agricultural news in marathi Give the animals a balanced diet | Agrowon

जनावरांना द्या संतुलित आहार

डॉ. सागर जाधव
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021

जनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक क्रियेसाठी आवश्यक असणारे सर्व अन्नघटकांना योग्य प्रमाणात एकत्र मिसळणे यास संतुलित आहार असे म्हणतात.   
 

जनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक क्रियेसाठी आवश्यक असणारे सर्व अन्नघटकांना योग्य प्रमाणात एकत्र मिसळणे यास संतुलित आहार असे म्हणतात.   

प्रत्येक जनावराला त्याच्या शारीरिक स्थितीनुसार आहार देणे आवश्‍यक असते. आहारामध्ये वैरण, हिरवा चारा, खनिज पदार्थ, जीवनसत्वे, पाणी यांचा समावेश असावा. पावसाळी दिवसांमध्ये मुख्यतः हिरवा चारा जनावरांना जास्त प्रमाणात दिला जातो. परंतु जनावरांना हिरवा आणि वाळलेला चारा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे.

देशी गाईंना २ ते २.५ टक्के तर म्हशींना व संकरित गाईंना त्यांच्या वजनाच्या २.५ ते ३ टक्के शुष्क पदार्थाची गरज असते.  जनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक क्रियेसाठी आवश्यक असणारे सर्व अन्नघटकांना योग्य प्रमाणात एकत्र मिसळणे यास संतुलित आहार असे म्हणतात.   
आहारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे मिश्रण असणे आवश्यक आहे.  जनावरांच्या आहार प्रमाणात व घटकांत अचानक बदल करू नये.

संतुलित आहार 

 • प्रत्येक जनावराला रोज वाळलेला चारा, हिरवा चारा (एकदल अथवा द्विदल), पशुखाद्य व क्षारमिश्रण द्यावे.
 • वाळलेला चारा, हिरवा चारा कुट्टी करूनच द्यावा.
 • आहार शुष्क तत्त्वाच्या आधारावर द्यावा. १०० किलोस २.५ ते ३.० किलो या प्रमाणात शुष्क पदार्थ द्यावेत.
 • पशुआहारात २/३ भाग वैरण आणि १/३ भाग पशुखाद्य असावे.
 • एकदल वर्गातील हिरवा चारा (मका, कडवळ, ओट, बाजरा, नेपियर इ.)  यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते.
 • द्विदल वर्गातील चारा (लुसर्न, बरसीम, सुबाभूळ, चवळी, शेवरी)  यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
 • वाळलेली वैरण (कडबा, सरमाड, पेंढा, वाळलेले गवत, बगॅस, गव्हाचे काड, उसाचे वाढे) यामध्ये एकूण पचनीय पदार्थ यांचे प्रमाण अतिशय कमी असते.
 • पशुखाद्यामध्ये १८ ते २० % प्रथिने व ६५ ते ७५ % ऊर्जा असते.
 • जनावरांच्या आहारात सुकी वैरण, हिरवा चारा व पशुखाद्य यांचे प्रमाण शास्त्रियदृष्ट्या ठरवावे.
 • जनावरांच्या शरीराची खनिजांची गरज भागविण्यासाठी चिलेटेड खनिज मिश्रण देणे गरजेचे आहे.
 • हिरवा चारा फुलोऱ्यात असताना द्यावा. हिरवा चारा मुबलक प्रमाणात असल्यास पशुखाद्यावर ील ३० टक्के खर्च कमी करता येतो.
 •  संतुलित आहारासोबत पिण्यासाठी मुबलक स्वच्छ पाण्याची उपलब्धता करावी.
 • पिण्यासाठीचे पाणी वास रहित, रंगहीन असावे. त्यात कोणतेही अपायकारक क्षार नसावेत.
 • साधारणपणे जनावरांना पिण्यासाठी दररोज ८० ते १०० लिटर पाणी द्यावे.

संकरित गाईसाठी आहार 
खालील मात्रा ही साधारणपणे ५०० किलो शारीरिक वजन आणि १५ लिटर दूध देण्याऱ्या गाईसाठी आहे.

