agricultural news in marathi Harvesting stages of vegetable crops | Agrowon

जाणून घ्या भाजीपाला पिकांच्या काढणीच्या अवस्था

बी. जी. म्हस्के, डॉ. एन. एम. मस्के
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काढणी केल्यास काढणीपश्‍चात होणारे नुकसान काही प्रमाणात कमी होते. त्यासाठी भाजीपाला पिकांच्या काढणीसाठी योग्य परिपक्वतेची अवस्था आणि मापदंड माहिती असणे आवश्‍यक आहे. 
 

योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काढणी केल्यास काढणीपश्‍चात होणारे नुकसान काही प्रमाणात कमी होते. त्यासाठी भाजीपाला पिकांच्या काढणीसाठी योग्य परिपक्वतेची अवस्था आणि मापदंड माहिती असणे आवश्‍यक आहे. 

दर्जेदार उत्पादनासाठी भाजीपाला पिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काढणी केल्यास काढणीपश्‍चात होणारे नुकसान काही प्रमाणात कमी होते. त्यासाठी भाजीपाला पिकांच्या काढणीसाठी योग्य परिपक्वतेची अवस्था आणि मापदंड माहिती असणे आवश्‍यक आहे. 

योग्य परिपक्वतेला काढणीचे महत्त्व 

 •   नवीन फुलांची व फळांची संख्या वाढून उत्पादनात वाढ होते.
 •   पिकांची गुणवत्ता वाढून दर्जेदार उत्पादन मिळते.
 •   चव चांगली लागते.
 •   बाजारामध्ये जास्त मागणी व चांगले दर मिळतात.
 •   काढणीपश्‍चात होणारे नुकसान टाळता येते.

सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या काढणीसाठी लागवडीपासून ते फळ येण्यास लागणारा काळ, फुले आल्यापासून ते फळे तयार होण्यास लागणारा काळ, जात, आकार, रंग, वजन, वापर, बाजारपेठेचे अंतर या बाबींचा विचार करणे गरजेचे असते. प्रत्येक भाजीपाला पिकाचा काढणी कालावधी हा वेगवेगळा असतो. त्यामुळे योग्य परिपक्वतेलाच पिकांची काढणी करावी.

टोमॅटो 

 • रोप लावल्यापासून जातिपरत्वे ६० ते ६५ दिवसांत फळाची तोडणी सुरू होते. 
 • दूरच्या बाजारपेठेसाठी हिरव्या पक्व अवस्थेतील, मध्यम पल्ल्याच्या बाजापेठेसाठी गुलाबी लालसर झालेली फळे तर स्थानिक बाजारपेठेसाठी किंवा प्रक्रिया उद्योगासाठी पूर्ण लाल झालेली फळे काढावीत.

वांगी 

 • रोपांच्या लागवडीपासून साधारणतः १० ते १२ आठवड्यांनी फळे काढणीस तयार होतात. 
 • पूर्ण वाढलेली परंतु कोवळी, आकर्षक, चकचकीत आणि टवटवीत फळे काढावीत.

मिरची 

 • मिरची काढण्याची वेळ ही मिरचीच्या वापरावर अवलंबून असतो. 
 • लागवडीपासून ४५ ते ५० दिवसांनी हिरव्या फळांची तोडणी करण्यास सुरुवात होते. 
 • मिरच्या वाळवून साठवायच्या असतील तर ७० ते ८० दिवसांनी लाल रंगाची फळे तोडावीत.

भेंडी 

 • लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांत फळे काढणीस तयार होतात.
 • आकर्षक हिरवी, कोवळी, लसलशीत, ५ ते ६ सेंमी लांबीच्या फळांची एक दिवसाआड काढणी करावी. 
 • भेंडीची वारंवार तोडणी केल्याने जास्त फळे लागतात आणि उत्पादनातही भर पडते.

कांदा व लसूण 

 • लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यांत कांदा पीक काढणीसाठी तयार होते. 
 • कांदा परिपक्व झाल्यानंतर पाने पिवळसर होतात, पात आडवी पडते यालाच ‘मान मोडणे’ असे म्हणतात. साधारणतः ६० ते ६५ टक्के माना पडल्यानंतर काढणीस सुरुवात करावी. 
 • लसणाचे पीक लागवडीनंतर ५ महिन्यांनी काढणीसाठी तयार होते. पात पिवळी पडून सुकायला लागल्यावर लसूण काढणीस सुरुवात करावी.

