agricultural news in marathi Forestry planning for sustainable income | Agrowon

शाश्‍वत उत्पन्नासाठी वनशेतीचे नियोजन

संग्राम चव्हाण, विजयसिंह काकडे
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

वनशेतीपासून अन्नधान्याबरोबरच वृक्षापासून चारा, लाकूड, फळे व लघू-वन उपज मिळते. याचबरोबरीने शाश्‍वत उत्पन्नाची हमी मिळते. वनशेतीमुळे जमिनीची धूप थांबते, सुपीकता वाढते, आर्द्रता टिकते, वादळी वाऱ्यांपासून संरक्षण मिळते. 

वनशेतीपासून अन्नधान्याबरोबरच वृक्षापासून चारा, लाकूड, फळे व लघू-वन उपज मिळते. याचबरोबरीने शाश्‍वत उत्पन्नाची हमी मिळते. वनशेतीमुळे जमिनीची धूप थांबते, सुपीकता वाढते, आर्द्रता टिकते, वादळी वाऱ्यांपासून संरक्षण मिळते. 

बांधावरील लागवड पद्धतीमध्ये बहूउपयोगी वृक्ष व फळ वृक्ष शेताच्या बांधावरती किंवा नाल्याच्या बाजूने ५ ते १० फूट दूर वृक्षांची एका ओळीत/ जोड ओळीत किंवा झिग-झॅग प्रकारे लागवड केली जाते. यामुळे परिघीय क्षेत्राचा व बांधाचा जास्तीत जास्त उपयोग होऊन अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतात. 

या वृक्षांमुळे जमिनीची धूप, बांधबंदिस्ती, वाऱ्यापासून संरक्षण व सावली मिळून आंतरपिकांचे उत्पन्न वाढते. बांधावरील लागवडीसाठी साग, सुरू, हादगा, सुबाभूळ, शेवरी, निंबारा, नारळ, आंबा, शेवगा व बोर उपयुक्त 
ठरतात.    

पडीक, नापीक जमिनीसाठी वनशेती योजना
उत्क्रांतीपासून अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसाठी मानवी जीवन हे वृक्षांवरती अवलंबून आहे. केंद्र आणि राज्य सरकार वृक्षांचे क्षेत्र वाढविण्यासाठी ७० च्या दशकापासून सामाजिक वनीकरण अंतर्गत वृक्ष लागवडीस चालना देण्याचे काम निरंतर चालू आहे. वनशेतीमध्ये आमूलाग्र बदल हा राष्ट्रीय कृषिवानिकी नीती २०१४ च्या अंतर्गत वनशेती उपभियानास सुरुवात झाली.

राष्ट्रीय कृषिवानिकी नीतीचे मुख्य उद्देश

 • वनशेतीमध्ये विविध वृक्षांची लागवड करून देशाचे एक तृतीयांश क्षेत्रावरती वृक्ष आच्छादन वाढवण्याबरोबरच वातावरणातील कार्बनचे स्थिरीकरण करणे, जमिनीतीतील पोषक द्रव्यांचे प्रमाण वाढविणे, वैविध्यपूर्ण प्रणालीचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे.
 • एकात्मिक पद्धतीने पिकांची आणि पशुधनाची उत्पादकता, रोजगाराच्या संधी निर्माण करणे 

वनशेतीच्या योजना 
वनशेतीचा विस्तार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये  पाणलोट विकास योजना, जलयुक्तशिवार, राष्ट्रीय फळबाग योजनेअंतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत बांबू लागवड योजना, राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर/पडीक जमिनीवरती वृक्ष व फळ लागवड आणि राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियान (NMSA) अंतर्गत वनशेती उपअभियान इ. आहेत. 

राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियान अंतर्गत वनशेती उपअभियान  

 • अभियानाचा मुख्य उद्देश असा आहे, की एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ३३ टक्के क्षेत्र वृक्ष आच्छादनाखाली आणणे. एकमेकांना पूरक व एकात्मिक पद्धतीने पिकांची व पशुधनाची उत्पादकता वनशेतीने वाढविणे.
 • विविध प्रकारच्या पडीक व नापीक जमिनी लागवडीखाली आणणे, आणि वनशेतीच्या माध्यमातून रोजगाराच्या व शाश्‍वत उत्पन्नाच्या संधी वाढविणे. 
 • वनशेती अभियानाच्या अंबलबजावणीसाठी नोडल विभाग म्हणून कृषी विभाग काम करत आहे. राज्य वन विभाग योजनेच्या नियोजनामध्ये मदत करतो. या अभियानासाठी ६०:४० या प्रमाणे केंद्र : राज्य असे अर्थसाह्याचे स्वरूप असून, सदर अनुदान हे ४०:२०:२०:२० या प्रमाणात एकूण चार वर्षांत देण्यात येते. 
 • या अभियानामध्ये शेतकऱ्यांसाठी दर्जेदार लागवड सामग्रीसाठी रोपवाटिकेचा विकास करणे, परिघीय क्षेत्र व बांधवरील लागवड, कमी घनतेची लागवड आणि जास्त घनतेची लागवड या घटकांचा समावेश आहे. 

