agricultural news in marathi Fodder sorghum cultivation technique | Agrowon

चारा ज्वारीचे लागवड तंत्र

प्रीतम भुतडा, डॉ. एल. एन. जावळ
शुक्रवार, 11 जून 2021

धान्यासाठी घेतल्या जाणाऱ्या संकरित व सुधारित वाणाची गुणवत्ता व उत्पादन तुलनेने कमी असते. त्यामुळे चाऱ्यासाठी खास विकसित केलेल्या ज्वारीच्या ‘सीएसव्ही ४० एफ’ या वाणाच्या हिरव्या व वाळलेल्या कडब्याची गुणवत्ता व सकसपणा अधिक असतो.
 

धान्यासाठी घेतल्या जाणाऱ्या संकरित व सुधारित वाणाची गुणवत्ता व उत्पादन तुलनेने कमी असते. त्यामुळे चाऱ्यासाठी खास विकसित केलेल्या ज्वारीच्या ‘सीएसव्ही ४० एफ’ या वाणाच्या हिरव्या व वाळलेल्या कडब्याची गुणवत्ता व सकसपणा अधिक असतो.

दुग्ध व्यवसायात एकूण खर्चापैकी ७० ते ७५ टक्के खर्च चारा व पशुखाद्यावर होतो. पशू आहारात ७० टक्के भाग हिरव्या व सुक्या चाऱ्याचा असतो. खरीप हंगामात चाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी मुख्यत्वे मका, ज्वारी, बाजरी व काही प्रमाणात संकरित चारा पिके उदा. नेपियर ग्रास, मारवेल इ. पिकांची लागवड केली जाते. सामान्यतः धान्यासाठी घेतल्या जाणाऱ्या संकरित व सुधारित वाणाची गुणवत्ता व उत्पादन तुलनेने कमी असते. त्यामुळे चाऱ्यासाठी खास विकसित केलेल्या ज्वारीच्या ‘सीएसव्ही ४० एफ’ या वाणाच्या हिरव्या व वाळलेल्या कडब्याची गुणवत्ता व सकसपणा अधिक असतो.

‘सीएसव्ही ४० एफ’ या वाणाची प्रमुख वैशिष्ट्ये
बऱ्याच दूध उत्पादकांची आवश्यकता ही निव्वळ चारा पिकाची असते. त्यांची निकड लक्षात घेऊन परभणी येथील ज्वारी संशोधन केंद्राने ‘सीएसव्ही ४० एफ’ हा ज्वारी पिकाचा चारा वाण विकसित केला आहे.

उत्पादन क्षमता

  • हिरवा चारा हेक्टरी ४५ ते ४६ टन.
  • वाळलेला चारा हेक्टरी १४ ते १५ टन

कडब्याची उत्तम प्रत
पाचनक्षमता ५४.४८ टक्के प्रथिने, ७.७ टक्के उंच वाढणारा (सरासरी उंची २४० ते २५० सेंमी) हिरवीगार, लांब रुंद पाने, मध्यम गोड रसाळ धांडा, खोडमाशी, खोडकिडा तसेच पानावरील ठिपके यांस मध्यम सहनशील.

सुधारित लागवड तंत्रज्ञान
जमीन

चारा ज्वारीच्या लागवडीसाठी मध्यम ते खोल उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करून, पाण्याचा निचरा होण्यासाठी दांड पाडून घ्यावेत.

बियाणाचे प्रमाण
चारा ज्वारीच्या पेरणीकरिता हेक्टरी ३५ ते ४० किलो बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया

  • पेरणीपूर्वी बियाण्यास ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅम, स्फुरद विरघळविणारे जिवाणू २० ग्रॅम, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात हलके चोळून घ्यावे.
  • खोडमाशीचा प्रादुर्भाव अधिक होत असल्यास, बियाणांस थायामिथोक्झॉम ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे चोळावे.

पेरणीचा कालावधी
खरीप ज्वारीप्रमाणेच चारा ज्वारीची लागवड जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान करावी. पेरणी उशिरा झाल्यास खोड माशीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे संशोधनात आढळले आहे.

