मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळ
फळभाज्या
घेवडा लागवडीविषयी माहिती...
घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी हेक्टरी पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी फुले सुयश, कंटेडर या जाती निवडाव्यात.
घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी हेक्टरी पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी फुले सुयश, कंटेडर या जाती निवडाव्यात.
लागवड जून, जुलै आणि जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत करावी. लागवड करताना सपाट वाफ्यात लागवड करताना ६० x ३० सें. मी. आणि सरी वरंबा पद्धतीने लागवड करताना ४५ x ३० सें. मी. अंतराने लागवड करावी. लागवडीसाठी हेक्टरी ४० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यास १५ ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धक प्रती १० किलो बियाण्यास चोळावे. लागवडीपूर्वी पिकाला २५ किलो नत्र, ११० किलो स्फुरद आणि ११० किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने २५ किलो नत्र प्रतिहेक्टरी देऊन भर लावावी. साधारणपणे ११० दिवसांत पीक तयार होते.
संपर्क : ०२४२६- २४३२४२
अखिल भारतीय भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर
- 1 of 3
- ››