दर्जेदार लागवड सामग्रीसाठी रोपवाटिकेचा विकास  

 • राज्य सरकार याच्यासाठी शासकीय संस्था, खासगी संस्था, वैयक्तिक व्यक्ती यांना गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत देते. यामध्ये लहान रोपवाटिका (०.५ हेक्टर), मोठी रोपवाटिका (१ हेक्टर) आणि उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकासाठी (१ हेक्टर) अनुक्रमे सुमारे १० लाख, १६ लाख आणि ४० लाख रुपयांची मदत केली जाते. 
 • राष्ट्रीय बांबू अभियान अंतर्गत मंजूर मापदंडानुसार अनुदान दिले जाईल. तसेच काही क्षेत्रातील लहान रोपवाटिकेला २५,०००, मोठ्या रोपवाटिकेला ५०,००० आणि उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकेला १,००,००० रोपे उत्पादित करणे आवश्यक आहे.
 • खासगी रोपवाटिकेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा. गुणवत्ता व दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही वनविभागाच्या अधिकाऱ्यांची राहील.

परिघीय क्षेत्र व बांधावरील लागवड 

 • शेतकरी आपल्या शेताच्या परिघीय क्षेत्राचा व बांधाचा उपयोग वृक्ष लागवडीसाठी करू शकतो. यामध्ये उंच आणि सरळ वाढणाऱ्या वृक्षांची लागवड करून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतो. तसेच जोरात वाहणाऱ्या वाऱ्यां‍पासून आणि जमिनीची धूप कमी करण्यास मदत होते.
 • बांधावरती वृक्ष लागवडीसाठी या घटकांतर्गत जास्तीत जास्त ३५ रुपये प्रति झाड असे अनुदान लाभ करत्यास मिळते.

​वनशेतीसाठी उपयुक्त वनवृक्ष, पिके, धान्य पिके आणि चारापिके  
 

पर्जन्यमान     वनवृक्ष     फळपिके     पिके     चारापिके
भरपूर पावसाचा प्रदेश (१२०० मि.मी. पेक्षा जास्त) साग, बांबू (माणगा, मानवेल, चिवारी, भीमा, कटांग), मोह, खैर, शेवगा, ऐन, किंजळ, बिब्बा, शिवण, हिरडा, बेहडा आंबा, फणस, चिकू, काजू, कोकम, जांभूळ, नारळ, सुपारी, केळी खरीप : भात, नाचणी, भुईमूग  चवळी, नेपियर, बाजरी, स्टायलो.
मध्यम पाऊसमान (७५०-१२०० मि.मी.) साग, शिवण, सुबाभूळ, कडुलिंब, निंबारा, करंज, बाभूळ, हादगा, शेवरी, तुती, शेवगा, अंजन, बांबू (माणगा, मानवेल), हिरडा, बेहडा, बिब्बा.  आंबा, डाळिंब, संत्रा, फणस, मोसंबी, चिकू, लिंबू, पेरू, पपई, सीताफळ  खरीप ः सोयाबीन, मका, भुईमूग, 
रब्बी : गहू, मका, ज्वारी
बारमाही : आले, हळद, शतावरी.
नेपियर,बाजरी, मेथी घास, लसूण घास, चवळी.
कमी पावसाचा प्रदेश  (७५० मि.मी. पेक्षा कमी)  कडुलिंब, बाभूळ, शेवगा, सुबाभूळ, बांबू (मानवेल), साग, निलगिरी.  आवळा, सीताफळ, बेल, बोर, अंजीर, लिंबूवर्गीय पिके, चिंच  खरीप : सोयाबीन, मटकी, तूर मका, बाजरी.  रब्बी : ज्वारी, हरभरा, करडई अंजन घास, धामण गवत, पांढरी कुसळ, गांधील गवत.
पाणथळ जमिनी सुरू, निलगिरी, अर्जुन, विलायती बाभूळ, उंबर, बांबू (कटांग, टुल्डा) जांभूळ, नारळ, पेरू भात, मका    नेपियर,बाजरी संकरित, पॅरा गवत, मेथी घास.
क्षारयुक्त जमीन  निलगिरी, सुरू, करंज, सिसम, बाभूळ, खैर,  प्रोसोपीस, हादगा आवळा, बेल, चिंच, करवंद, बोर,आंबा, काजू कापूस, मूग, हरभरा, ज्वारी, बाजरी    बरसीम, कर्नाल गवत, ऱ्होडस गवत, वाळा गवत, अंजन गवत  
आम्लयुक्त जमीन  साग, शिवण, तिसळ, शिरस, ग्लिरिसिडीया  खिरणी, आंबा, ड्रॅगन फ्रूट, लिंबू तूर, वाटाणा, मका, भुईमूग नेपियर,बाजरी, मेथी घास, दीनानाथ गवत.

- संग्राम चव्हाण,  ९८८९०३८८८७ 
(राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)


इतर ताज्या घडामोडी
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...
राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने...नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज...
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या...औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...