वेलवर्गीय भाजीपाला पिके 

 • यामध्ये काकडी, टिंडा, भोपळा, कारली, दोडके, घोसाळी, पडवळ, गिलके इत्यादी भाज्यांचा समावेश होतो. 
 • पूर्ण वाढ झालेली, परंतु कोवळ्या, आकर्षक फळांची काढणी करावी. 
 • काढणीस उशीर झाल्यास फळांची चव चांगली लागत नाही. बाजारभाव कमी मिळतो.

शेंगवर्गीय भाजीपाला पिके 

 • यामध्ये चवळी, गवार, वाल, घेवडा, वाटणा इत्यादी भाज्यांचा समावेश होतो.
 • भाजीसाठी हिरव्या कोवळ्या व पूर्ण वाढलेल्या शेंगाची नियमित काढणी करावी. तोडणीस उशीर झाल्यास शेंगाची गुणवत्ता खालावते.

कोबीवर्गीय भाजीपाला पिके 

 • यामध्ये पत्ता गोबी, फुलगोबी, ब्रोकोली आणि नवलखोल इत्यादींचा समावेश होतो. 
 • कोबीचे पीक जाती आणि हंगामानुसार २.५ ते ३ महिन्यांनी तयार होते. तयार झालेला कोबी गड्डा हाताने दाबल्यास घट्ट लागतो. अशा तयार झालेल्या गड्ड्याची काढणी करावी. 
 • फुल गोबीचे पूर्ण वाढलेले पांढरे गड्डे काढणीसाठी योग्य असतात. काढणीस उशीर झाल्यास गड्डे पिवळे होऊन घट्ट आणि कमी आकर्षक दिसतात.
 • नवलखोलची काढणी गड्डा ६ ते ७ सेंमी व्यासाचा झाल्यावर कोवळा असताना करावी.

पालेभाज्या 
मेथी, पालक, चुका, शेपू इत्यादी पालेभाज्यांची काढणी हिरवी आणि कोवळी पाने असताना करावी.

- बी. जी. म्हस्के,  ९०९६९६१८०१
(सहायक प्राध्यापक, एम.जी.एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, जि. औरंगाबाद)


इतर कृषी सल्ला
वनशेतीमध्ये चिंच लागवडकोरडवाहू शेतीमध्ये चिंच लागवड करताना जमिनीची निवड...
असे करा कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे...सध्या कपाशीचे पीक बोंडे धरण्याच्या किंवा धरलेल्या...
पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्येएक टन ऊस उत्पादनासाठी १.२५ ते १.५० किलो नत्र, ०....
द्राक्ष बागेत पावसाळी स्थितीमुळे...गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. काही...
मृग बहार डाळिंब बागेसाठी नियोजनमृग-बहार (i) मे-जून बहार नियमन (ii) उशिरा मृग...
रोपवाटिका व्यवस्थापनात स्वच्छता, निचरा...रोपवाटिकेमध्ये उत्तम दर्जाच्या कलम काडीइतकेच...
भाजीपाला पिकांचे सुधारित व्यवस्थापनकोकण विभागात पावसानंतरच्या ओलाव्यावर कमी कालावधीत...
अल्पभूधारकांची शेती लवचिक बनवाभारतात अल्पभूधारकांचे प्रमाणे ११७ दशलक्ष असून, ते...
पीक संरक्षणासाठी ट्रायकोडर्माचा वापरनिसर्गामध्ये असंख्य परोपजीवी बुरशी असतात. त्यांची...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्‍यताकोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व...
द्रवरूप जिवाणू खते महत्त्वाची...जिवाणू खतांची प्रक्रिया करण्यापूर्वी बियाण्यास...
शेतीमाल प्रक्रिया उद्योगासाठी...गतिशक्ती मास्टर प्लॅन वाहतूक, हाताळणी खर्च कमी...
भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनभेंडी पिकाचे रसशोषक किडी व फळ पोखरणाऱ्या अळीच्या...
जाणून घ्या कांदा पिकातील सूक्ष्म...माती परीक्षणानंतर जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्म...
सुधारित तंत्राने करा करडई लागवडकरडई हे रब्बी हंगामातील महत्वाचे तेलबिया पीक आहे...
भेटीचे सोने करता आले पाहिजे...भात शेतीमध्ये पाणथळ जागा. या जागाच जल आणि...
मॉन्सून परतीचा प्रवास सुरूच...मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज  प्रादेशिक हवामान केंद्र,...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...