अन्न सुरक्षेसाठी गव्हाचे पोषणयुक्त वाण

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या संशोधन केंद्राने महाराष्ट्रासाठी गव्हाच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या बायो-फोर्टिफाइड जातींची निर्मिती केली आहे. या जातींमध्ये अन्नघटकांचे चांगले प्रमाण आहे.
Wheat variety: H. I. 8777
Wheat variety: H. I. 8777

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या संशोधन केंद्राने महाराष्ट्रासाठी गव्हाच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या बायो-फोर्टिफाइड जातींची निर्मिती केली आहे. या जातींमध्ये अन्नघटकांचे चांगले प्रमाण आहे. उच्च उत्पादन देणाऱ्या जातींच्या विकासा दरम्यान त्यामधील पौष्टिक गुणवत्ता (प्रथिने, लोह, आणि जस्त) वाढीकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. बहुतेक उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती पौष्टिक गुणवत्तेत कमकुवत आहेत किंवा त्यांची पौष्टिक स्थिती आवश्यक स्तरापेक्षा कमी आहे. संतुलित पोषण आहाराच्या सेवनामुळे कुपोषण ही एक मोठी आरोग्य समस्या बनली आहे. कुपोषण दूर करण्यासाठी गव्हाच्या बायो-फोर्टिफाइड जाती तयार करणे हा सर्वात महत्त्वाचा आणि कमीत कमी खर्चिक मार्ग आहे. इंदूर येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या संशोधन केंद्राने महाराष्ट्रासाठी गव्हाच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या बायो-फोर्टिफाइड जातींची निर्मिती केली आहे. बायो-फोर्टिफाइड जातींची वैशिष्टे  एच. आय. १६३३ (पुसा वाणी)

  •  बागायती जमिनीमध्ये उशिरा पेरणीसाठी (५ ते १५ डिसेंबर) विकसित.
  • कमी कालावधी (१०० दिवसात)
  • कमी उंची (७८ सें. मी.) असल्यामुळे पीक पडत नाही.
  • सरासरी उत्पादन: ४१.७ क्विंटल प्रति / हेक्टर
  • आनुवंशिक उत्पादन क्षमता : ६५.८ क्विंटल प्रति / हेक्टर
  • एचडी २९३२, राज ४०८३ आणि एचडी ३०९० पेक्षा अधिक उत्पादन
  • अधिक प्रमाणात प्रथिने (१२.४ %), लोह (४१.६ पीपीएम), आणि जस्त (४१.१ पीपीएम), चपाती बनवण्यासाठी उपयुक्त.
  • एच. आय. १६०५

  • जिरायती जमिनीमध्ये वेळेवर पेरणीसाठी (२५ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर) उपयुक्त, ११० दिवसात तयार होते.
  •  एका पाण्यामध्ये, एन आइ ५४३९ आणि एन आइ ए डब्लू १४१५ पेक्षा जास्त उत्पादन.
  • कमी उंची (८५ सें. मी.) असल्यामुळे पीक पडत नाही
  • काळा आणि तपकिरी तांबेरा रोगास प्रतिकारक
  • सरासरी उत्पादन: २९.१ क्विंटल प्रति / हेक्टर
  • आनुवंशिक उत्पादन क्षमता : ४४ क्विंटल प्रति / हेक्टर
  • अधिक प्रमाणात प्रथिने (१३ %), आणि लोह (४३ पीपीएम),
  • ब्रेड आणि चपाती बनवण्यासाठी उपयुक्त
  • एच. आय. ८७७७ (बन्सी गहू)

  • जिरायती जमिनीमध्ये वेळेवर पेरणीसाठी (२५ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर) उपयुक्त, १०८ दिवसात तयार होते.
  • यु ए एस ४४६, एम ए सी एस ४०२८ पेक्षा अधिक आनुवंशिक उत्पादन क्षमता.
  • सरासरी उत्पादन: १८.५ क्विंटल प्रति / हेक्टर
  • आनुवंशिक उत्पादन क्षमता : २८.८ क्विंटल प्रति / हेक्टर
  • अधिक प्रमाणात प्रथिने (१३ %), इतर जातींपेक्षासर्वात जास्त प्रमाणात लोह (४८.७ पीपीएम), जस्त (४३.६ पीपीएम).
  • पिवळ्या रंगद्रव्याचे योग्य प्रमाण, पास्ता बनवण्यासाठी उपयुक्त.
  • - डॉ. किरण गायकवाड, ९९५३२५८२३४ (भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com