 • हिरवा चारा एकदल (२१ किलो) : मका, ज्वारी, बाजरी, ओट, नेपियर इ.
 • द्विदल चारा (९ किलो) :  लुसर्न, बरसीम, चवळी, वाटाणा, वाल, गिनी गवत, पॅरा गवत, सुदान गवत, दशरथ गवत, अंजन गवत, स्टायलो गवत इ.
 • वाळलेला चारा (५ ते ६ किलो) : ज्वारीचा कडबा, मका, बाजरी सरमाड, गव्हाचा तूस, भाताचा पेंढा, वाळलेले गवत, सोयाबीन व तुरीचे काड, उडदाचा पाला, मुगाचा पाला इत्यादी.
 • पशुखाद्य : शरीर पोषणासाठी १ ते १.५ किलो आणि प्रतिलिटर दूध उत्पादनास ४०० ग्रॅम (एकूण ६.५ किलो)
 • चिलेटेड खनिज मिश्रण : ५० ग्रॅम प्रतिदिन.

संतुलित पशुखाद्य बनविण्याचे तंत्र : प्रमाण १०० किलोसाठी)
दुग्धोत्पादनामध्ये जादा खर्च हा पशुआहारावर होतो. पशुखाद्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, डाळींच्या चुणी तसेच सरकी पेंड, सोयाबीन पेंड, भुईमूग पेंड, गव्हाचा किंवा तांदळाचा कोंडा यांचा योग्य प्रमाणात वापर करून पशुखाद्य तयार करता येते.

मका भरडा.......३५ किलो
शेंगदाणा पेंड.....२८ किलो
टरफले/भुसा(गहू,हरभरा,डाळी,भात).....३४ किलो
खनिज मिश्रण.....२ किलो
मीठ.....१ किलो

हिरव्या चाऱ्याचे महत्त्व 

 • चारा चवदार असल्यामुळे जनावरे आवडीने खातात.
 • द्विदल चाऱ्यामधून खनिजे व प्रथिनांचा पुरवठा होतो.
 •  जनावरांच्या शरीरात जीवनसत्त्व ‘अ ’(कॅरोटीन) पुरवठा होऊन रातांधळेपणा टाळण्यास मदत होते. त्वचा सतेज व उत्तम राहते.
 • जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्यासोबतच वाळलेला चारा समावेश करणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्यांना लागणाऱ्या पोषक घटकांची कमतरता भरून निघते.

- डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४
(पशूपोषण शास्त्र विभाग, बारामती ॲग्रो लिमिटेड,बारामती,जि.पुणे)


इतर कृषिपूरक
देशी गोवंश संवर्धनासाठी ‘राष्ट्रीय...भारतीय गोवंशाची रोग प्रतिकारक शक्ती व विविध...
शेतकरी नियोजन ः रेशीमशेतीशेतकरी ः सोपान शिंदे गाव ः पांगरा शिंदे, ता.वसमत...
शेततळ्यात कार्प माशांचे व्यवस्थापनतळयातील बीजाची वाढ ही मुख्यत्वे पाण्याच्या...
शेततळ्यात कार्प प्रजातीचे संवर्धन शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करताना बाजारात मागणी...
कुक्कुटपालनातून ग्रामीण अर्थकारण...ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास...
कोंबड्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रकलसीकरणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून...
परसबागेत सुधारित कोंबडी जातीसह योग्य...परसबागेतील कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन...
कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीला...सध्याच्या काळामध्ये कोंबडी खाद्याची किंमत वाढत...
जनावरांना द्या संतुलित आहारजनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक...
मधमाशीपालनातील मौल्यवान पदार्थ : बी...मधमाशी पालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या...
शेळी प्रजननासाठी तंत्रज्ञानाचा वापरगर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या...
शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण,...सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने...
निमखाऱ्या पाण्यातील जिताडा,...जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने...
लेप्टोस्पायरोसिस प्रसाराबाबत जागरूक राहापावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा...
शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारीमत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी...
डंखविरहित मधमाशी वसाहतीचे विभाजनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती आहेत....
वासरातील आजारावर उपाययोजनावासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा एक घटक...
जनावरांतील दातांचे आजार अन् उपचारजनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींचीदूध उत्पादनासाठी म्हशी खरेदी करताना त्यांना...
संकरित वासरांचे संगोपनजन्मानंतर वासराला त्याच्या वजनाच्या १० टक्के चीक...