काढणीनंतर सोयाबीनची हाताळणी, साठवणूक

सध्या अनेक ठिकाणी सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आहे. पावसामुळे कापणी मागेपुढे होत आहे. या पिकाची कापणी, मळणी, हाताळणी व बाजारात विक्री करण्यापूर्वी मालाची साठवणूक करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती घेऊ
Handling, storage of soybeans after harvest
Handling, storage of soybeans after harvest

सध्या अनेक ठिकाणी सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आहे. पावसामुळे कापणी मागेपुढे होत आहे. या पिकाची कापणी, मळणी, हाताळणी व बाजारात विक्री करण्यापूर्वी मालाची साठवणूक करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती घेऊ महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे प्रमुख गळीतधान्य पीक झालेले आहे. अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, इ. प्रमुख जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. सध्या अनेक ठिकाणी सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आहे. पावसामुळे कापणी मागेपुढे होत आहे. या पिकाची कापणी, मळणी, हाताळणी व बाजारात विक्री करण्यापूर्वी मालाची साठवणूक करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती घेऊ. योग्य प्रकारे काळजी घेतल्यास बियाण्याची गुणवत्ता व उगवणशक्ती टिकवून राहते. पर्यायाने बाजारामध्ये योग्य दर मिळण्यास मदत होते.  हाताळणी

  • मळणी झाल्यानंतर सोयाबीनचे बियाणे सिमेंटच्या खळ्यावर किंवा ताडपत्रीवर एकसारखे पसरावे. बियाण्यातील आर्द्रता १० ते १२ टक्के होईपर्यंत उन्हात वाळवावे.
  • वाळविलेल्या बियाण्यातील शेंगा, फोलपटे, काड्या, कचरा, माती, खडे इ. काढून ते स्वच्छ करावे. 
  • समान आकाराचे बियाणे मिळण्यासाठी ४ मि.मी. लंबवर्तुळाकार आकाराचे छिद्र असलेल्या चाळण्यांचा वापर करावा. 
  • बियाणे हाताळताना ते जास्त उंचीवरून आपटले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. 
  • साठवणूक

  • स्वच्छ केलेले बियाणे कोरड्या जागेत स्वच्छ, कीडविरहित किंवा नवीन पोत्यात साठवून ठेवावे. बियाणे भरून ठेवण्यासाठी ज्यूटचे पोते वापरावे. 
  • बियाणे वाळविताना सोयाबीनमधील ओलाव्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अधिक ओलावा किंवा आर्द्रता असल्यास बुरशीची वाढ होऊन बियाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. कीड लागण्याची शक्यता वाढते.
  • साठवणूक करताना बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. 
  • साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोती ठेवावीत. जमिनीची ओल सोयाबीनला लागणार नाही. 
  • एकावर एक अशा पोत्यांची थप्पी न लावता दोन पोत्यांवर एक अशा प्रकारे थप्पी लावावी. कोणत्याही स्थितीमध्ये पाचपेक्षा अधिक पोत्याची थप्पी लावू नये. 
  • पोत्याच्या चारही बाजूने हवा खेळती राहील, अशा रीतीने पोती ठेवावीत.
  • - हरीश फरकाडे,   ८९२८३६३६३८ (सहायक प्राध्यापक - वनस्पती रोगशास्त्र विभाग, श्री. शिवाजी उद्यानविद्या  महाविद्यालय, अमरावती)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com