कल्पनेतून केली अडचणींवर मात

हायड्रॉलिक नळ्यांसाठी स्प्रिंगचा वापर  व फ्यूज काढण्यासाठी बनविली यंत्रणा
हायड्रॉलिक नळ्यांसाठी स्प्रिंगचा वापर व फ्यूज काढण्यासाठी बनविली यंत्रणा

जगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक अडचणींना तोंड देत असतात. मात्र स्वकल्पनेतून समस्यांवर मात करण्यात ते यशस्वी ठरतात. अमेरिकेतील काही शेतकऱ्यांनी केलेले हे प्रयोग निश्चितपणे मार्गदर्शक ठरणारे आहेत. हायड्रॉलिक नळ्यांसाठी स्प्रिंगचा वापर   अमेरिकेतील आयोवा राज्यातील उडूबॉन येथील शेतकरी जेम्स नेल्सन हे कायम शेतीकामात व्यस्त असतात. त्यांच्याकडे असलेल्या ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिक प्रणालीतील रबरी नळ्या खूप लांब आहेत. जास्त लांबीमुळे शेतात कामेे करताना तसेच खड्ड्यातून गेल्याने किंवा इतर कारणांनी ट्रॅक्टरला धक्का बसल्यास या नळ्या तुटतात. यावर त्यांनी उपाय शोधला. मोडकळीस आलेल्या जीपच्या कॉइल स्प्रिंग त्यांनी रबरी नळीमध्ये बसविली. असे केल्याने रबरी नळी स्प्रिंगमुळे ताणली गेली. ट्रॅक्टर ज्याप्रमाणे फिरेल त्याप्रमाणे कोणत्याही दिशेने स्प्रिंग हालू शकत असल्याने रबरी नळीही हलते. परिणामी, ट्रॅक्टरला बसणाऱ्या विविध धक्क्यांनंतरही रबरी नळी तुटत नाही.

लाकडी ओंडके वाहतुकीसाठी मजबूत साधन अमेरिकेतील कन्सास राज्यातील सेेंट मॅरीज येथील शेतकरी रिचर्ड पीटर्स यांना शेतात विविध ठिकाणी तसेच शेततळ्यामध्ये पडणाऱ्या झाडांचे ओंडके उचलण्याची समस्या भेडसावत होती. असे लाकडी ओंडके वाहून नेण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे हूक उपलब्ध आहेत. मात्र ते पुरेसे मजबूत नसल्याने त्यांचा उपयोग हाेत नव्हता. अखेर त्यांनी जुन्या ट्रकच्या स्प्रिंगमधून तोडली. एका मजबूत लोखंडी बारला ती वेल्डिंग करून जोडली. अशाप्रकारे तयार केलेल्या साधनाच्या साह्याने त्यांचे काम सोपे झाले. त्यासाठी काही वेल्डिंग रॉड आणि लोखंड कापणाऱ्या पट्टी यांच्यासाठी थोडा खर्च त्यांना करावा लागला. मात्र मोठमोठे लाकडी ओंडके ओढण्यासाठी मजबूत साधनाची निर्मिती करता आली.

फ्यूज काढण्यासाठी बनविली यंत्रणा ट्रॅक्टर तसेच मोठ्या वाहनांमध्ये विविध विद्युत यंत्रणा कार्यरत असतात. त्यांच्या संरक्षणासाठी काचेचे फ्यूज बसविलेले असते. बऱ्याचदा विविध कारणांनी या फ्यूजमध्ये बिघाड होतो. दुरुस्तीसाठी किंवा बदलण्यासाठी फ्यूज बाहेर काढावे लागतात. मात्र फ्यूज बाहेर काढताना बऱ्याचवेळा फुटतो. अमेरिकेतील दक्षिण डिकोटा राज्यातील सायमन ग्लॅंझर या शेतकऱ्यालाही फ्यूज तुटण्यामुळे आर्थिक नुकसान होत होते. मात्र त्यांनी त्यावर उपाय शोधला. त्यांनी टोकदार पक्कड घेतली. तिच्या तोंडाचा काही भाग वेल्डिंग करून कापला; त्याला ड्रील मशिनने फ्यूजच्या आकाराचे छिद्र पाडले. त्यामुळे त्यांना दुरुस्तीसाठी फ्यूज बोर्डमधून बाहेर काढणे सोपे जाऊ लागले. बोर्डला कसलाही धक्का न बसता फ्यूज काढणे आणि परत बसविणे सहज शक्य झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com