सुगंधी तेल निर्मितीच्याही पुढे जात सुगंधी घटकांची निर्मिती करण्यासाठी प्रकल्प उभारला जात आहे.
सुगंधी तेल निर्मितीच्याही पुढे जात सुगंधी घटकांची निर्मिती करण्यासाठी प्रकल्प उभारला जात आहे.

सुगंधी तेलनिर्मितीतून शेतकऱ्यांना मिळाली ओळख

जिरॅनॉलचे प्रमाण अधिक असल्यामुले पाल्मरोसा (शा. नाव ः Cymbopogon martinii) आणि जमरोसा ( शा. नाव - C. nardus) या दोन्ही गवतांना मोठी मागणी आहे. विशिष्ट सुगंधी असलेल्या या तेलाला सुगंधी द्रव्ये, प्रसाधने, औषधी आणि घरगुती वापरासाठी मोठी मागणी आहे. किंचित गुलाबासारखा आल्हाददायक गंधामुळे राष्ट्रीय आणि आंतररराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रियता मिळत आहे.

जिरॅनॉलचे प्रमाण अधिक असल्यामुले पाल्मरोसा (शा. नाव ः Cymbopogon martinii) आणि जमरोसा ( शा. नाव - C. nardus) या दोन्ही गवतांना मोठी मागणी आहे. विशिष्ट सुगंधी असलेल्या या तेलाला सुगंधी द्रव्ये, प्रसाधने, औषधी आणि घरगुती वापरासाठी मोठी मागणी आहे. किंचित गुलाबासारखा आल्हाददायक गंधामुळे राष्ट्रीय आणि आंतररराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रियता मिळत आहे.  उत्तर गुजरात येथे प्रामुख्याने भात, गहू, बटाटा, कपाशी, भाजीपाला ही पारंपरिक पिके आहेत. मातीची कमी होत चाललेली सुपीकता, कमी झालेले उत्पादन आणि एकूण वाढलेल्या निविष्ठांच्या खर्चामुळे वाढलेला उत्पादन खर्च अशा अनेक कारणांमुळे पारंपरिक पिकांतून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यातच या भागामध्ये वन्य प्राणी, माकडे यांच्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असे. या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी उत्तर गुजरात येथील प्रगतिशील शेतकरी वेगळ्या पिकाच्या शोधात होते. त्या वेळी त्यांचे लक्ष जमरोसा या सुगंधी वनस्पतीकडे वेधले गेले. याला स्थानिक भाषेमध्ये जमरोशा किंवा रोशागवत असे म्हणतात. सुपीकता कमी असलेल्या जमिनीतही पाल्मरोसा, जमरोसा, लेमनग्रास अशी सुगंधी गवते अधिक चांगल्या प्रकारे वाढत असल्याने शेतकऱ्यांनी याला पसंती दिली. विशेषतः सामू ९ पेक्षा अधिक असलेल्या अल्कली जमिनीसाठी अशी पिके अधिक सहनशील आहे. सिंचनाच्या अनियमिततेच्या ताणासाठी बऱ्यापैकी सहनशीलता आहे.  या गवतांपासून तेलाचे उत्पादन मिळण्यासोबतच जमिनीची सुधारणाही होते. सुगंधी वनस्पतीमध्ये पाल्मरोसा या पिकामध्ये वन्य प्राणी, किडी आणि रोग यांच्या हल्ल्यापासून तुलनेने कमी नुकसान होते. आर्थिक गुंतवणूक आणि परताव्याचा विचार करता पाल्मरोसा आणि जमरोसा या दोन्ही गवतांच्या एकत्रित उत्पादनाचे प्रारूप बसविण्याचा प्रयत्न येथील शेतकऱ्यांनी केला. त्यांनी लागवडीचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या मोठ्या शेतामध्ये (१५ हेक्टरपेक्षा अधिक) पाल्मरोसा किंवा जमरोसा या पिकांची चार प्रात्यक्षिके घेण्यात आली. मेहसाना (गुजरात) प्रांत सामान्यतः भात, गहू, बटाटा आणि कपाशी पिकासाठी ओळखला जातो. आता येथील वाहेलाल गाव सुगंधी वनस्पतीच्या लागवडीसाठी ओळखले जाऊ लागले आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या औषधी आणि सुगंधी पिके संशोधन संचालनालय, आनंद यांच्या सहकार्याने बोरीअवी येथील शेतकरी घनश्यामभाई पटेल यांनी २०१६-१७ मध्ये पाल्मरोसाची लागवड सुरू केली. त्यानंतर २०१७-१८ मध्ये जमरोसा लागवडही केली. परिसरातील शेतकऱ्यांनी अशा लागवडीमध्ये उत्सुकता दाखवली. त्यांच्या वाहेलाल येथील एक दिवसाच्या प्रशिक्षणाचा खर्चही कालिकत, केरळ येथील  सुपारी आणि मसाले संशोधन संचालनालयाने उचलला. पुढे या गवतांपासून तेल काढण्याची बाष्प डिस्टिलेशनसाठी आवश्यक यंत्रणाही त्यांच्या शेतामध्ये उभारण्यात आली. आवश्यक तेलाची निर्मिती सुरू झाली. या तेलापासून सुगंधी घटक वेगळे करण्याची म्हणजेच जिरॅनिओल किंवा जिरॅनिल अॅसिटेट काढण्याची यंत्रणा सध्या त्यांच्या शेतामध्येच उभारली जात आहे.  उत्पन्न आणि फायदे

  • प्रत्येक शेतकऱ्याला पाल्मरोसा लागवडीतून सरासरी १.५ लाख रुपये प्रति हेक्टर प्रति वर्ष निव्वळ उत्पन्न मिळत आहे. तर जमरोसा लागवडीतून सरासरी १.५९ लाख रुपये प्रति हेक्टर प्रति वर्ष  इतके निव्वळ उत्पन्न मिळत आहे. 
  • आता चार वर्षांच्या लागवडीनंतर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. 
  • शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सुधारणाही झाली आहे. 
  • शेतकऱ्यांच्या निविष्ठा, सिंचनाचे पाणी आणि मजुरांची आवश्यकता यामध्ये ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. 
  • हे पीक साठवणीसाठीही सोपे आहे.
  • वन्य प्राण्यांचाही त्रास होत नाही. 
  • तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेले अवशेषही पशुखाद्य किंवा इंधन म्हणून वापरता येतात.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com