नारळाच्या आळ्यात सोडणांचे आच्छादन केल्यास ओलावा टिकून रहातो
नारळाच्या आळ्यात सोडणांचे आच्छादन केल्यास ओलावा टिकून रहातो

नारळ बागेला द्या पुरेसे पाणी

नारळाच्या खोडापासून १०० ते १०५ सेंमी अंतरावर ठिबकच्या नळ्या आणि तोट्या गोलाकार फिरवाव्यात. फळधारणा होणाऱ्या झाडासाठी ४ लिटर/तास क्षमतेच्या तोट्या लावाव्यात. या तोटाच्या माध्यमातून गरजेनुसार आणि बाष्पीभवनाच्या तीव्रतेनुसार पाणी देण्याचे नियोजन करावे.

नारळाच्या खोडापासून १०० ते १०५ सेंमी अंतरावर ठिबकच्या नळ्या आणि तोट्या गोलाकार फिरवाव्यात. फळधारणा होणाऱ्या झाडासाठी ४ लिटर/तास क्षमतेच्या तोट्या लावाव्यात. या तोटाच्या माध्यमातून गरजेनुसार आणि बाष्पीभवनाच्या तीव्रतेनुसार पाणी देण्याचे नियोजन करावे.  नारळ हे बागायती पीक आहे.त्यामुळे लागत्या नारळापासून वर्षभर फुलधारणा, फळधारणा व फळे उत्पादकतेचे काम झाडावर निरंतर सुरू असते. हे लक्षात घेऊन नारळास वर्षभर पावसाळ्याव्यतिरिक्त वर्षभर पाणीपुरवठा करणे अत्यंत आवश्‍यकता आहे. नवीन लागवडीतील नियोजनामध्ये सुमारे २ ते ३ वर्षे वयाच्या उंच, ठेंगू अथवा संकरित नारळ लागवडीचा समावेश होतो. ही लागवड ७.५  बाय ७.५ मी या अंतरावर करावी. यामुळे एकरी ७० नारळ रोपांची लागवड होते. नवीन लागवड असल्यामुळे रोपे लावल्यानंतर पहिल्या वर्षी रोपांची मुळे ३० सेंमी. अंतरापर्यंत पसरतात. तर दुसऱ्या वर्षी ६० सेंमी. अंतरापर्यंत पसरतात. पाणी देताना ठिबकच्या माध्यमातून पाणी दिल्यास १६ मिमीच्या लॅटरलने ४ लिटर/तास क्षमतेच्या दोन तोटींने एका नारळ रोपास १० लिटर प्रति दिन/प्रति रोप पाणी द्यावे. फळधारणा होणारे नारळाचे झाड असल्यास सुमारे ४० लिटर पाणी प्रति दिन, प्रति झाड द्यावे असे शिफारशीत तंत्रज्ञान आहे.  पाण्याचे नियोजन  मोकाट पद्धत  ही एक जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे. ज्या वेळी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते, त्या वेळी या पद्धतीचा अवलंब करावा. खोडाच्या बाजूने चर करून खोडापासून २ ते ३ फुटांपर्यंत चर करून पाणी द्यावे. यामध्ये नारळाची मुळे उघडी पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.  आळे पद्धत  ही पाणी देण्याची योग्य पद्धत आहे. वयोमानानुसार नारळाच्या बुंध्यापासून गोलाकार बांध घालून या आळ्यातून पाणी दिले जाते. नारळाच्या बुंधात आच्छादनसुद्धा या पद्धतीत करता येते.  तुषार पद्धत   तुषार सिंचन पद्धतीने नारळाच्या बागेत एक वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म वातावरण तयार होते. हे नारळ बागेस पोषक असते. ज्या ठिकाणी आंतरपिके घेतलेली आहेत, तेथे तुषार सिंचन पद्धती अवलंबल्यास त्याचा फायदा होतो.  पाइपद्वारे पाणी देणे  परस बाग किंवा कमी क्षेत्रात जिथे नारळ लागवड केलेली असते, त्या ठिकाणी ही पद्धत अमलात आणली जाते. या पद्धतीत पाणी पाइपने दिल्याने बुंधातील मुळे उघडी पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. ठिबक सिंचन 

  •  ही एक सुधारित पद्धत आहे. याचा अवलंब योग्य प्रकारे करून किफायतशीर उत्पादन मिळवता येते. विद्राव्य असणारी खते या पद्धतीतून देता येणे शक्‍य होते. मर्यादित स्वरूपात मुळांच्या ठरावीक भागात पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा प्रभावी वापर करून अपव्यय टाळता येतो. 
  •  खोडापासून १०० ते १०५ सेंमी अंतरावर तोट्या आणि ठिबकच्या नळ्या गोलाकार फिरवाव्यात. फळधारणा होणाऱ्या झाडासाठी ४ लिटर/तास क्षमतेच्या तोट्या लावाव्यात. या तोटाच्या माध्यमातून गरजेनुसार आणि बाष्पीभवनाच्या तीव्रतेनुसार पाणी देण्याचे नियोजन करावे. 
  • नारळाला पाणी देण्याचे नियोजन 

  • पाण्याची गरज ही जमिनीचा मगदूर आणि झाडाचे वय यावर अवलंबून असते. नवीन लागवड केल्यानंतर पहिली तीन ते चार वर्षे नारळाला हिवाळ्यात दर ६ ते ७ दिवसांनी ३० ते ३५ लिटर व उन्हाळयात दर ३ ते ४ दिवसांनी ४० ते ४५ लिटर पाणी सोड पद्धतीने द्यावे. हेच प्रमाण दरवर्षी दुप्पट करत पाच वर्षांनी व त्यापुढील वर्षी हिवाळ्यात १६० ते १८० लिटर व उन्हाळ्यात २०० ते २४० लिटर पाणी द्यावे लागते. 
  • ठिबक सिंचन पद्धतीने नारळाला पाणी देता येते. नारळाच्या प्रत्येक मोठ्या झाडास ठिबक सिंचनाद्वारे ऑक्‍टोबर ते जानेवारीमध्ये प्रति दिन ३० लिटर पाणी द्यावे. फेब्रुवारी ते मेपर्यंत प्रति दिन ४० लिटर पाणी झाडाच्या खोडापासून १.२५ मीटर अंतरावर गोलाकार नळीचा पाइप टाकून सहा ड्रीपरच्या साह्याने द्यावे. प्रत्येक झाडाभोवती १५ सेंमी जाडीचे वाळलेल्या गवताचे किंवा झावळांचे आच्छादन करावे. अनियमित अगर कमी प्रमाणात पाणी दिल्यास झाडाची वाढ व उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.
  • - डॉ. वैभव शिंदे,  ९५१८९४३३६३ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com