पेरणीचे अंतर
या वाणाची पेरणी करताना दोन तासातील अंतर २५ सेंमी व दोन ताटातील अंतर १० सेंमी इतके राहील, अशा पद्धतीने तिफणीच्या साह्याने पेरणी करावी. दोन तासांतील व दोन ताटांतील अंतर कमी ठेवल्यास ज्वारीचे धांड बारीक पडतात. परिणामी जनावरांना खाण्यास व पचनास फायदेशीर ठरते.

खत व्यवस्थापन
हे पीक नत्र व स्फुरद यांना सकारात्मक प्रतिसाद देणारे आहे. वाणास वाढीच्या योग्य अवस्थेत व योग्य प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खतांचा वापर केल्यास हिरवा आणि वाळलेल्या चाऱ्याच्या उत्पादनात भरघोस वाढ होते. प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश यांचा पुरवठा करावा. पैकी पेरणी करताना नत्राची अर्धी मात्रा (५० किलो/हे), स्फुरद व पालाश यांची संपूर्ण मात्रा द्यावी. उरलेली अर्धी नत्र मात्रा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर सुमारे ३० ते ४० दिवसांनी द्यावी.

आंतरमशागत
चारा ज्वारीची लागवड धान्य ज्वारीच्या तुलनेत फार दाट केली जाते. दोन ताटातील व दोन धांडातील अंतर इतर ज्वारीच्या तुलनेत कमी असते. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत आंतरमशागत करणे शक्य होत नाही. अशा वेळी तणे नियंत्रणात ठेवण्यासाठी ॲट्राझीन या उगवणीपूर्व तणनाशक १ किलो प्रति ७५० ते १००० लिटर पाणी या प्रमाणे १ हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी.

- प्रीतम भुतडा, ९४२१८२२०६६
डॉ. एल. एन. जावळ, ७५८८०८२१५७
(ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर अॅग्रोगाईड
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
नियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे...हस्त बहराची फुले ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आणि...
चारा ज्वारीचे लागवड तंत्रधान्यासाठी घेतल्या जाणाऱ्या संकरित व सुधारित...
डाळिंब बागेतील मृग बहराचे नियोजनमृग बहराची अवस्था  पीक नियमन, फुलधारणा आणि...
संत्रा बागेच्या पुनरुज्जीवनाचे तंत्रसंत्रा बागेमध्ये जमिनीचा पोत आणि झाडाच्या...
फळबागांमध्ये कंदपिकांचे आंतरपीकफळपिकामध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य निवड...
कपाशी सल्ला कोरडवाहू कापसाची पेरणी १५-३० जून किंवा मॉन्सूनचा...
वनशेतीमध्ये स्टायलो, अंजनाचे आंतरपीकस्टायलो गवत द्विदलवर्गीय असून बहुवार्षिक आहे.ज्या...
सघन पद्धतीने हापूस आंबा लागवडहापूस आंब्याची ५ × ५ मीटर अंतरावर सघन लागवड करता...
कापूस पिकातील तण व्यवस्थापनशेतात वाढणाऱ्या निरनिराळ्या तणांमुळे अन्नद्रव्ये...
आंबा,काजू नारळ बागायतीचे व्यवस्थापनजुन्या आंबा कलमांचे शाखीय व्यवस्थापन व...
वादळी वारे, पाऊस स्थितीतील बागेचे...तौत्के या चक्रीवादळाच्या परिणामामुळे सर्वत्र...
तंत्र औषधी वनस्पती लागवडीचे...शेतीसोबत संलग्न व्यवसाय म्हणून वनौषधी वनस्पतींची...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
उत्तम सूक्ष्म घडनिर्मितीसाठी उपाययोजनाद्राक्ष विभागात सटाणा, (जि. नाशिक), बोरी, इंदापूर...
उन्हाळ्यातील अंबिया बहारातील फळगळ...आळ्याने पाणी देण्याची पद्धत वापरात असलेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
फलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...
डाळिंबातील कीड- रोग नियंत्रणबहर व्यवस्थापन छाटणी मे महिन्यामध्ये केली असल्यास...
डाळिंब सल्लाहस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग...