगड)

माझी गाढोदे (ता. जळगाव) येथे गिरणा, तापी नदीच्या लाभक्षेत्रात ३५ एकर जमीन आहे. केळी प्रमुख पीक असून, त्याखाली १५ एकर क्षेत्र आहे. परंतु बेवडसाठी दरवर्षी केळीखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात कलिंगडाची लागवड करतो. केळी पिकाखालील रिकाम्या क्षेत्रात कलिंगडाचे कमी खर्चात उत्पादन मिळते.​
 गादीवाफ्यावर कलिंगड रोपांची लागवड करण्यात आली.
गादीवाफ्यावर कलिंगड रोपांची लागवड करण्यात आली.

माझी गाढोदे (ता. जळगाव) येथे गिरणा, तापी नदीच्या लाभक्षेत्रात ३५ एकर जमीन आहे. केळी प्रमुख पीक असून, त्याखाली १५ एकर क्षेत्र आहे. परंतु बेवडसाठी दरवर्षी केळीखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात कलिंगडाची लागवड करतो. केळी पिकाखालील रिकाम्या क्षेत्रात कलिंगडाचे कमी खर्चात उत्पादन मिळते.​ शेतकरीः  मुकेश डोंगर पाटील गावः गाढोदे, ता. जि. जळगाव एकूण क्षेत्रः  ३५ एकर कलिंगडाखालील क्षेत्रः  १० एकर माझी गाढोदे (ता. जळगाव) येथे गिरणा, तापी नदीच्या लाभक्षेत्रात ३५ एकर जमीन आहे. केळी प्रमुख पीक असून, त्याखाली १५ एकर क्षेत्र आहे. परंतु बेवडसाठी दरवर्षी केळीखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात कलिंगडाची लागवड करतो. केळी पिकाखालील रिकाम्या क्षेत्रात कलिंगडाचे कमी खर्चात उत्पादन मिळते. कलिंगडाची टप्प्याटप्प्याने तीन-तीन एकरांत लागवड केली जाते. ही लागवड डिसेंबरच्या मध्यापासून सुरू केली. शेवटच्या तीन एकरांतील लागवड ४ फेब्रुवारी रोजी केलेली आहे. यामागे रमजान महिन्यात कलिंगडास चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे. मागील झालेले कामकाज 

  • सुरुवातीला २ वेळा रोटाव्हेटर फिरवून जमीन चांगली भुसभुशीत करून घेतली.
  • लागवडीसाठी सव्वातीन फूट रुंद व सव्वा फूट उंच गादीवाफे तयार केले.
  • गादीवाफ्याच्या कडेची माती व्यवस्थित बसण्यासाठी बैलजोडीचलित नांगर सरीमध्ये फिरवला. यामुळे गादीवाफा व्यवस्थित तयार झाला. 
  • एका गादीवाफ्यावर कलिंगडाच्या एकाच ओळीचे नियोजन केले आहे.
  • गादीवाफे व्यवस्थित केल्यानंतर त्यावर ठिबक सिंचनाच्या लॅटरल टाकून घेतल्या. प्रत्येक ओळीत एक लॅटरल टाकलेली आहे. दोन ड्रीपमधील अंतर सव्वा फूट आहे.   रासायनिक खतांचा बेसल डोस गादीवाफ्यात नळीलगतच देण्यात आला. डीएपी ५० किलो, अमोनिअम सल्फेट ५० किलो, पोटॅश ५० किलो, निंबोळी पेंड ४० किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो देण्यात आले.
  • ट्रॅक्टरचलित अवजाराच्या मदतीने मल्चिंग पेपर अंथरून घेतला. मल्चिंगला सव्वा फूट अंतरावर बिया लावण्यासाठी छिद्र तयार केले. 
  • लागवडीपूर्वी ८ तास पाणी देऊन गादीवाफा व्यवस्थित भिजवून घेतला. 
  • गादीवाफा चांगला भिजल्यानंतरच बियांची लागवड केली. लागवडीपूर्वी बिया रात्रभर भिजवून घेतल्या. 
  • पुढील १५ दिवसांचे नियोजन 

  • लागवडीनंतर किमान आठ दिवस पिकाला पाणी न देण्याचे नियोजन केले आहे.
  • उगवण चांगली होण्याकरिता पाण्याचा अतिवापर करण्याचे टाळणार आहे.
  • उगवणीनंतर कोवळे कोंब कीटकांद्वारे खाल्ले जातात. त्याकरिता, निम अर्काची हलकी फवारणी लागवडीनंतर १० व्या दिवशी घेतली जाते.
  • साधारणतः ४ ते ५ दिवसांनी १५ मिनिटांच्या अंतराने पिकास पाणीपुरवठा केला जाईल.
  • - मुकेश पाटील,   ७७०९२२०११९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com