agricultural news in marathi Foxtail millet health benefits | Agrowon

बहुगुणी राळा

जया जामदार, ज्ञानेश्‍वर शिंदे
सोमवार, 19 एप्रिल 2021

राळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या बियांच्या आकाराचे असते. राळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. हे सर्व गुणधर्म बघता राळ्याचा नियमित वापर आहारामध्ये होणे गरजेचे आहे.

राळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या बियांच्या आकाराचे असते. राळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. हे सर्व गुणधर्म बघता राळ्याचा नियमित वापर आहारामध्ये होणे गरजेचे आहे.

राळ्याला इंग्रजीमध्ये फॉक्सटेल मिलेट किंवा इटालियन मिलेट आणि हिंदीमध्ये कांगणी किंवा ककूम असे संबोधले जाते. राळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या बियांच्या आकाराचे असते. राळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. हे सर्व गुणधर्म बघता राळ्याचा नियमित वापर आहारामध्ये होणे गरजेचे आहे.

पोषकत्त्वांचे प्रमाण (प्रति १०० ग्रॅमनुसार)
पोषणतत्त्वे---प्रमाण
कर्बोदके---६० ग्रॅम
प्रथिने---१२.३ ग्रॅम
तंतूमय पदार्थ---१४ ग्रॅम
कॅल्शिअम----३१ग्रॅम
लोह---२.८ ग्रॅम
फॉस्फरस---२९० मिलिग्रॅम
मॅग्नेशिअम---८१ मिलिग्रॅम
थायमीन---०.५९ मिलिग्रॅम
तांबे---१.४० मिलिग्रॅम

आरोग्यदायी गुणधर्म 

 • राळ्याचा ग्लायसेनिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यासाठी त्याचा आहारात नियमित वापर होणे आवश्यक आहे.
 •  मधुमेह आणि पोटाच्या आजारांवर राळा हे पौष्टिक अन्न म्हणून वापरता येते.
 • राळा दाण्याचा ७९ टक्के भाग हा पाचक असतो. उर्वरित भागामध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असून ते पोट साफ होण्यास मदत करतात. त्यामुळे त्याचा उपयोग पाचक पदार्थांमध्ये जास्त होतो.
 • यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळे बद्धकोष्ट, कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त आहे.
 • राळा हे ग्लुटेन विरहित असल्याने ते पचायला हलके असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवते.
 • राळ्यामधे अँटीऑक्सिडन्ट गुणधर्म जास्त असल्याने रोगप्रतिकारशक्ती  वाढवण्यास मदत होते.
 • अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यावरच्या उपचार पद्धतीमध्ये  राळ्याचा प्रामुख्याने वापर केला जातो.
 • राळ्यामधे कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. हाडांची  ठेवण, मजबूतपणा राखण्यास राळा उपयोगी आहे.
 • मोड आलेले राळा खाल्यास हाडांचा ठिसूळपणा तसेच फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण कमी होते.
 • यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ते मेंदूला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवते. तसेच मेंदूची वाढ व कार्यक्षमता सुरळीत ठेवते.

राळ्याचे मूल्यवर्धन 
दळणे 

तांदळाप्रमाणे राळ्याचे बाह्य आवरण काढून ते पॉलिश केले जाते. असे पॉलिश केलेले अख्खे किंवा पिठाच्या स्वरूपात राळा उपलब्ध  असते.

भाजून किंवा शिजवून 

 • राळ्याचे दाणे भाजून, बारीक करून गव्हाच्या  पिठासोबत वापरून मूल्यवर्धित पदार्थ बनविता येतात. जसे बिस्कीट, कुकीज, रोटी, केक, थालीपीठ इत्यादी पदार्थ बनविले जातात.
 • जाडसर बारीक केलेल्या राळ्याचा उपमा बनवता येतो. तसेच इडली मिक्स, अप्पे मिक्स मध्ये याचा वापर केला जातो.
 • मकर संक्रातीला भोगीला राळ्याचा भात खाल्ला जातो.

आंबवून 
राळ्याचे पीठ तांदूळ आणि  आणि उडीद डाळीबरोबर आंबवून इडली, डोसा, उत्ताप्पा असे चविष्ट पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ पचायला हलके तसेच मूल्यवर्धक असतात. 

राळ्याचा पुलिओगरे भात 
साहित्य 

राळे, पुलिओगरे तयार मसाला, मीठ चवीनुसार, तेल, सजावटीसाठी कोथिंबीर

कृती
नेहमीच्या भाताप्रमाणे राळे मीठ घालून शिजवून घ्यावे. कढईत तेल गरम करून घ्यावे. गरम तेलामध्ये मसाला घालून चांगले परतून घ्यावे. तयार राळ्याचा भात घालून व्यवस्थित परतावे.

- जया जमादार, ९०४९७६१३९३
ज्ञानेश्‍वर शिंदे, ७५८८१७९५८०
(दादासाहेब मोकाशी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, मोकाशी जि. सातारा)


इतर कृषी प्रक्रिया
दर्जेदार पनीरनिर्मितीचे तंत्रउत्तम दर्जाचे पनीर बनविण्याकरिता म्हशीचे दूध...
पास्ता, शेवया, कुरडयासाठी गव्हाचे नवे...नाशिक : राज्यात रब्बी हंगामात गहू हे प्रमुख पीक...
आलेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीआले ही कंदवर्गीय वनस्पती असून बहुऔषधी म्हणून...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
अ‍ॅक्रिलामाइड कमी करण्यासाठी...विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
लिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थलिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे,...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटसद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध...
आवळ्यापासून लोणचे, सुपारी, मुरंबाआवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना...
कोकोओपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकोओचे अनेक प्रकार असून, प्रत्येक प्रकारातील...
पेरूपासून जेली, जॅम, सरबतपेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून...
आरोग्यवर्धक योगर्टयोगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक,...
पेरूचे आरोग्यदायी गुणधर्मपेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही....
आहारात असावेत ग्लुटेन मुक्त पदार्थग्लुटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
तुतीपासून प्रक्रियायुक्त पदार्थतुती फळांचा  पांढरा, काळा आणि लाल रंग असतो....
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
अन्न प्रक्रियेसाठी कंपित विद्युत...पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये...
आहारामध्ये असावा तंतुमय पदार्थांचा...बदलती जीवनशैली आणि नेहमी जंक फूड खाण्यामुळे...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...