agricultural news in marathi, fruit crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

लिंबूवर्गीय फळपिकात पाणीव्यवस्थापन महत्त्वाचे
डाॅ. एम. एस. लदानिया, दिनकर नाथ गर्ग
मंगळवार, 1 मे 2018

मे महिन्यामध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. त्यापार्श्‍वभूमीवर पीकनिहाय सिंचन व्यवस्थापन समजून घ्यावे. आंबिया बहराची फळे झाडावर टिकून राहण्यासाठी बागेला पाणी देणे सुरू ठेवावे. पाण्याच्या पाळ्या ४ ते ५ दिवसांच्या अंतराने द्याव्यात. शक्यतो ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे पाण्याची बचत होऊन बागेला काटेकोरपणे पाणी देणे शक्य होते.

 

मे महिन्यामध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. त्यापार्श्‍वभूमीवर पीकनिहाय सिंचन व्यवस्थापन समजून घ्यावे. आंबिया बहराची फळे झाडावर टिकून राहण्यासाठी बागेला पाणी देणे सुरू ठेवावे. पाण्याच्या पाळ्या ४ ते ५ दिवसांच्या अंतराने द्याव्यात. शक्यतो ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे पाण्याची बचत होऊन बागेला काटेकोरपणे पाणी देणे शक्य होते.

 

सिंचन व्यवस्थापन
संत्रा व मोसंबी बाग  
एक वर्ष वयाच्या झाडाला १७ लिटर पाणी / दिवस / झाड द्यावे. दोन वर्षे वयाच्या झाडाला ३४ लिटर पाणी / दिवस / झाड, तीन वर्षे वयाच्या झाडाला ५१ लिटर पाणी / दिवस / झाड द्यावे. चार वर्षे वयाच्या झाडाला ७४ लिटर पाणी, तर ८ वर्षे वयाच्या झाडाला १८८ लिटर/ दिवस/झाड व १० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडांना २३५ लिटर/ दिवस/ झाड पाणी द्यावे.

लिंबू बाग :
एक वर्ष वयाच्या झाडाला ११ लिटर पाणी/दिवस/झाड, दोन वर्षे वयाच्या झाडाला १७ लिटर, ३ वर्षे वयाच्या झाडाला २५ लिटर, ४ वर्षे वयाच्या झाडाला ३६ लिटर पाणी प्रतिदिन प्रतिझाड द्यावे. पाच वर्षांच्या झाडाला ४२ लिटर/दिवस/झाड, ८ वर्षांच्या झाडाला ७३ लिटर/दिवस/झाड आणि १० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडांना १०८ लिटर / दिवस/झाड द्यावे.

आच्छादन
पाणीटंचाईच्या काळात झाडाभोवती काळी पाॅलीथीन (१०० मायक्राॅन जाडी) पसरून घ्यावी. आच्छादनामुळे जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावता येतो. आच्छादनासाठी शेतीतील निरूपयोगी सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थ वापरता येतात. यामध्ये प्रामुख्याने डवरीचे सड, तुराट्या, वाळलेले गवत, गव्हाचे काड, उसाचे पाचट, लाकडाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचा थर झाडाच्या सभोवती पसरावा.

फळगळीचे नियंत्रण
फळगळ कमी करण्यासाठी फवारणी करावी.
फवारणी प्रमाण : प्रति १०० लिटर पाणी
जिब्रेलीक आम्ल १.५ ग्रॅम अधिक
कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू. पी.) १०० ग्रॅम
अधिक युरिया १ किलो युरिया
सूचना : पुढील फवारणी १५ दिवसांनी करावी.
पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी पाण्याचा ताण कमी करण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

नवीन बागेच्या लागवडीचे नियोजन
नागपुरी संत्र्याच्या लागवडीसाठी ७५ बाय ७५ बाय ७५ सें.मी. आकाराचे खड्डे ६ बाय ६ मीटर अंतरावर खोदावेत. खोदलेल्या खड्ड्यामध्ये सूर्यप्रकाश पडून उष्णतेने निर्जंतुकीकरण होते.

मृग झाडांचे व्यवस्थापन
मृग बहराच्या फळांची तोडणी झाल्यानंतर झाडावरील सल काढून टाकावी. झाडावर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा काॅपर आॅक्‍झिक्लोराइड ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. जूनमध्ये मृग बहर घेण्यासाठी संत्रा बागेमध्ये जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याचा ताण द्यावा.

 

संपर्क : डाॅ. एम. एस. लदानिया, ०७१२-२५००३२५
दिनकर नाथ गर्ग, ९८२२३६९०३०
(राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...