agricultural news in marathi Good opportunity in fish farming | Page 2 ||| Agrowon

मत्स्य संवर्धनामध्ये चांगली संधी

रामेश्‍वर भोसले, डॉ. बी. आर. चव्हाण
शनिवार, 10 जुलै 2021

मत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्य उत्पादनामध्ये वाढ करता येते. मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, निर्यातक्षम उत्पादनाची चांगली संधी आहे.
 

मत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्य उत्पादनामध्ये वाढ करता येते. मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, निर्यातक्षम उत्पादनाची चांगली संधी आहे.

दरवर्षी देशामध्ये १० जुलै हा मत्स्य शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉ. अलीकुनी आणि डॉ. हिरालाल चौधरी यांनी १० जुलै १९५७ रोजी भारतीय प्रमुख जातीच्या (कटला, रोहू व म्रीगल) माशांचे कृत्रिमरीत्या प्रजनन केले. या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायात नीलक्रांती घडवून आणली. भूजल मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

आपल्या राज्याला ७२० किलो मीटर विस्तुत समुद्र किनारा, भूजलीय ३ लाख हेक्टर तलावाचे क्षेत्र, १९००० किमी लांबीच्या नद्या आणि शेततलाव मत्स्यपालनासाठी उपलब्ध आहेत. राज्यात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक हंगामी जलाशयामध्ये ५ ते ६ महिने पाणी असते, असे जलाशय मत्स्यसंवर्धनासाठी उपयुक्त आहेत. यादिनाच्या निमित्ताने मत्स्यमेळावे, मत्स्य जनजागृती, लोककल्याणकारी मत्स्य व्यवसायाशी निगडीत योजनांचे लोकार्पण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्योत्पादन वाढ करणे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण विभागामध्ये शिरगाव (जि. रत्नागिरी), विदर्भामध्ये नागपूर आणि मराठवाडा विभागामध्ये उदगीर (जि. लातूर) या तीन ठिकाणी मत्स्य महाविद्यालय कार्यरत आहेत. रत्नागिरी येथे एक मत्स्य पदविका महाविद्यालय आहे.

मत्स्यपालनाची उद्दिष्टे 

  • मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून शाश्‍वत पद्धतीने सागरी व भूजलाशायीन मत्स्योत्पादनात वाढ.
  • शासन योजनेच्या माध्यमातून लोकांसाठी मत्स्य व्यवसाय हे उपजीविका साधननिर्मिती.
  • प्रथिनेयुक्त आहाराची निर्मिती.
  •  मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, निर्यातक्षम उत्पादन.
  •  मत्स्य व्यवसायिक/ मत्स्य शेतकरी यांचे उत्पन्न दुप्पट करणे. आर्थिक व सामाजिक विकासाला चालना.
  •  नैसर्गिक साधनसंपत्ती जसे नदी, नाले, तलाव, हंगामी जलाशयांचा उपयोग.
  • ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांनी शासनाच्या योजनेतून मत्स्यपालनाला चालना.
  • मत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्य उत्पादनामध्ये वाढ.
  • जलाशय, मत्स्य तलावामध्ये मत्स्यिबोटुकलीचे संचयन.
  • दुर्लक्षित असलेल्या जलाशयाचा वापर मत्स्योत्पादनासाठी करण्याकरीता शेतकऱ्यांचे मेळावे. मत्स्य संवर्धनामध्ये/मत्स्य व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर प्रशिक्षण घ्यावे. जेणेकरून व्यवसायात येणाऱ्या अडचणीवर सहज मात करता येईल. मत्स्यपालन करताना दर्जेदार मत्स्य खाद्याचा वापर करावा, जेणे करून कमी कालावधीत जास्त मत्स्य उत्पादन घेता येईल.

संपर्क - रामेश्‍वर भोसले,९८६०७२७०९०
(संशोधन विद्यार्थी, मत्स्य महाविद्यालय व संशोधन संस्था, थुतुकुडी, तामिळनाडू)
- डॉ. बी. आर. चव्हाण, ७३८७३२६९८४
(विभाग प्रमुख, मत्स्य अभियांत्रिकी, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, जि. रत्नागिरी)


इतर कृषिपूरक
शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण,...सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने...
निमखाऱ्या पाण्यातील जिताडा,...जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने...
लेप्टोस्पायरोसिस प्रसाराबाबत जागरूक राहापावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा...
शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारीमत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी...
डंखविरहित मधमाशी वसाहतीचे विभाजनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती आहेत....
वासरातील आजारावर उपाययोजनावासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा एक घटक...
जनावरांतील दातांचे आजार अन् उपचारजनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींचीदूध उत्पादनासाठी म्हशी खरेदी करताना त्यांना...
संकरित वासरांचे संगोपनजन्मानंतर वासराला त्याच्या वजनाच्या १० टक्के चीक...
शेळ्यांसाठी कृत्रिम रेतनाचा वापरकृत्रिम रेतनाद्वारे शेळ्यांमध्ये गर्भधारणा करून...
योग्य पशुधनाची निवड महत्त्वाचीदुग्ध व्यवसायासोबत मांस, लोकर आदी उत्पादनांसाठी...
रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रणपावसाळा आणि हिवाळ्यात रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी...अळिंबी उत्पादनामुळे उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनसततच्या पावसाचा मोठ्या जनावरांना त्रास होत नसला,...
तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधीसर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे...
कोंबडीखाद्यामधील मायकोटॉक्सिन्सवर...मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग...
मत्स्य संवर्धनामध्ये चांगली संधीमत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची...जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  ...
शेळीपालनातील महत्त्वाची सुत्रेशेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय...