नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
फूल शेती
फुलशेती सल्ला
गुलाब :
गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची मात्रा द्यावी. तसेच हेक्टरी ८० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. उमललेल्या फुलांची काढणी करावी. काढणी करताना रोगट व किडक्या फांद्या छाटाव्यात. सद्यःस्थितीत पानावरील काळे ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी प्रोपिकोनॅझॉल १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकावर पाने खाणारी व कळी पोखरणारी अळी आढळून आल्यास क्विनॉलफॉस २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

शेवंती :
शेवंती पिकास लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांनी द्यावयाची रासायनिक खतांची मात्रा हेक्टरी १५० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश या प्रमाणात द्यावी. पावसाळी हंगामात पिकास अतिरिक्त पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. सद्यःस्थितीत पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
झेंडू :
झेंडूच्या रोपांची लागवड करावी. लागवड करून एक ते दीड महिना झाला असल्यास पिकाला हेक्टरी ७५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. आफ्रिकन झेंडू असेल तर शेंडा खुडावा. रोपांना मातीची भर द्यावी. पावसाळी वातावरणात पिकावर करपा रोग व पाने खाणारी तसेच कळी पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. करपा रोग नियंत्रणासाठी प्रोपिकोनॅझोल १ मि.लि. प्रतिलिटर तर अळीसाठी क्विनॉलफॉस २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
निशिगंध :
निशिगंधाच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाचे पाणी साठल्यास पिकाला खोडकूज या रोगाची लागण होण्याची शक्यता असते. रोगाच्या नियंत्रणासाठी कॅप्टन ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात मिसळून रोगग्रस्त झाडास आळवणी करावी. तसेच या मिश्रणाची पिकावर फवारणीही करावी. पिकाला लागवडीनंतर ३०, ६० व ९० दिवसांनी द्यावयाची ५० किलो नत्र प्रतिहेक्टरी अशी खतमात्रा द्यावी. खतमात्रा देताना ती पिकाच्या पानांवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
संपर्क : डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९
(अखिल भारतीय समन्वयित पुष्प सुधार प्रकल्प,
गणेशखिंड, पुणे.)
फोटो गॅलरी
- 1 of 3
- ››