परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
फळबाग
द्राक्ष सल्ला
डाऊनी मिल्ड्यू या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब प्रभावी आहे. मात्र, युरोपियन युनियनकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे याचा वापर ४ जानेवारी २०२२ पर्यंतच करता येईल.मॅन्कोझेबला पर्यायी ठरू शकेल अशा उपायांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
डाऊनी मिल्ड्यू या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब प्रभावी आहे. मात्र, युरोपियन युनियनकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे याचा वापर ४ जानेवारी २०२२ पर्यंतच करता येईल.मॅन्कोझेबला पर्यायी ठरू शकेल अशा उपायांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
सध्याच्या काळात डाऊनी मिल्ड्यू या रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब हे बुरशीनाशक प्रभावी आहे. परंतु युरोपियन युनियनकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे याचा वापर ४ जानेवारी २०२२ पर्यंतच करता येईल. मॅन्कोझेबच्या वापरावर जरी निर्बंध घातले गेले तरी सध्याच्या स्थितीत डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव काही बागेत दिसत आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मॅन्कोझेबला पर्यायी ठरू शकेल अशा उपायांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
झायरम व मेटिराम या बुरशीनाशकांना युरोपियन युनियनची मान्यता आहे. सद्यःस्थितीत झायरम (२७ टक्के एस.पी.) (२.३ ते ३.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) आणि मेटिराम या दोन्ही बुरशीनाशकांचा तात्पुरत्या स्वरूपात वापर करता येईल. मेटिराम या बुरशीनाशकाचा वापर परिशिष्ट ५ (Annexure ५) प्रमाणे डायमिथोमॉफ किंवा पायरॅक्लोस्ट्रोबीन या बुरशीनाशकांसोबत करावा. झायरम हे बुरशीनाशक देखील डायमिथोमॉर्फ व मॅंडिप्रोपामिड या बुरशीनाशकांसोबत टाकीत मिश्रण तयार करून वापरता येईल.
दोन्ही बुरशीनाशकांचा काढणीपूर्व कालावधी हा ६६ दिवसांचा आहे. निर्बंध आले असले तरी खरड छाटणीच्या काळात डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेबचा वापर करणे योग्य व फायदेशीर ठरेल. याचबरोबर जैविक नियंत्रके उदा. ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाचा वापर योग्य प्रमाणात करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
संपर्कः ०२०-२६९५६०००,
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
- 1 of 22
- ››