agricultural news in marathi farmers crop planning for watermelon crop | Page 2 ||| Agrowon

शेतकरी नियोजन (पीक : कलिंगड)

चंद्रकांत जाधव
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

माझी गाढोदे (ता. जळगाव) येथे गिरणा, तापी नदीच्या लाभक्षेत्रात ३५ एकर जमीन आहे. केळी प्रमुख पीक असून, त्याखाली १५ एकर क्षेत्र आहे. परंतु बेवडसाठी दरवर्षी केळीखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात कलिंगडाची लागवड करतो. केळी पिकाखालील रिकाम्या क्षेत्रात कलिंगडाचे कमी खर्चात उत्पादन मिळते.​

माझी गाढोदे (ता. जळगाव) येथे गिरणा, तापी नदीच्या लाभक्षेत्रात ३५ एकर जमीन आहे. केळी प्रमुख पीक असून, त्याखाली १५ एकर क्षेत्र आहे. परंतु बेवडसाठी दरवर्षी केळीखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात कलिंगडाची लागवड करतो. केळी पिकाखालील रिकाम्या क्षेत्रात कलिंगडाचे कमी खर्चात उत्पादन मिळते.​

शेतकरीः मुकेश डोंगर पाटील
गावः गाढोदे, ता. जि. जळगाव
एकूण क्षेत्रः ३५ एकर
कलिंगडाखालील क्षेत्रः १० एकर

माझी गाढोदे (ता. जळगाव) येथे गिरणा, तापी नदीच्या लाभक्षेत्रात ३५ एकर जमीन आहे. केळी प्रमुख पीक असून, त्याखाली १५ एकर क्षेत्र आहे. परंतु बेवडसाठी दरवर्षी केळीखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात कलिंगडाची लागवड करतो. केळी पिकाखालील रिकाम्या क्षेत्रात कलिंगडाचे कमी खर्चात उत्पादन मिळते. कलिंगडाची टप्प्याटप्प्याने तीन-तीन एकरांत लागवड केली जाते. ही लागवड डिसेंबरच्या मध्यापासून सुरू केली. शेवटच्या तीन एकरांतील लागवड ४ फेब्रुवारी रोजी केलेली आहे. यामागे रमजान महिन्यात कलिंगडास चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे.

मागील झालेले कामकाज 

 • सुरुवातीला २ वेळा रोटाव्हेटर फिरवून जमीन चांगली भुसभुशीत करून घेतली.
 • लागवडीसाठी सव्वातीन फूट रुंद व सव्वा फूट उंच गादीवाफे तयार केले.
 • गादीवाफ्याच्या कडेची माती व्यवस्थित बसण्यासाठी बैलजोडीचलित नांगर सरीमध्ये फिरवला. यामुळे गादीवाफा व्यवस्थित तयार झाला. 
 • एका गादीवाफ्यावर कलिंगडाच्या एकाच ओळीचे नियोजन केले आहे.
 • गादीवाफे व्यवस्थित केल्यानंतर त्यावर ठिबक सिंचनाच्या लॅटरल टाकून घेतल्या. प्रत्येक ओळीत एक लॅटरल टाकलेली आहे. दोन ड्रीपमधील अंतर सव्वा फूट आहे.   रासायनिक खतांचा बेसल डोस गादीवाफ्यात नळीलगतच देण्यात आला. डीएपी ५० किलो, अमोनिअम सल्फेट ५० किलो, पोटॅश ५० किलो, निंबोळी पेंड ४० किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो देण्यात आले.
 • ट्रॅक्टरचलित अवजाराच्या मदतीने मल्चिंग पेपर अंथरून घेतला. मल्चिंगला सव्वा फूट अंतरावर बिया लावण्यासाठी छिद्र तयार केले. 
 • लागवडीपूर्वी ८ तास पाणी देऊन गादीवाफा व्यवस्थित भिजवून घेतला. 
 • गादीवाफा चांगला भिजल्यानंतरच बियांची लागवड केली. लागवडीपूर्वी बिया रात्रभर भिजवून घेतल्या. 

पुढील १५ दिवसांचे नियोजन 

 • लागवडीनंतर किमान आठ दिवस पिकाला पाणी न देण्याचे नियोजन केले आहे.
 • उगवण चांगली होण्याकरिता पाण्याचा अतिवापर करण्याचे टाळणार आहे.
 • उगवणीनंतर कोवळे कोंब कीटकांद्वारे खाल्ले जातात. त्याकरिता, निम अर्काची हलकी फवारणी लागवडीनंतर १० व्या दिवशी घेतली जाते.
 • साधारणतः ४ ते ५ दिवसांनी १५ मिनिटांच्या अंतराने पिकास पाणीपुरवठा केला जाईल.

- मुकेश पाटील,   ७७०९२२०११९


इतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
पानवेल लागवड पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन...
नारळ जाती आणि लागवडीबाबत माहिती नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत....
अशी करतात कणगर लागवडकणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व...
अशी करा ॲस्टर लागवड ॲस्टर लागवडीचे नियोजन करताना हंगाम, जातींची निवड...
अशी करा अडुळसा लागवडअडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर...
अशी करतात गवती चहाची लागवड गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
कोरफड लागवड स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
नेपिअर गवताची लागवडसं करित नेपिअर या चारापिकाचे यशवंत आणि फुले जयवंत...
फणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
कागदी लिंबू लागवडकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड,...
लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रणसर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...
दालचिनी, लवंग लागवडदालचिनी लागवड दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून...